AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Insurance : या दिग्गज क्रिक्रेटपटूची विमा कंपनी लवकरच बाजारात, गुंतवणूकदारांना IPO मधून करता येईल कमाई..

Insurance : या दिग्गज क्रिकेटपटूची विमा कंपनी लवकरच बाजारात येत आहे.

Insurance : या दिग्गज क्रिक्रेटपटूची विमा कंपनी लवकरच बाजारात, गुंतवणूकदारांना IPO मधून करता येईल कमाई..
नवीन विमा कंपनी बाजारातImage Credit source: सोशल मीडिया
| Updated on: Nov 25, 2022 | 11:06 PM
Share

नवी दिल्ली: जर तुम्ही विराट कोहली (Virat Kohli) आणि अनुष्का शर्मा (Anushka Sharma) या दोघांचे चाहते असाल तर, तुम्हाला सूखद धक्का देणारी बातमी आहे. लवकरच तुम्हाला त्यांच्या विमा कंपनीचे (Insurance Company) संरक्षण तर मिळेलच पण शेअर बाजारात (share Market) या कंपनीत गुंतवणूकही करता येईल. त्यामुळे विमा संरक्षणसोबतच कमाईचेही दरवाजा उघडणार आहे.

गो डिजिट जनरल इन्शुरन्स कंपनी (Go Digit General Insurance Company) असं या विमा कंपनीचे नाव आहे. या कंपनीला आणि तिच्या IPO ला भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाने मंजूरी दिली आहे.

भारतीय रोखे आणि विनिमय मंडळाने (SEBI) या आयपीओला अद्याप मंजूरी दिलेली नाही. हा आयपीओ (Go Digit IPO Size) जवळपास 1250 कोटी रुपयांचा असणार आहे.

गो डिजिट जनरल इन्शुरन्स कंपनीने यावर्षी 17 ऑगस्ट रोजी आयपीओ आणण्यासाठी योग्य ती आवश्यक कागदपत्रे दाखल केलेली आहेत. कॅनाडा स्थित फेअरफॅक्स या समूहाच्या या विमा कंपनीत विराट कोहली आणि अनुष्का शर्माचा मोठा वाटा आहे.

आज शुक्रवारी या कंपनीच्या आयपीओला विमा नियामक प्राधिकरणाने हिरवा झेंडा दाखविला. त्यांनी आयपीओला मंजूरी दिली आहे. सेबीच्या मंजूरीनंतर पुढील प्रक्रिया पूर्ण होईल.

गो डिजिट जनरल इन्शुरन्स कंपनीचा आयपीओ 1250 कोटी रुपयांच्या फ्रेश शेअरर्सचा असेल. या शेअरपैकी 10,94,45,561 शेअर्स ऑफर फॉर सेलसाठी (OFS) राखीव ठेवण्यात येतील.

मीडिया रिपोर्टनुसार, ही कंपनी बाजारात पूर्ण क्षमतेने आयपीओ आणण्यापूर्वी एक प्री-आयपीओ आणण्याच्या तयारीत आहे. हा प्री-आयपीओ जवळपास 250 कोटी रुपयांचा असेल .जर असे झाले तर, नंतरच्या आयपीओची संख्या मर्यादीत होऊ शकते.

Go Digit General Insurance मोटर वाहन, आरोग्य, प्रवास, मालमत्ता आणि मेरीटाईम या क्षेत्रात विमा कवच देईल. कंपनीने आतापर्यंत 1.65 कोटींच्या विम्याची विक्री केलेली आहे.

त्यांच्यासोबत जाणं परवडणारं नाही! मलिकांबाबत शिरसाट यांचं मोठं विधान
त्यांच्यासोबत जाणं परवडणारं नाही! मलिकांबाबत शिरसाट यांचं मोठं विधान.
सुप्रिया सुळेंकडून मुख्यमंत्र्यांचे तोंडभरून कौतुक! म्हणाल्या...
सुप्रिया सुळेंकडून मुख्यमंत्र्यांचे तोंडभरून कौतुक! म्हणाल्या....
नाना पटोलेंचा भाजपवर सत्तेतून आमदार विकत घेतल्याचा आरोप
नाना पटोलेंचा भाजपवर सत्तेतून आमदार विकत घेतल्याचा आरोप.
हिंगोलीत कॉंग्रेसला खिंडार! प्रज्ञा सातव यांचा भाजपात प्रवेश
हिंगोलीत कॉंग्रेसला खिंडार! प्रज्ञा सातव यांचा भाजपात प्रवेश.
नागपूर सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी!
नागपूर सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी!.
ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा
ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा.
दोन मंत्री गेले, हा काळिमा! राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप
दोन मंत्री गेले, हा काळिमा! राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप.
त्यांना पुन्हा मंत्री करणं सोपं नाही! संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले
त्यांना पुन्हा मंत्री करणं सोपं नाही! संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले.
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!.
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!.