Share Market : आनंद पोटात माईना ना रे माईना, 3 रुपयांहून शेअर पोहचला थेट 5700 रुपयांवर!

Share Market : या कंपनीच्या शेअरने जो काही सूसाट ट्रॅक पकडला आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांच्या आनंदाला पारवार उरला नाही. कंपनीचा शेअर 7 टक्क्यांच्या उसळीसह 5850 रुपयांवर पोहचला. या शेअरने मंगळवारी गेल्या 52 आठवड्यांचा उच्चांका गाठला. या शेअरमध्ये 1,75,000 टक्के तुफान आलं.

Share Market : आनंद पोटात माईना ना रे माईना, 3 रुपयांहून शेअर पोहचला थेट 5700 रुपयांवर!
Follow us
| Updated on: Sep 26, 2023 | 5:09 PM

नवी दिल्ली | 26 सप्टेंबर 2023 : गेल्या आठवड्यात शेअर बाजारात (Share Market) झालेल्या आपटी बारमुळे दिग्गज कंपन्यांचे गुंतवणूकदार खट्टू झाले आहेत. तर काही शेअरने दमदार कामगिरी बजावली आहे. त्यांनी गुंतवणूकदारांना मालामाल तर केलेच आहे. पण मागील रेकॉर्ड पण त्यांच्या दफ्तरी जमाबंद केले आहे. या कंपनीच्या शेअरने पण अशीच सूसाट कामगिरी बजावली आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांना (Investors) आनंद वाटता वाटता हर्षवायू झाला आहे. या शेअरने आज 7 टक्क्यांची उसळी घेतली. हा शेअर 5850 रुपयांवर पोहचला. मंगळवारी या शेअरने गेल्या 52 आठवड्यांचा उच्चांका गाठला. या शेअरमध्ये 1,75,000 टक्के तुफान आलं, कोणता आहे हा शेअर?

Apar Industries Share Price

इलेक्ट्रिकल इक्विपमेंट इंडस्ट्रीशी ही कंपनी जोडलेली आहे. अपार इंडस्ट्री शेअरने ही कमाल केली. हा शेअर 3 रुपयांचा स्टॉक 5700 रुपयांवर पोहचला. अपार इंडस्ट्रीजचा शेअर 7 टक्क्यांनी वधारला. हा शेअर 5850 रुपयांवर पोहचला. दरम्यान अपार इंडस्ट्रीज आता एक मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. त्यासाठी निधी जमावण्यात येत आहे.

हे सुद्धा वाचा

या तारखेला महत्वाचा निर्णय

अपार इंडस्ट्रीजच्या व्यवस्थापकीय संचालकांची गुरुवारी 28 सप्टेंबर बैठक होत आहे. या बैठकीत कंपनी महत्वाचा निर्णय घेणार आहे. निधी जमविण्यासाठी खास योजना आणण्यात येत आहे. अपार इंडस्ट्रीजचा शेअरने 26 सप्टेंबर रोजी 52 आठवड्यातील उच्चांकावर आहेत. कंपनीचा शेअरने 20 सप्टेंबर रोजी 5740 रुपये उच्चांक गाठला होता. हा रेकॉर्ड कंपनीने जमा केला.

1,75,000 टक्के जास्त वधारला कंपनीचा शेअर

अपार इंडस्ट्रीजचा शेअर 5ऑक्टोबर 2001 रोजी 3.23 रुपयांवर होता. कंपनीचा शेअर 26 सप्टेंबर 2023 रोजी 5850 रुपयावर पोहचला. कंपनीचा शेअर या कालावधीत 1,76,995 टक्के चढला. गेल्या दहा वर्षांत अपार इंडस्ट्रीजचा शेअर 6500 टक्क्यांहून अधिक उसळला. कंपनीचा शेअर या कालावधीत 87 रुपयांहून 5850 रुपयांवर पोहचला.  आता हा शेअर आणखी पल्ला गाठेल असा विश्वास तज्ज्ञांना वाटत आहे.

सूचना : हा शेअरचा केवळ लेखाजोखा आहे. या शेअरची कामगिरी आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्ही प्रमाणित गुंतवणूक सल्लागाराकडून सल्ला आवश्य घ्या. तुमचा कोणत्या ही प्रकारचा फायदा अथवा नुकसानीला TV9 मराठी जबाबदार नसेल.

गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्.
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त.
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य.
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?.
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा.
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार.
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'.