Adani Train : बंदरे, विमानतळे अदानींच्या खिशात, आता रेल्वे सेक्टरमध्ये चालविणार शिक्का
Adani Train : यावेळी देशातील सर्वात मोठी पोर्ट आणि एअरपोर्ट ऑपरेटर कंपनी अदानी समूह आहे. रेल्वे सेक्टरमध्ये पण ही कंपनी आता शिक्का आजमाविणार आहे. काय आहे या समूहाचा प्लॅन..
नवी दिल्ली : उद्योगपती गौतम अदानी (Gautam Adani) यांचा समूह देशातील सर्वात मोठा पोर्ट आणि एअरपोर्ट ऑपरेटर आहे. आता अदानी समूह रेल्वे सेक्टरमध्ये पण नशीब आजमाविणार आहे. अदानी समूहाची फ्लॅगशिप कंपनी अदानी एंटरप्राईजेस या सेक्टरमध्ये मोठ्या गुंतवणुकीच्या तयारीत आहे. अदानी समूह रेल्वे सेक्टरमध्ये शिक्का आजमाविणार आहे. यावर्षी 24 जानेवारी 2023 रोजी अदानी समूहावर हिंडनबर्ग रिसर्च (Hindenburg Research) या अमेरिकन शॉर्टसेलर कंपनीने गंभीर आरोप केले होते. त्यानंतर अदानी समूह गडगडला होता. या कंपनीचे सर्वच शेअर कोसळले होते. पण गेल्या महिनाभरापासून हा समूह बराच ट्रॅकवर आला आहे. आता हा समूह रेल्वे सेक्टरमध्ये कमाल करणार आहे.
अदानी समूहाचे पुढचे पाऊल अदानी समूह स्टार्क एंटरप्राईजेस ही कंपनी खरेदी करण्याच्या तयारी आहे. या कंपनीची 100 हिस्सेदारी खरेदी करण्याचा समूहाची योजना आहे. ही कंपनी ऑनलाईन ट्रेन तिकिट बुकिंग करणाऱ्या ट्रेनमॅन (Trainman) प्लॅटफॉर्मला ऑपरेट करते. ऑनलाईन ट्रेन तिकिट बुकिंगमध्ये केंद्र सरकारच्या कंपनीची, IRCTC ची एकाधिकारशाही आहे. पण ट्रेनमॅनच्या माध्यमातून तुम्हाला तिकिट बूक करता येते. तसेच इतर ही सुविधा मिळतात. अनेक ट्रॅव्हल आणि टूर ऑपरेटर वेबसाईट त्यांच्या पेजवरुन तिकिट बुकिंगची सेवा देतात.
डिजिटल लॅबचा भाग अधिग्रहणाच्या प्रक्रियेनंतर ट्रेनमॅन अदानी समूहाची एक कंपनी असेल. अदानी डिजिटल लॅब या अंतर्गत ही कंपनी काम करेल. अदानी एंटरप्राईजेसच ही एक उपकंपनी आहे. अदानी समूहाने शेअर बाजाराला याविषयीची अपडेट कळवली आहे. स्टार्क एंटरप्राईजेसमध्ये 100 टक्के हिस्सेदारी खरेदीसाठी एक शेअर खरेदी करण्याचा करार करण्यात आला आहे. अद्याप या कराराविषयी संपूर्ण खुलासा करण्यात आलेला नाही.
काय आहे डिजिटल लॅब अदानी डिजिटल लॅब हा अदानी समूहाचा भविष्यातील व्यवसाय आहे. या लॅबअंतर्गत कंपनी ॲप डिझायनिंग, युझर इंटरफेस डिझाईन, एसईओ, रिसर्च आणि ॲनालिसिस सारखी काम करत आहे. तर या कंपनीची अदानी वन यावर सुद्धा सुपर ॲप अंतर्गत काम सुरु आहे.
गुरुग्राम येथून ट्रेनमॅनचा कारभार स्टार्क एंटरप्राइजेजचा ट्रेनमॅन प्लेटफॉर्म आयआरसीटीसीचे अधिकृत ऑनलाईन तिकिट बुकिंग प्लॅटफॉर्म आहे. या प्लॅटफॉर्मची सुरुवात आयआयटी रुरकीतून उत्तीर्ण विनीत चिरानिया आणि करण कुमार यांनी सुरु केली होती. कंपनी सध्या गुरुग्राम येथून ट्रेनमॅनचा सर्व कारभार पाहते. स्टार्क एंटरप्राईजेसने अमेरिकेतून 10 लाख डॉलरचा निधी जमा केला आहे.