7 वर्षानंतर एलॉन मस्क पहिल्यांदाच भेटले वडिलांना, कुटुंबियांना अश्रू अनावर

Elon Musk | जगातील सर्वात श्रीमंत माणूस म्हणजे एलॉन मस्क, संपत्ती त्याच्या पायाशी लोळण घेते. तो म्हणजे एक वेगळंच रसायन आहे. त्यांच्याविषयी अनेक दंतकथा आहेत. त्याच्या विचित्र निर्णयाचा, ट्विटरच्या रुपाने जगाने अनुभव घेतला आहे. आता एका भावनिक मुद्याने त्याच्या खासगी आयुष्यातील एक पदर उलगडला आहे.

7 वर्षानंतर एलॉन मस्क पहिल्यांदाच भेटले वडिलांना, कुटुंबियांना अश्रू अनावर
Follow us
| Updated on: Nov 25, 2023 | 2:55 PM

नवी दिल्ली | 25 नोव्हेंबर 2023 : जगातील सर्वात श्रीमंत माणूस, अब्जाधीश, काही देशांच्या जीडीपीपेक्षा ज्याची संपत्ती अधिक आहे असा गर्भश्रीमंत व्यक्ती म्हणजे एलॉन मस्क. त्याच्या विचित्र स्वभावाच्या अनेक दंतकथा सर्वत्र चविने चघळल्या जातात. त्याच्याविषयी अनेक समज-गैरसमज आहे. त्याच्या अनेक प्रयोगांची खिल्ली उडवली जाते. पण तो उत्साही, प्रयोगशील आहे. त्याच्या खासगी आयुष्याविषयीची एक मोठी अपडेट समोर आली आहे. 7 वर्षानंतर एलॉन मस्क पहिल्यांदाच वडिलांना भेटल्याचे समोर आले आहे. या भावनिक घटनेला अनेक पदर आहेत. पण बापलेकाच्या या भेटीने कुटुंबियांना त्यांचे अश्रू काही रोखता आले नाही. त्यांच्या अश्रूंची फुले झाली आहेत.

अशी झाली भेट

SpaceX ने गेल्या आठवड्यात Starship सुरु केली. त्यावेळी एक कार्यक्रमात आयोजीत करण्यात आला. या कार्यक्रमात जगातील अब्जाधीशाची आणि त्याच्या वडिलांची भेट झाली. एलॉन मस्क आणि वडील एरॉल मस्क यांची भेट झाली. द सनच्या मते, टेक्सासमधील बोका चिका येथे दोघांमध्ये भेट झाली. त्यावेळी एरॉल मस्क हे त्यांची यापूर्वीची पत्नी हेइडे आणि नात कोरा हिच्यासोबत दिसले. गेल्या सात वर्षातील ही बापलेकांची पहिली भेट होती. Starship आतापर्यंतचे सर्वात मोठे रॉकेट मानण्यात येते. त्याचे प्रक्षेपण एलॉन मस्क यांची SpaceX ही अंतराळविज्ञानसंबंधी काम करणारी संस्था करणार आहे.

हे सुद्धा वाचा

पिता-पुत्रात अढी

गेल्या काही वर्षांपासून एलॉन आणि एरॉल यांच्यात मतभेद होते. दोघे पण एकमेकांशी बोलत नव्हते. पण दोघांनी वादावर पडदा टाकला. दोघे एकमेकांना भेटले. त्यांनी मतभेदांना तिलांजली दिली. गेल्यावेळी 2016 मध्ये दोघांची शेवटची भेट झाली होती. त्यावेळी एलॉन यांनी भावासोबत त्यांच्या वडिलांचा, एरॉल यांचा 70 वा वाढदिवस कुटुंबियासोबत साजारा केला होता.

कुटुंबियांना भेटीचा उमाळा

एलॉनने या कार्यक्रमासाठी वडिलांना खास निमंत्रण दिले होते. एरॉल हे दाखल होताच. दोघे एकमेकांना भेटले. दोघांनी एकमेकांशी मनसोक्त गप्पा मारल्या. त्यांच्यात बेबनाव होता, असे कोणी सांगितले तर त्यांना पण अविश्वास वाटावा, असे दोघांना भेटले. या भेटीने कुटुंबियांना हुंदके आवरता आले नाही. अश्रू घळघळा ओघळले. या भेटीने कुटुंबातील सर्व सदस्यांना मोठा आनंद झाला. त्यांनी हा आनंदाचा क्षण साजरा केला.

शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.