Gold Silver Price Today : सोन्याची महागाईला सलामी! आज सोने-चांदी इतके महाग
Gold Silver Price Today : सोन्या-चांदीने ब्रेक घेतल्यानंतर पुन्हा एकादा महागाईला सलामी दिली. सकाळच्या सत्रात मौल्यवान धातूंच्या भावात वाढ झाली. जाणून घ्या आज भावात किती वाढ झाली...
नवी दिल्ली : सोने-चांदी (Gold Silver Price Update) अथवा दागिने खरेदी करणार असाल तर तुमच्यासाठी महत्वाची बातमी आहे. सोने आणि चांदीच्या भावात चढउतार सुरुच आहे. सलग दोन दिवसांच्या घसरणीला आता ब्रेक लागला आहे. दोन्ही धातूत आता दरवाढ झाली आहे. भावात किंचित बदल झाला असला तरी खरेदी करताना त्याचा फटका बसतो. आज दिल्लीतील बाजारात सोने 60613 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि चांदी 74940 रुपये प्रति किलो भावाने विक्री होत आहे. या किंमतीत अजून वाढीचा तज्ज्ञांचा अंदाज आहे. दिवाळीपासून दोन्ही धातूंनी दरवाढीची सलामी दिली आहे. हे वर्ष, 2023 गुंतवणूकदारांसाठी लकी ठरले आहे. गेल्या दुसऱ्या पर्यांयापेक्षा सोने-चांदीने बक्कळ कमाई करुन दिली आहे. सोने-चांदीने खरेदीदारांना झटपट श्रीमंत केले आहे. इतर ठिकाणी केलेल्या गुंतवणूकीपेक्षा सोने आणि चांदीतील गुंतवणुकीने अधिक परतावा दिला आहे.
बुधवारी काय होते भाव बुधवारी सोने 223 रुपये प्रति 10 ग्रॅमने महागले आणि हा भाव 60613 रुपयांवर पोहचला तर मंगळवारी हा भाव 60390 रुपये प्रति 10 ग्रॅम महाग होता. सोन्यासोबतच चांदीने पण दरवाढीची वर्दी दिली. बुधवारी चांदी 524 रुपयांनी वधारली तर मंगळवारी भावात 391 रुपये रुपयांची घसरण झाली होती.
आजचा भाव काय गुडरिटर्न्सने,गुरुवारी सकाळच्या सत्रातील भाव जाहीर केले. त्यानुसार, सकाळाच्या सत्रात आज दोन्ही धातूंमध्ये दरवाढ झाली. 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचे भाव 10 रुपयांनी वाढले. 22 कॅरेट एक तोळा सोन्याचा भाव आज 56,36 रुपये आहे. तर 24 कॅरेट एक तोळा सोन्याची किंमत 10 रुपयांनी महागली. आज हा भाव 61,470 रुपये आहे.
14 ते 24 कॅरेटचा भाव काय दिल्लीतील बाजारभावानुसार, काल 24 कॅरेट सोने 223 रुपये महागले. हा भाव 60613 रुपये, 23 कॅरेट सोने 222 रुपयांनी वाढून 60370 रुपये, 22 कॅरेट सोने 205 रुपयांनी महागले, आज हा भाव 55522 रुपये, 18 कॅरेट सोने 167 रुपयांनी महाग होऊन 45460 रुपये आणि 14 कॅरेट सोने 131 रुपया महाग होऊन 35459 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले.
भाव एका मिस्ड कॉलवर 22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोने खरेदीपूर्वी तुम्हाला त्याची किंमत एका मिस कॉलवर कळू शकते. त्यासाठी 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊ शकता. त्यानंतर थोड्याचवेळात एसएमएस (SMS) येईल. त्याआधारे तुम्हाला किंमती कळतील. तसेच भाव जाणून घेण्यासाठी तुम्ही www.ibja.co वा ibjarates.com या ठिकाणी माहिती घेऊ शकता.
गेल्या 100 दिवसांत सोन्याने दिला 9 टक्क्यांपेक्षा अधिक परतावा
- 30 डिसेंबर 2022 रोजी, वर्षाच्या शेवटच्या दिवशी सोन्याचा भाव 55,017 रुपये प्रति 10 ग्रॅम होता
- 10 एप्रिल 2023 रोजी म्हणजे 100 दिवसानंतर सोन्याचा भाव 5,021 रुपये प्रति 10 ग्रॅमने वाढला
- याचा सरळ अर्थ ग्राहकांना 100 दिवसांत सोन्याने 5,021 रुपयांचा फायदा झाला
- सोन्याने या 100 दिवसांत गुंतवणूकदारांना 9.12 टक्के कमाई करुन दिली
- या 100 दिवसांत सोन्याच्या भावात प्रति तोळा 473 रुपयांची घसरण पण दिसून आली
- सोमवारी व्यापारी सत्रात सोन्याचा भाव 59,912 रुपये प्रति तोळा होता