AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अदानी आता अमोनिया आणि ग्रीन हायड्रोजनमधून करणार कमाई, जपानी कंपनीशी डील

अदानी ग्रुप ग्रीन अमोनिया आणि ग्रीन हायड्रोजन क्षेत्रात उतरणार आहे. त्यासाठी जपानी कंपनीशी जॉइंट वेंचर करण्यात आले आहे. अदानी एंटरप्राईझेस म्हटले आहे की या जॉइंट वेंचरमध्ये दोन्ही कंपन्यांचे समसमान शेअर असतील.

अदानी आता अमोनिया आणि ग्रीन हायड्रोजनमधून करणार कमाई, जपानी कंपनीशी डील
adani Image Credit source: socialmedia
| Updated on: Sep 09, 2023 | 1:02 PM
Share

नवी दिल्ली | 9 सप्टेंबर 2023 : अब्जाधीश गौतम अदानी आता  ग्रीन अमोनिया आणि हायड्रोजन क्षेत्रात गुंतवणूक करणार आहेत. अदानी ग्रुपचे चेअरमन गौतम अदानी यांची अदानी एंटरप्राईझेसची उपकंपनी अदानी ग्लोबल पीटीई लिमिटेडने ( सिंगापूर ) जपानच्या कोवा होल्डींग्स एशिया पीटीई लिमिटेड ( सिंगापूर ) सोबत करार केला आहे. या दोन कंपन्यांदरम्यान एक जॉईंट वेंचर डील झाली आहे. त्यानूसार एका नव्या कंपनीची स्थापना करण्यात आली आहे. ही कंपनी अमोनिया आणि हायड्रोजन उद्योगात गुंतवणूक करणार आहे.

अदानी ग्रुपची नवीन कंपनी ग्रीन अमोनिया आणि ग्रीन हायड्रोजन क्षेत्रात उतरणार आहे. ही कंपनी ग्रीन अमोनिया आणि ग्रीन हायड्रोजन तसेच त्यांच्याशी संबंधीत शेअर स्टॉकची विक्री आणि मार्केटींगवर लक्ष केंद्रीत करणार आहे. याचे प्रोडक्शन आणि सप्लाय अदानी ग्रुपद्वारा केला आहे. अदानी एंटरप्राईझेस म्हटले आहे की जॉईंट वेंचर डीलद्वारे सिंगापूरमध्ये एक स्वतंत्र कंपनी स्थापन करण्यासाठी रुपरेषा निश्चित करणार आहे.

अदानी एंटरप्राईझेस म्हटले आहे की या जॉइंट वेंचरमध्ये दोन्ही कंपन्यांचे समसमान शेअर असतील. ज्यात अदानी ग्लोबल पीटीई लिमिटेड ( एजीपीटीई ) आणि कोवा दोन्ही कंपन्यांचे जॉइंट वेंचर कंपनीमध्ये 50-50 टक्के हिस्सेदारी असणार आहे. अदानी एंटरप्राईझेसची सबसिडी कंपनी अदानी न्यू इंडस्ट्रीज लिमिटेडने ( एएनआयएल ) गुजरातमधील आपल्या खावडा आणि मुंद्रा एसईझेड फॅसिलीटीमध्ये ग्रीन हायड्रोजन आणि त्याच्या संबंधीत डाऊनस्ट्रीम उत्पादने उदा. अमोनिया, युरिया, मेथनॉल आणि इथेनॉल यांचे उत्पादन करण्याची योजना आखली आहे.

2.5 दशलक्ष टन ग्रीन एच 2 चे प्रोडक्शन

गुजरातच्या खावडा येथे 71 हजार एकर जमिन आहे. येथे पवन चक्की आणि सौरऊर्जेतून 20 गीगावॅट अपारंपिक ऊर्जा क्षमता आहे. कंपनीची योजना आहे की खावडामध्ये वार्षिक 2030-31 पर्यंत 2.5 दशलक्ष टन ग्रीन एच 2 चे उत्पादन करण्यासाठी क्षारीय आणि PEM इलेक्ट्रॉलिसिस प्रोसेसचा उपयोग करण्याची आहे. कंपनी तिच्या अपारंपारिक ऊर्जा क्षमतेचा वापर करुन एनर्जी एक्सट्रॅक्शनच्या कमी गुंतवणूकीबाबत आश्वस्त आहे. त्यामुळे कंपनीला 3.16 प्रति किलोग्रॅम ऑपरेशन कॉस्टमध्ये हायड्रोजनचे उत्पादन करण्यासाठी मदत मिळणार आहे.

त्यांच्यासोबत जाणं परवडणारं नाही! मलिकांबाबत शिरसाट यांचं मोठं विधान
त्यांच्यासोबत जाणं परवडणारं नाही! मलिकांबाबत शिरसाट यांचं मोठं विधान.
सुप्रिया सुळेंकडून मुख्यमंत्र्यांचे तोंडभरून कौतुक! म्हणाल्या...
सुप्रिया सुळेंकडून मुख्यमंत्र्यांचे तोंडभरून कौतुक! म्हणाल्या....
नाना पटोलेंचा भाजपवर सत्तेतून आमदार विकत घेतल्याचा आरोप
नाना पटोलेंचा भाजपवर सत्तेतून आमदार विकत घेतल्याचा आरोप.
हिंगोलीत कॉंग्रेसला खिंडार! प्रज्ञा सातव यांचा भाजपात प्रवेश
हिंगोलीत कॉंग्रेसला खिंडार! प्रज्ञा सातव यांचा भाजपात प्रवेश.
नागपूर सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी!
नागपूर सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी!.
ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा
ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा.
दोन मंत्री गेले, हा काळिमा! राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप
दोन मंत्री गेले, हा काळिमा! राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप.
त्यांना पुन्हा मंत्री करणं सोपं नाही! संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले
त्यांना पुन्हा मंत्री करणं सोपं नाही! संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले.
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!.
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!.