AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

या उन्हाळ्यात एसी उद्योग दुपटीनं वाढणार; 10 टक्क्यांहून अधिक होणार विक्री;वर्क फ्रॉर्म होममुळे खरेदी वाढली

भारतीय हवामान खात्याकडून एप्रिल आणि मे महिन्यात नेहमीच्या तापमानापेक्षा अधिक असणार आहे. त्यामुळे वोल्टास, हिताची, एलजी, पॅनासॉनिक आणि गोदरेज या कंपन्यांचा दावा आहे की, यावर्षी ही एसीच्या मागणीमध्ये वाढ होणार आहे. तर याआधी कोविड19 मुळे बाजारात अर्थसंकट उभा राहिले होते.

या उन्हाळ्यात एसी उद्योग दुपटीनं वाढणार; 10 टक्क्यांहून अधिक होणार विक्री;वर्क फ्रॉर्म होममुळे खरेदी वाढली
AC उत्पादनांच्या वस्तूत वाढ होण्याची शक्यताImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Apr 03, 2022 | 11:46 PM

मुंबईः एअर कंडिशननर (Air Conditioners) कंपन्यानी असा दावा केला आहे की, उन्हाळ्यात आता पारा वाढला तर कंपन्यांच्या उत्पादन विक्रीमध्ये दुप्पटीने वाढ होणार असल्याचा त्यांचा दावा आहे. उत्पादन विक्रीत वाढ झाली तर एअर कंडिशनर (AC) वस्तूंच्या किंमती या पाच टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे. यावर्षी उन्हाचा कडाका जस जसा वाढतो आहे, तसतसा एअर कंडिशनर कंपन्याचा (Companies) विश्वास दुणावू लागला आहे. वातावरणाचा पारा दिवसेंदिवस चढत राहिला तर एअर कंडिशनर कंपन्यांच्या उत्पादनांची विक्री दुप्पटीने होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे घरगुती एसीच्या किंमतीमध्ये पाच टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे.

भारतीय हवामान खात्याकडून एप्रिल आणि मे महिन्यात नेहमीच्या तापमानापेक्षा अधिक असणार आहे. त्यामुळे वोल्टास, हिताची, एलजी, पॅनासॉनिक आणि गोदरेज या कंपन्यांचा दावा आहे की, यावर्षी ही एसीच्या मागणीमध्ये वाढ होणार आहे. तर याआधी कोविड19 मुळे बाजारात अर्थसंकट उभा राहिले होते.

तांबे, अल्युमिनियम महाग

या वस्तूंचे सुटे भाग, धातू आणि विशेषतः तांबे, अल्युमिनियम आणि कच्चा तेलाच्या वाढत्या किंमतीमुळे या वस्तुंच्या किंमतीत वाढ होणार असल्याचे कंपन्यांनी सांगितले आहे.

कंपन्या देत आहेत अनेक ऑफर आणि EMI चा पर्याय

टाटा उद्योग समुहाच्या वोल्टास कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप बक्शी यांनी सांगितेल की, मागील वर्षी व्यवसायातील वृद्धी दहा आकडी करण्यासाठी प्रचंड मेहनत करावी लागली आहे. त्यामुळे त्यांना असे वाटते गेल्या महामारीमुळे लोकांनी एसीसारख्या वस्तू खरेदी केल्या नाहीत, त्यामुळे या वातावरणात ग्राहक या वस्तू खरेदी करणारच आहेत, त्यामुळे कंपन्यांकडून वेगवेगळ्या ऑफर्स देण्यात आल्या आहेत.

वस्तुंच्या किंमतीत फक्त 15 टक्क्यांनीच वाढ

सध्या वातावरणात उन्हाचा प्रचंड कडाका असल्याने या वातावरणात एसीसारख्या वस्तूंच्या खरेदीत 30 ते 40 टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता त्यांनी सांगितली आहे. सीईएएमएच्या अध्यक्ष एरिक ब्रेगेंझा यांनी सांगितले की, मागील काही वर्षात या उत्पादनांच्या किंमतीमध्ये आम्ही वाढ केली नाही, त्यातच महामारीच्या काळात कंपन्यांची आर्थिक अवस्था नाजूक झाली. त्यामुळे गेल्या काही दिवसात या वस्तुंच्या किंमतीत फक्त 15 टक्क्यांनीच वाढ झाली आहे.

