केंद्र सरकार आता स्वस्तात गव्हाचे पीठ विकणार, पाहा कुठे मिळणार ‘भारत आटा’

वाढत्या महागाईमुळे केंद्र सरकार स्वस्तात गव्हाचे पीठ विकणार आहे. याआधी सरकार डाळीचे भाव कडाडल्याने भारत डाळ विकली होती. आता भारत आटा विकण्याची तयारी सरकारने केल्याचे समजते.

केंद्र सरकार आता स्वस्तात गव्हाचे पीठ विकणार, पाहा कुठे मिळणार 'भारत आटा'
wheat flourImage Credit source: socialmedia
Follow us
| Updated on: Nov 01, 2023 | 9:39 PM

मुंबई | 1 नोव्हेंबर 2023 : यंदा गव्हाचे भाव चांगलेच वाढले आहे. गव्हाच्या पिकांची कापणी झाली तेव्हा खुल्या भावात सुटे ब्रॅंड नसलेले गव्हाचे पीठ 30 रुपये किलो विकले जात होते. आता गव्हाच्या पीठाचा भाव 35 रुपये किलो इतका वाढला आहे. तर ब्रॅंडेड गव्हाचे पीठ 40-50 रुपये किलो विकले जात आहे. एमपी गव्हाच्या पीठाचे भाव तर खूपच जादा आहेत. केंद्र सरकारने गव्हाच्या पीठाचा वाढता दर पाहून स्वस्तात गव्हाचे पीठ विकण्याचा निर्णय घेतला आहे. स्वस्त गव्हाच्या पीठाची विक्री या महिन्याच्या सात तारखेपासून होणार आहे.

केंद्रीय ग्राहक विभागाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की सरकारी गव्हाच्या पीठाची विक्री ‘भारत ब्रॅंड’ अंतर्गत होणार आहे. त्याचा दर 27.50 रुपये प्रति किलोग्रॅम असणार आहे. या संदर्भात आणखी विचारविनिमय होणार आहे. त्यासाठी राष्ट्रीय ग्राहक सहकारी संघाला ( NCCF ) नोडल एजन्सी म्हणून नियुक्त केले जाऊ शकते. भारत ब्रॅंड आट्यासाठी भारतीय अन्न महामंडळ ( FCI ) अडीच लाख टन गव्हाचा पुरवठा करणार आहे. या गव्हाचे पीठ करून 10 आणि 30 किलोची पॅकींग करून विक्री केली जाणार आहे.

डाळीचे भाव वाढल्यानंतर केंद्र सरकारने 17 जुलै 2023 पासून भारत ब्रॅंडने चणा डाळ विकायला सुरुवात केली होती. भारत डाळीची एक किलोग्रॅमची किरकोळ विक्रीची पाकिटे तयार केली होती. ही चण्याची डाळ 60 रुपये किलो दराने विकली जात आहे. जर कोणी 30 किलो डाळ विकत घेणार असेल तर त्यांना 55 रुपये किलो दराने डाळ मिळते.

अशी होणार स्वस्त गव्हाच्या पीठाची विक्री

भारत आटाचे वितरण भारतीय राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन संघ लि. (नाफेड ), राष्ट्रीय ग्राहक सहकारी संघ ( एनसीसीएफ ), केंद्रीय भांडार आणि सफल यांच्या किरकोळ विक्री केंद्रातून केली जाऊ शकते. या योजनेतून स्वस्त गव्हाचे पीठ राज्य सरकारना त्यांच्या कल्याणकारी योजना, पोलिस, कारागृहांतर्गत पुरवठ्यासाठी पुरविले जाणार आहे. सहकारी संस्थामार्फत तसेच महामंडळामार्फत देखील या स्वस्त गव्हाच्या पीठाची विक्री केली जाऊ शकते.

अमित ठाकरे विधानसेभेच्या रिंगणात? 'या'पैकी एका जागेवर निवडणूक लढवणार?
अमित ठाकरे विधानसेभेच्या रिंगणात? 'या'पैकी एका जागेवर निवडणूक लढवणार?.
राहुल गांधींची जीभ छाटणाऱ्याला 11 लाख..., शिंदेंच्या आमदाराचं वक्तव्य
राहुल गांधींची जीभ छाटणाऱ्याला 11 लाख..., शिंदेंच्या आमदाराचं वक्तव्य.
'या' जिल्ह्यात 12 ज्योतिर्लिंगाच दर्शन. बाप्पासाठी साकारला भारी देखावा
'या' जिल्ह्यात 12 ज्योतिर्लिंगाच दर्शन. बाप्पासाठी साकारला भारी देखावा.
Lalbaugcha Raja Aarti 2024 : ही शान कोणाची..पहा लालबागच्या राजाची आरती
Lalbaugcha Raja Aarti 2024 : ही शान कोणाची..पहा लालबागच्या राजाची आरती.
शिंदे आपल्या परिवारासह लालबागच्या राजा चरणी लीन, काय साकडं घातलं?
शिंदे आपल्या परिवारासह लालबागच्या राजा चरणी लीन, काय साकडं घातलं?.
मविआच्या रेड्यांना चाबकाने फोडून काढणार, कुणी केला घणाघात?
मविआच्या रेड्यांना चाबकाने फोडून काढणार, कुणी केला घणाघात?.
'रोहित पवार महाराष्ट्रात आग लावत सुटलेत...', सदाभाऊ खोतांचा हल्लाबोल
'रोहित पवार महाराष्ट्रात आग लावत सुटलेत...', सदाभाऊ खोतांचा हल्लाबोल.
अजित पवार पुन्हा घरवापसी करणार? बच्चू कडू काय म्हणाले? काय केला दावा?
अजित पवार पुन्हा घरवापसी करणार? बच्चू कडू काय म्हणाले? काय केला दावा?.
'शरद पवारांनी हरिनामाचा जप करावा, म्हणजे...', भाजप नेत्याची खोचक टीका
'शरद पवारांनी हरिनामाचा जप करावा, म्हणजे...', भाजप नेत्याची खोचक टीका.
जरांगे आज मध्यरात्रीपासून उपोषणाला; मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळणार?
जरांगे आज मध्यरात्रीपासून उपोषणाला; मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळणार?.