Air India : एअर इंडियाला नजर ना लागो, इतका झक्कास झालाय ‘लोगो’! पाहा महाराजाचे आधुनिक रुप

Air India : टाटा समूहाने एअर इंडियाचे रुपडे पालटले आहे. 470 नॅरो आणि वाईडबॉडी जेटच्या ऑर्डरचा रेकॉर्ड केल्यानंतर टाटा समूहाने एअर इंडियाचे रिब्रँडिग केले आहे.

Air India : एअर इंडियाला नजर ना लागो, इतका झक्कास झालाय 'लोगो'! पाहा महाराजाचे आधुनिक रुप
Follow us
| Updated on: Aug 11, 2023 | 10:25 AM

नवी दिल्ली | 11 ऑगस्ट 2023 : टाटा समूहाने (Tata Group) एअर इंडिया खरेदी केली. एअर इंडिया (Air India) तोट्यात होती, अजूनही त्यात मोठा फरक आलेला नाही. पण बदल सुरु आहेत. एअर इंडियाला नवीन उभारी देण्याचा प्रयत्न सुरु आहे. टाटा समूहाने एअर इंडियाचे रुपडे पालटले आहे. 470 नॅरो आणि वाईडबॉडी जेटच्या ऑर्डरचा रेकॉर्ड केल्यानंतर टाटा समूहाने एअर इंडियाचे रिब्रँडिग (Rebranding of Air India) केले आहे. एअर इंडियाच्या नवीन लोगोने अनेकांन मोहिनी घातली आहे. हा लोगो पाहिल्यानंतर अनेकांच्या तोंडातून ‘वाह’, ‘एकदम जोरदार’, ‘झक्कास’ असेच शब्द बाहेर पडतील. रुपडे पालटलेला हा महाराज सेवेत पण कमी नाही. महाराजाचा हा बदल अनेकांना आकृष्ट करेल. या रंगसंगतीने नव्या दमाच खेळाडून पुन्हा मैदानात उतरल्याचा भास नक्की होतो.

अजून घ्यायची गगनभरारी

हे सुद्धा वाचा

नवीन लोगोच्या रंगात एअरलाईन्सचा शुभंकर महाराजा न्हाऊन निघाला आहे. आधुनिक रुप, स्टाईलिश डिझाईन, लाल, पांढरा आणि नारंगी रंगाच्या सरमिसळीने हा नवा लोगो डोळ्याचे पारणे फेडतो. हा लोगो अपिल झाला आहे. तो मनाला भुरळ घालतो. ‘अमर्यादीत शक्यतांचे हे प्रतिक’ असल्याचा विश्वास टाटा सन्सचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांनी व्यक्त केला. नवीन लोगो जुन्या लोगाची जागा घेईल.

नवी उमेद

‘अमर्यादीत शक्यतांचे हे प्रतिक’ असल्याचे टाटा सन्सच्या अध्यक्षांनी स्पष्ट केले. हा नवीन लोगो एअरलाईन्सची धाडस आणि आत्मविश्वास दर्शवितो. टाटा समूहाच्या धारिष्ट्याचेच जणू ते प्रतिक आहे. गेल्या 12 महिन्यात एक जोरदार टीम तयार झाल्याचे एन. चंद्रशेखरन यांनी सांगितले. एअरलाईन्सच्या सर्व कर्मचाऱ्यांना अपडेट आणि अपग्रेड करण्याचे काम सुरु आहे. विमान सेवा अधिक सुधारीत आणि ग्राहकाभिमूख करण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याची माहिती त्यांनी दिली.

टाटा सन्सने केली खरेदी

टाटा सन्सने एअर इंडियाची खरेदी केली. सहायक कंपनी टॅलेस प्रायव्हेट लिमिटेडच्या माध्यमातून जानेवारी 2022 मध्ये एअर इंडियाचे अधिग्रहण करण्यात आले. एअर इंडिया आणि टाटा सन्सची आणखी एक सहायक कंपनी विस्ताराचे विलिनीकरण करण्यात येईल, अशी घोषणा करण्यात आली होती. हे विलिनीकरण मार्च 2024 पर्यंत करण्यात येईल, असा अंदाज होता.

विमानांचा मोठा ताफा

टाटा समूह एअर इंडियाचे रुपडे पालटत असतानाच विस्ताराची योजना पण आखत आहे. टाटाने अत्याधुनिक विमानांचा ताफा तयार करण्यासाठी पाऊलं टाकली आहेत. टाटा समूह एकूण 470 विमानांचा समावेश करणार आहे. त्यासाठी 6.40 लाख कोटी रुपये खर्च करण्यात येत आहे. यामध्ये 40 एअरबस A350s, 20 बोईंग 787s आणि 10 बोईंग 777-9s मोठ्या आकाराचे विमान, 210 Airbus A 320/321 Neos आणि 190 बोईंग 737 MAX सिंगल-आईजल विमानांचा यामध्ये समावेश आहे.

Non Stop LIVE Update
रायगडाच्या सर्व वाटा बंद, पायऱ्यांवरुन पाण्याचे लोट, सरकारचा निर्णय
रायगडाच्या सर्व वाटा बंद, पायऱ्यांवरुन पाण्याचे लोट, सरकारचा निर्णय.
जरांगेंनी केली चंद्रकांतदादांची नक्कल,'म्हणाले फडणवीस साहेब त्यांना...
जरांगेंनी केली चंद्रकांतदादांची नक्कल,'म्हणाले फडणवीस साहेब त्यांना....
विधान परिषद निवडणूकीत दगाफटका होण्याची भीती, आमदारांची हॉटेलवारी
विधान परिषद निवडणूकीत दगाफटका होण्याची भीती, आमदारांची हॉटेलवारी.
'शिवप्रेमींची फसवणूक...खरी वाघनखं येथे आहेत - इतिहास अभ्यासक इंद्रजीत
'शिवप्रेमींची फसवणूक...खरी वाघनखं येथे आहेत - इतिहास अभ्यासक इंद्रजीत.
परब म्हणाले तुम्हाला असं म्हटलं तर ?, उपसभापतींची मग अखेर दीलगिरी....
परब म्हणाले तुम्हाला असं म्हटलं तर ?, उपसभापतींची मग अखेर दीलगिरी.....
'मुंबईकरांनी आपली काळजी घ्यावी, कारण...,' काय म्हणाले होसाळीकर
'मुंबईकरांनी आपली काळजी घ्यावी, कारण...,' काय म्हणाले होसाळीकर.
म्हणून मुंबई तुंबली, काय म्हणाले अजित पवार, ग्लोबल वार्मिंग..आणि काय
म्हणून मुंबई तुंबली, काय म्हणाले अजित पवार, ग्लोबल वार्मिंग..आणि काय.
राजापूरात पुरात अडकलेल्या नागरिकांची सुटका, पोलीसांचे रेस्क्यू ऑपरेशन
राजापूरात पुरात अडकलेल्या नागरिकांची सुटका, पोलीसांचे रेस्क्यू ऑपरेशन.
मुंबईची झाली तुंबई, मुख्यमंत्र्यांनी घेतला कंट्रोल रुमचा ताबा
मुंबईची झाली तुंबई, मुख्यमंत्र्यांनी घेतला कंट्रोल रुमचा ताबा.
पुण्यात पुन्हा 'हिट एण्ड रन',रात्री दोघा बिट मार्शलना धडक, एकाचा बळी
पुण्यात पुन्हा 'हिट एण्ड रन',रात्री दोघा बिट मार्शलना धडक, एकाचा बळी.