आता नव्या युनिफॉर्ममध्ये दिसणार Air India च्या एअर होस्टेस, मेल क्रुचाही युनिफॉर्म बदलणार

तब्बल सहा दशकानंतर आता एअर इंडीया या विमान कंपनीच्या एअर होस्टेस आणि क्रु मेंबर नव्या युनिफॉर्ममध्ये दिसणार आहेत. पाहा कसा असणार नवीन युनिफॉर्म...

आता नव्या युनिफॉर्ममध्ये दिसणार Air India च्या एअर होस्टेस, मेल क्रुचाही युनिफॉर्म बदलणार
air india
Follow us
| Updated on: Sep 29, 2023 | 1:05 PM

नवी दिल्ली | 29 सप्टेंबर 2023 : एअर इंडीयाचा ताबा पुन्हा टाटा कंपनीने घेतल्यानंतर आता एअर इंडीयाचा कायापालट केला जात आहे. आता एअर इंडीयाच्या फ्लाईट क्रु नव्या ढंगाच्या आकर्षक युनिफॉर्ममध्ये दिसणार आहे. यावर्षीच्या नोव्हेंबर महिन्यात नव्या युनिफॉर्ममध्ये एअर इंडीयाच्या एअर होस्टेस प्रवाशांचे स्वागत करताना दिसतील. आता फ्लाईट अटेंडेंट्स साडी ऐवजी नव्या लूकमध्ये दिसतील. महिला आणि पुरुषांच्या युनिफॉर्मला आकर्षकपणे डीझाईन केले गेले आहे.

हिंदूस्थान टाईम्सच्या बातमीनूसार आता सहा दशकानंतर एअर इंडीयाचा क्रु मेंबरचा युनिफॉर्म बदलणार आहे. साल 1962 मध्ये जे.आर.डी. टाटा यांच्याकडे ताबा असताना एअर होस्टेस साडी ऐवजी पाश्चात्य ढंगाचे कपडे परिधान करीत असायच्या. त्यात महिला स्कर्ट, जॅकेट आणि टोपी परिधान करायच्या. त्यानंतर साडी हा युनिफॉर्म महिलांसाठी आला. त्याकाळात एअर इंडीयात एअर होस्टेस एग्लो इंडीयन किंवा युरोपीय वंशाच्या असायच्या. साड्या बिन्नी मिल्स मधून घेण्यात आल्या होत्या. आता नवीन युनिफॉर्मची जबाबदारी प्रसिध्द फॅशन डीझायनर मनीष मल्होत्रा यांच्यावर सोपविली आहे. परंतू त्यांनी यासंदर्भात काही वक्तव्य किंवा प्रतिक्रीया दिलेली नाही.

विस्ताराचा युनिफॉर्म देखील सारखाच असेल

विस्तारा एअरलाईन्सचा एअर इंडीयात विलीनीकरण झाल्यानंतर त्यांचा देखील युनिफॉर्म बदलणार आहे. तोही एअर इंडीया सारखाच असेल. 10 ऑगस्ट रोजी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी या संदर्भात घोषणा केली होती. महिलांसाठी चुडीदार सारखा ड्रेस तयार केला आहे, तर पुरुष देखील नवीन सुटमध्ये दिसतील. अशा प्रकारे नवी युनिफॉर्म देखील पारंपारिक असणार आहे.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.