घर बसल्या PPF, SSY खात्यात पैसे होतील जमा, अशा पध्दतीने इंटरनेट- मोबाईल बँकिंग करा ॲक्टिव्हेट
पोस्ट ऑफिसची इंटरनेट बँकिंग तुम्हाला तुमच्या स्वतःच्या आणि थर्ड पार्टी पोस्ट ऑफिस बचत खात्यांमध्ये पैसे हस्तांतरित करण्यात मदत करू शकते, या लेखात त्याबद्दलची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत, शिवाय या माध्यमातून तुमच्या वेळेची कशी बचत होईल याचीही माहिती घेउया...
पोस्ट ऑफिसचे (post office) बचत खातेधारक (savings account) इंडियन पोस्टद्वारे प्रदान केलेल्या इंटरनेट बँकिंग सेवेचा वापर करु शकणार आहेत. हा पोस्ट विभागाचाच भाग असून या माध्यमातून पोस्ट ऑफिस इंटरनेट बँकिंगच्या माध्यमातून तुम्हाला तुमचे पोस्ट ऑफिस बचत खाते आणि थर्ड पार्टीच्या पोस्ट ऑफिस बचत खात्यामध्ये पैसे ट्रान्सफर करण्यास मदत होईल. तुम्ही तुमच्या पीपीएफ (PPF) आणि सुकन्या समृद्धी खात्यात इतर अनेक सेवांसह पैसे जमा करू शकता. दरम्यान, या सेवांचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला काही अटींची पूर्तता करावी लागणार आहे. इंडिया पोस्ट इंटरनेट बँकिंगचा लाभ घेण्यासाठीच्या आवश्यक बाबी या लेखातून समजून घ्या.
इंडिया पोस्ट वेबसाइटनुसार, खातेधारकांना इंटरनेट बँकिंग सेवेचा लाभ घेण्यापूर्वी त्यांना काही अटींची पुर्तता करावी लागणार आहे. खातेदाराचे सीबीएस सब पोस्ट ऑफिस किंवा हेड पोस्ट ऑफिसमध्ये व्हेलिड अॅक्टिव्ह सिंगल किंवा जॉइंट बीबी बचत खाते असणे आवश्यक आहे. दरम्यान, इंटरनेट बँकिंग या योजनेचा लाभ घेण्यासाठी शाखा पोस्ट ऑफिसचे खाते पात्र ठरणार नाहीत. या योजनेसाठी आवश्यक KYC झालेली कागदपत्रे द्यावी लागणार आहेत. जर तुम्ही आधीच त्यांची पूर्तता केली असेल तर ते पुन्हा देण्याची आवश्यकता राहणार नाही. त्याच बरोबर वैध मोबाइल नंबर, ईमेल आणि पॅन क्रमांक देणे आवश्यक आहे.
इंटरनेट बँकिंगसाठी नोंदणी अशी करा
1. तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिसला भेट देऊन अर्ज भरा, तुम्हाला तुमच्या नोंदणीकृत मोबाइल नंबरवर 48 तासांच्या आत एसएमएस अलर्ट मिळेल. 2. एसएमएस प्राप्त केल्यानंतर, DOP इंटरनेट बँकिंग पोर्टलवर जावे आणि होम पेजवर न्यू युजर ॲक्टिवेशन हायपर लिंकवर क्लिक करा. 3. ग्राहक आयडी आणि खाते आयडी प्रविष्ट करा. 4. आवश्यक माहिती भरा आणि तुमचे इंटरनेट बँकिंग लॉगिन आणि ट्रांझॅक्शन पासवर्ड सारखा नसल्याची खात्री करा. 5. आता लॉगिन करा आणि सिक्युरीटी प्रश्न आणि उत्तरासह आपला पासवर्ड सेट करा.
या खात्यांमध्ये ऑनलाइन व्यवहार
तुमच्या पीओएसबी खात्यातून तुमच्या किंवा कोणत्याही थर्ड पार्टीच्या इतर पीओएसबी खात्यांमध्ये पैसे हस्तांतरित केला जाऊ शकता. पीपीएफ डिपॉझिट आणि काढणे, आरडी डिपॉझिट, पैसे काढण्याची परतफेड, त्याच सोबत पैसे सुकन्या समृद्धी खात्यातही जमा केले जाऊ शकतात. याशिवाय, इंटरनेट बँकिंगद्वारे आरडी आणि टाइम डिपॉझिट खाती उघडता येतात. सध्याच्या पीओएसबी नियमांनुसार आरडी आणि टीडी खाती बंद केली जाऊ शकतात.