आपल्या रुपयाचं सोडा, तिकडे शेजारच्या देशाचे चलन आघाडीवर, अमेरिकन डॉलरशी स्पर्धा, पाहा काय घडलंय

जगात सर्वात ताकदवान चलन म्हणून अमेरिकेच्या डॉलरकडे पाहीले जाते. परंतू इतर देशांची चलने देखील महागडी चलनं म्हणून ओळखली जातात. त्यातच आपल्या शेजारील देशाच्या चलनाने तिमाहीत कमालच केली.

आपल्या रुपयाचं सोडा, तिकडे शेजारच्या देशाचे चलन आघाडीवर, अमेरिकन डॉलरशी स्पर्धा, पाहा काय घडलंय
currency note
Follow us
| Updated on: Sep 27, 2023 | 9:22 PM

नवी दिल्ली | 27 सप्टेंबर 2023 : जर जगातीस सर्वात मजबूत चलन म्हटले की आपल्याला अमेरिकन डॉलरकडे पहावे लागते. पौंड, युरो आणि दिनारबाबतही तुम्ही विचार करु शकता. परंतू ज्या देशाच्या चलनाने अक्षरश: अमेरिकन डॉलरलाही या तिमाहीत कामगिरीत मागे टाकलंय,  त्या देशाचे नाव ऐकून तुम्हाला धक्काच बसेल. सगळ्या देशांच्या करन्सीला मागे टाकत आपल्या शेजारील देशाच्या या चलनाने नंबर वन पटकावला आहे.

आपला शेजारील नेहमी युद्धग्रस्त असलेल्या आणि तालिबानी शासन असलेल्या अफगाणिस्तानने ही कमाल केली आहे. ब्लुमबर्गच्या अहवालानूसार अफगाणिस्तानचे चलन सप्टेंबर तिमाही दरम्यान जगातील सर्वात चांगली कामगिरी करणारे चलन ठरले आहे. परंतू 26 सप्टेंबरच्या आकड्यानूसार डॉलरच्या तुलनेत अफगाणी चलनाचे व्हॅल्यू 78.25 इतके आहे. म्हणजेच एका डॉलर म्हणजे 78.25 अफगानीच्या व्हॅल्यूबरोबर आहे.

भारतीय रुपयाचं काय ?

भारतीय रुपयाचा विचार केला डॉलरच्या तुलनेत रुपया 83.27 वर आहे. म्हणजे एक डॉलरसाठी 83.27 रुपये मोजावे लागतील. म्हणजे अफगाणीची किंमत सध्या भारतीय रुपयांपेक्षा किंचित जादा आहे. विनिमय दरानूसार एक अफगानी मध्ये 1.06 भारतीय रुपये येतील. अफगाणिस्तानचे चलन मजबूतीचे कारण म्हणजे तालिबानी शासनाने चलन मजबूतीसाठी केलेले प्रयत्न आणि दुसरे कारण तालिबानी राजवटीमुळे सामाजिक आणि आर्थिक स्थितीमुळे जगभरातून मिळत असलेल्या आर्थिक मदतीमुळे अफगाणी करन्सीची किंमत वाढली आहे.

या कारणाने अफगाणी चलन मजबूत

सप्टेंबरच्या तिमाहीत अफगाणिस्तानचे चलन अफगाणीच्या किंमतीत 9 टक्के वाढ झाली आहे. ही वाढ जगातील कोणत्याही चलनाच्या तुलनेत जादा आहे. ब्लुमबर्गच्या आकड्यानूसार सप्टेंबरच्या तिमाहीत कोलंबियाच्या करन्सी पेसो दुसऱ्या क्रमांकावर आहे. या तिमाहीत पेसोचा भाव 3 टक्के वाढला आहे. वार्षिक कामगिरीचा विचार केला तर गेल्या एक वर्षांतील सर्वात मजबूत करन्सी पेसो आहे. दुसऱ्या क्रमांकावर श्रीलंकाचे चलन आहे. आणि या बाबतीत तिसऱ्या क्रमांकावर अफगाणी चलन आहे.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.