Gold Silver Price Update : सोने भिडले गगनाला! एक तोळ्याचा भाव ऐकून छातीत होईल धस्स
Gold Silver Price Update : सोन्याने मरगळ झटकून महागाईची गुढी उभारली आहे. फेब्रुवारी महिन्यात सोने आणि चांदीच्या किंमतींनी नवीन रेकॉर्ड केला होता. आता सोने त्याच वळणावर आले आहे. किंमती गगनाला भिडल्या आहेत.
नवी दिल्ली : सोन्याने मरगळ झटकून महागाईची गुढी उभारली आहे. फेब्रुवारी महिन्यात सोने आणि चांदीच्या किंमतींनी (Gold Silver Price) नवीन रेकॉर्ड केला होता. आता सोने त्याच वळणावर आले आहे. किंमती गगनाला भिडल्या आहेत. ऐन लग्न सराईत भाव वाढल्याने सर्वांच्याच तोंडचे पाणी पळाले आहे. यापूर्वी 2 फेब्रुवारी रोजी सोन्याच्या किंमती 58,880 रुपये तोळा तर चांदीने प्रति किलो 74,700 रुपये असा रेकॉर्ड ब्रेक भाव केला होता. त्यानंतर भावात प्रचंड घसरण झाली. सोने आणि चांदीचे दाम घसरले. पण या आठवड्यात सोन्याने प्रचंड उसळी घेतली आहे. चांदीच्या किंमतींनीही गुंतवणूकदारांची (Investors) चांदी झाली आहे. अमेरिकेतील घडामोडींचा मोठा परिणाम दिसून येत आहे. शेअर बाजार कोसळत आहे. तर अमेरिकेतील मोठ्या बँका धडाधड बंद होत आहे.
या आठवड्याच्या 13 मार्च रोजी सोमवारी सोने 1299 रुपये प्रति 10 ग्रॅमने महागले. हा भाव 56968 रुपयांवर पोहचला. तर यापूर्वी शुक्रवारी सोने (Gold Price Update) 383 रुपये प्रति 10 ग्रॅमने महागले होते. त्यावेळी भाव 55669 रुपये होता. मंगळवारी सोने 58,130 रुपये तोळा होते. बुधवारी हा भाव 58,140 रुपयांवर पोहचला. सोन्यासोबत चांदीनेही दरवाढीची सलामी दिली. सोमवारी चांदी 1875 रुपयांनी महागली. 63666 रुपये प्रति किलो हा भाव होता. शुक्रवारी हा भाव 61791 रुपये प्रति किलो होता. आज, 15 मार्च रोजी चांदी प्रति किलो 68,500 रुपये झाली.
गुडरिटर्न्सनुसार, सोने-चांदीने जोरदार मुसंडी मारली आहे. आज 15 मार्च, 2023 रोजी 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याच्या भावात मोठी उसळी दिसून आली. सोमवार आणि मंगळवारपेक्षा दोन्ही प्रकारच्या सोन्यात मोठी वाढ झाली. 22 कॅरेट एक तोळा सोने 53,310 रुपयांवर पोहचले तर 24 कॅरेट सोन्याने थेट 58,140 रुपये प्रति तोळा अशी उसळी घेतली.
भारतीय मानके संस्थेद्वारे शुद्ध सोन्यासाठी हॉलमार्क देण्यात येतो. 24 कॅरेट सोन्याच्या दागिन्यांवर 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916 तर 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 अंकीत असते. अनेक ठिकाणी ग्राहक 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याची आग्रहाने मागणी करतात. वायदे बाजार आणि आंतरराष्ट्रीय किंमतीत कुठलाही कर, घडवणीचा खर्च वा इतर शुल्क आकारण्यात येत नाही. त्यामुळे सराफा बाजारातील (Sarafa Bazar) भावात तफावत दिसते.
काही लोक 18 कॅरेट सोन्याचा वापर करतात. जेवढा कॅरेट सोने असेल, तेवढे सोने शुद्ध ठरते 24 कॅरेट सोने 99.9% शुद्ध असते. 22 कॅरेट सोने जवळपास 91 टक्के शुद्ध होते. 22 कॅरेट सोन्यात 9% इतर धातू असतात. दागिने तयार करण्यासाठी याचा वापर होतो. त्यात तांबे, चांदी, झिंक यांचा वापर करुन दागिने तयार करण्यात येतात. 24 कॅरेट सोने दमदार असते. पण त्याचा दागिने तयार करण्यासाठी वापर होत नाही.
- गुडरिटर्न्सनुसार, मुंबईत 22 कॅरेट सोन्याच्या भाव 53,160 रुपये आहे. तर 24 कॅरेट सोन्याचा दर 57,990 रुपये आहे.
- पुण्यात 22 कॅरेट सोन्याच्या भाव 53,160 रुपये, तर 24 कॅरेट सोन्याचा दर 57,990 रुपये आहे.
- नागपूरमध्ये 22 कॅरेट सोन्याच्या भाव 53,160 रुपये, तर 24 कॅरेट सोन्याचा दर 57,990 रुपये आहे.
- नाशिकमध्ये 22 कॅरेट सोन्याच्या भाव 53,190 रुपये, तर 24 कॅरेट सोन्याचा दर 58,030 रुपये आहे.