रणवीर सिंहची दिवाळीत छप्परफाड कमाई, दोन फ्लॅटची केली विक्री

Ranveer Singh Property | आपल्या हटके स्टाईलने रणवीर सिंग तरुणाईच्या गळ्यातील ताईत झाला आहे. या बॉलिवूड अभिनेत्याने दिवाळीत जोरदार कमाई केली. मुंबईतील दोन अपार्टमेंट्ची विक्री करुन त्याला कोट्यवधींचा फायदा झाला. डिसेंबर 2014 मध्ये त्याने ही मालमत्ता खरेदी केली होती. त्यांच्या विक्रीतून त्याने बक्कळ कमाई केली.

रणवीर सिंहची दिवाळीत छप्परफाड कमाई, दोन फ्लॅटची केली विक्री
Follow us
| Updated on: Nov 11, 2023 | 10:13 AM

मुंबई | 11 नोव्हेंबर 2023 : बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग त्याच्या हटके स्टाईलने तरुणाईच्या गळ्यातील ताईत झाला आहे. या दिवाळीत तर त्याला लॉटरी लागली. मालमत्ता विक्रीतून त्याने जोरदार कमाई केली. मनीकंट्रोलच्या एका रिपोर्टनुसार, मुंबईतील गोरेगाव परिसरातील दोन फ्लॅट्सची त्याने विक्री केली. त्यातून बक्कळ कमाई झाली. हे दोन्ही प्लॅट्स (Ranveer Singh Sold Flats) त्याने 15.25 कोटी रुपयांना विक्री केले. ऑनलाईन प्रॉपर्टी कन्सल्टेन्सी IndexTap.com नुसार, डिसेंबर 2014 मध्ये रणवीर सिंग याने हे दोन फ्लॅट खरेदी केले होते. 4.64 कोटी रुपये प्रति फ्लॅट खरेदी केला होता. दहा वर्षांतच त्याने या विक्रीतून मोठी कमाई केली.

स्टॅम्प ड्युटीवर इतके रुपयांचा खर्च

हे दोन्ही फ्लॅट्स मुंबईमधील गोरेगाव येथील ओबेरॉय रिअल्टीच्या प्रोजेक्ट, Oberoi Exquisite मधील आहेत. फ्लॅटच्या स्टॅम्प ड्युटीचा विचार करता प्रति फ्लॅट त्यावर 45.75 लाख रुपयांचे मु्द्रांक शुल्क आहे. कागदपत्रानुसार, या सदनिकेचे क्षेत्रफळ एकूण 1,324 चौरस फूट आहे. या फ्लॅटचे एकूण 6 वाहनतळ आहेत. प्रशस्त पार्किंग स्पेस आहेत. हे फ्लॅट्स हाऊसिंग कॉम्पलेक्समधील व्यक्तीनेच खरेदी केला आहे.

हे सुद्धा वाचा

रणवीर सिंहने खरेदी केला 119 कोटींचा फ्लॅट

रणवीर सिंहने 2022 मध्ये मुंबईतील वांद्रे परिसरात quadruplex फ्लॅटची खरेदी केली. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या फ्लॅट्सची किंमत जवळपास 119 कोटी रुपये होती. या फ्लॅट्सला रणवीर सिंह यांचे वडील जगजीत सुंदर सिंह भवनानी आणि त्यांची कंपनी Oh Five Oh Media Works LLP ने खरेदी केले होते. कंपनीत हे दोघेही संचालक पदावर आहेत. या मालमत्तेचा करार 118.94 कोटी रुपयात झाला होता. या मालमत्तेसाठी 7.13 कोटी रुपयांचे मुद्रांक शुल्क अदा करण्यात आले होते.

या कलाकारांनी पण केली फ्लॅट्सची विक्री

रणवीर सिंह याच्याशिवाय काही दिवसांपूर्वी अक्षय कुमार आणि सोनम कपूर यांनी मोठी प्रॉपर्टी डील केली होती. सोनम कपूरने वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये 5,000 चौरस फूट पेक्षा जास्त असलेला फ्लॅट 32 कोटी रुपयांना विक्री केली होती. तर अक्षय कुमार याने 1200 चौरस फूटाहून अधिकचा फ्लॅट 6 कोटी रुपयांना विक्री केला. ही मालमत्ता विक्री गेल्यावर्षी झाली.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.