AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Silver Price Today : खुशखबर, सोने-चांदीत घसरण, आज झाले इतके स्वस्त

Gold Silver Price Today : गेल्या आठवड्यापासून सोने-चांदीच्या किंमतीत मोठी वाढ झालेली नाही. त्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Gold Silver Price Today : खुशखबर, सोने-चांदीत घसरण, आज झाले इतके स्वस्त
भावात नरमाई
| Updated on: Apr 28, 2023 | 9:15 AM
Share

Gold Silver Price Today : सोन्याच्या घौडदौडीला अक्षय तृतीयेच्या अगोदरपासूनच ब्रेक लागला आहे. सोन्या-चांदीचे दर (Gold Silver Price ) उच्च पातळीवर असले तरी त्यात आठवड्यापासून कुठलीही मोठी वाढ झाली नाही. किंमतीत मोठा उलटफेर न झाल्याने ग्राहकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. दिवाळीपासून सोने आणि चांदीत दरवाढ सुरु आहे. सोन्यात तर 11 हजारांची वाढ झाली असून चांदीने पण मोठा पल्ला गाठला आहे. येत्या काही दिवसात सोने मोठा विक्रम करणार असल्याचा दावा बाजारातील तज्ज्ञ करत आहे. पण सध्या तरी किंमती आटोक्यात आहेत.

आज काय भाव गुडरिटर्न्सनुसार, 28 एप्रिल रोजी, सकाळच्या सत्रात 22 कॅरेट सोन्याचा भाव प्रति तोळा 56,100 रुपये तर 24 कॅरेटचा भाव 61,190 रुपये प्रति तोळा आहे. सोन्याच्या भावात 10 रुपयांची घसरण झाली आहे. 19 एप्रिल रोजी 22 कॅरेट सोने प्रति तोळा 56,200 रुपये होते. तर 24 कॅरेटचा भाव 61,310 रुपये प्रति तोळा आहे.

सोने सत्तर हजारी मनसबदार सोने-चांदीने 5 एप्रिल रोजी रेकॉर्ड केला होता. 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याची किंमत 56,090 रुपये तर 24 कॅरेट एक तोळा सोन्याची किंमत 61,180 रुपये होती. सोन्याला 70,000 टप्पा गाठायला आता फार वेळ लागणार नाही. तर चांदीने आज यु-टर्न घेतला असला तरी चांदी लवकरच 80,000 चा टप्पा गाठेल, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.

बँकांनी एलटीव्ही केला कमी सध्या सोन्याच्या किंमती रेकॉर्डस्तरावर आहेत. सोने प्रचंड महाग झाले आहेत. त्यामुळे बरेच ग्राहक गरजा भागविण्यासाठी सोन्यावर कर्ज घेत आहेत. वैयक्तिक कर्ज घेण्याच्या मोबदल्यात सोन्यावरील कर्ज स्वस्त आणि सहजरित्या मिळते. निम शहरी आणि ग्रामीण भागात सोने तारण ठेऊन मिळणारे कर्ज लोकप्रिय आहे. सध्या सोन्याच्या किंमती अधिक असतानाही ग्राहकांना या दरवाढीचा फायदा मिळताना दिसत नाही. कारण बँकांनी आणि वित्तीय संस्थांनी एलटीव्ही कमी केला आहे.

भाव एका मिस्ड कॉलवर 22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोने खरेदीपूर्वी तुम्हाला त्याची किंमत एका मिस कॉलवर कळू शकते. त्यासाठी 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊ शकता. त्यानंतर थोड्याचवेळात एसएमएस (SMS) येईल. त्याआधारे तुम्हाला किंमती कळतील. तसेच भाव जाणून घेण्यासाठी तुम्ही www.ibja.co वा ibjarates.com या ठिकाणी माहिती घेऊ शकता.

BIS Care APP सोनार तुम्हाला गंडवत असल्याची शंका असल्यास, अथवा तुम्हाला सोन्याची शुद्धता तपासायची असल्यास तुमच्या मोबाईलमध्ये BIS Care APP डाऊनलोड करा. प्ले स्टोअरमध्ये जाऊन तुम्ही हे बीआयएस ॲप घेऊ शकता. तुम्ही खरेदी केलेल्या सोन्यावर त्याचा हॉलमार्क क्रमांक (HUID) अंकित असतो. हा क्रमांक टाकल्यास हॉलमार्किंगची संपूर्ण माहिती समोर येईल आणि सर्वात शेवटी हे सोने किती कॅरेटचे आहे ते दिसेल.

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.