एसीच्या किंमतीत फरक

जॉनसन अंतर्गत असणारी हिताची ही एअर कंडिशनिंग इंडिया या कंपनीचे मत आहे की, वर्क फ्रॉर्म होम ही संस्कृतीही उद्योगाच्या विकासाला चालना देणारी आहे. दुसऱ्या वस्तुंच्या वाढत्या किंमतीमुळे एप्रिल महिन्यापर्यंत उत्पादनांच्या किंमतीमध्ये तीन ते चार टक्क्यांनी वाढणार आहेत.  3 स्टार असणाऱ्या इन्वर्टर स्लिट एसीची किंमत 33,500 रुपये होती, त्याचीच किंमत आता 36,000 पासून 37,000 पर्यंत झाल्या आहेत.

लॉकडाऊनचा मोठा परिणाम

गोदरेज अप्लायन्स प्रमुख कार्यकारी उपाध्यक्ष कमल नंदी यांनी सांगितले की, कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे गेले दोन उन्हाळे हे कंपनीसाठी वाईट होते, कारण या काळात ग्राहकांकडून उत्पादनांची खरेदी झालीच नाही. तर अनेक कंपन्यांकडून वर्क फॉर्म होमची संस्कृती उदयास आणली गेल्याने आणि वातावरणात प्रचंड कडाका वाढल्याने एसीच्या विक्रीत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

संबंधित बातम्या

Raj Thackeray : राज ठाकरेंच्या भेटीला नितीन गडकरी, “शिवतीर्थ”वरील भेटीत युतीची चर्चा?

Sri Lanka: एक अंड 30 रुपये, 1 किलो बटाटी 200 रुपये! जगायचं तरी कसं? श्रीलंकेतील जनतेसमोर प्रश्नच प्रश्न

Nalasopara Crime : पाकिट चोरल्याच्या संशयातून नालासोपाऱ्यात भर रस्त्यात जमावाकडून महिलेला मारहाण

अणुबॉम्बची धमकी देणं सोप्प आहे, पण.. ; पाकिस्तानबद्दल जी. डी. बक्षी या
अणुबॉम्बची धमकी देणं सोप्प आहे, पण.. ; पाकिस्तानबद्दल जी. डी. बक्षी या.
घोडा आणि खेचर पुरवणाऱ्यांचेही जबाब नोंदवणार
घोडा आणि खेचर पुरवणाऱ्यांचेही जबाब नोंदवणार.
पाकिस्तानी पत्रकारांवर कारवाई, आता भारतात टिव-टिव बंद, कारण नेमकं काय?
पाकिस्तानी पत्रकारांवर कारवाई, आता भारतात टिव-टिव बंद, कारण नेमकं काय?.
देशातील काही यूट्यूब चॅनेल बंद करण्याचे केंद्राचे आदेश
देशातील काही यूट्यूब चॅनेल बंद करण्याचे केंद्राचे आदेश.
Pahalgam Attack : संयुक्त राष्ट्रसंघात भारतानं केली पाकिस्तानची पोलखोल
Pahalgam Attack : संयुक्त राष्ट्रसंघात भारतानं केली पाकिस्तानची पोलखोल.
भारतीय फोन नंबर वापरून आयएसआय काढतंय लष्कराची माहिती
भारतीय फोन नंबर वापरून आयएसआय काढतंय लष्कराची माहिती.
नाक दाबलं की तोंड उघडतं.,'सिंधू जल' स्थगितीवर काय म्हणाले अण्णा हजारे?
नाक दाबलं की तोंड उघडतं.,'सिंधू जल' स्थगितीवर काय म्हणाले अण्णा हजारे?.
1 हजार भारतीय नागरिक मायदेशी परतले, 800 पाकिस्तान्यांनी भारत सोडला
1 हजार भारतीय नागरिक मायदेशी परतले, 800 पाकिस्तान्यांनी भारत सोडला.
बदलापूर रेल्वे स्थानकावर चेंगराचेंगरी! प्रवाशांचा संताप अन् एकच मागणी
बदलापूर रेल्वे स्थानकावर चेंगराचेंगरी! प्रवाशांचा संताप अन् एकच मागणी.
पहलगाम हल्ल्यातल्या 'त्या' झिपलाइन ऑपरेटरला एनआयएने ताब्यात घेतलं
पहलगाम हल्ल्यातल्या 'त्या' झिपलाइन ऑपरेटरला एनआयएने ताब्यात घेतलं.