विमानाने प्रवास करताना ‘हे’ नियम लक्षात ठेवा, नाहीतर थेट प्रवास होईल रद्द

आता हवाई तिकिटे बूक केल्यावर कोरोना प्रोटोकॉल संदर्भात विमान कंपनीच्यावतीने ई-प्रत देण्यात येईल. प्रवाशांनी हा नियम पाळणं फार महत्वाचं आहे, अन्यथा ते अडचणीत येऊ शकतात.

विमानाने प्रवास करताना 'हे' नियम लक्षात ठेवा, नाहीतर थेट प्रवास होईल रद्द
Follow us
| Updated on: Mar 17, 2021 | 1:33 PM

मुंबई : कोरोनाचा धोका दिवसेंदिवस वाढत चालला असताना यामुळे राज्यासह देशात चिंतेचं वातावरण आहे. अशा वाढत्या घटना लक्षात घेऊन डीजीसीएने अलीकडेच विमानाने प्रवास करणाऱ्या प्रवाश्यांसाठी नवीन नियम जारी केले होते. आता हवाई तिकिटे बूक केल्यावर कोरोना प्रोटोकॉल संदर्भात विमान कंपनीच्यावतीने ई-प्रत देण्यात येईल. प्रवाशांनी हा नियम पाळणं फार महत्वाचं आहे, अन्यथा ते अडचणीत येऊ शकतात. (airlines send covid protocol e copy to flyers mandatory to follow covid 19 rules)

कोव्हिड प्रोटोकॉल जो विमान कंपनीद्वारे पाठविला जाईल त्याचे प्रवासादरम्यान अरायव्हल, डिपार्चर आणि विमानात काटेकोरपणे पालन केले जावे. डीजीसीएचे म्हणणे आहे की, प्रवाश्यांनी विमानात मास्क व्यवस्थित न घातल्यास किंवा सीओव्हीडीसंदर्भात आवश्यक मार्गदर्शक सूचना पाळल्या नाहीत तर ते डी-बोर्ड केले जातील.

नवीन नियमांमध्ये स्पष्ट लिहण्यात आलं आहे की, विमानतळावर प्रवेश आणि बाहेर येईपर्यंत मास्क घालायलाच पाहिजे. तसेच, मास्क नाकाच्या वर असावा. याची तपासणी करण्यासाठी सीआयएसएफ आणि अन्य पोलीस कर्मचारी तैनात केले जातील.

हवाई प्रवासादरम्यान फेस मास्क लावणं आवश्यक

आदेशानुसार डीजीसीएने म्हटले आहे की, उड्डाण दरम्यान मास्क न घालणारे प्रवासी पुढील प्रवासासाठी ‘नो फ्लाय लिस्ट’ मध्ये ठेवले जातील. याचा अर्थ असा की, ही एक प्रकारची ब्लॅक लिस्ट असेल. उड्डाण दरम्यान नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांची यादी तयार केली जाणार आणि यामध्ये नावं असणाऱ्यांना पुढे हवाई प्रवास करता येणार नसल्याची माहिती देण्यात आली आहे.

8 मार्चला दिल्ली उच्च न्यायालयाचा आदेश

दिल्ली उच्च न्यायालयाने 8 मार्च 2021 रोजी दिलेल्या आदेशानंतर डीजीसीएने ही कारवाई केली. न्यायमूर्ती सी हरी शंकर 5 मार्च रोजी एअर इंडियाच्या विमानाने कोलकाताहून दिल्लीकडे येत होते. यावेळी, विमानतळाच्या आत आणि विमानतळावर सोशल डिस्टंसिंगचं पालन होत नसल्याचं त्यांच्या लक्षात आलं.

प्रवासी मास्क लावत नाहीत. यामुळे कोरोनाचा धोका आणखी वाढण्याची शक्यता आहे. यानंतर, दिल्ली उच्च न्यायालयाने सर्व संबंधित अधिकाऱ्यांना आदेश दिले की, प्रवासादरम्यान कोव्हिड प्रोटोकॉलचे उत्तम प्रकारे पालन केले जावे. प्रवाशांना नियमांविषयी जागरूक करावे आणि या दिशेने प्रामाणिक प्रयत्न केले पाहिजेत, असे एअरलाइन्सकडून सांगण्यात आले. (airlines send covid protocol e copy to flyers mandatory to follow covid 19 rules)

संबंधित बातम्या – 

जुनी कार किंवा बाईक असेल तर जास्त पैसे खर्च करायला तयार राहा, वाचा काय आहे scrappage policy

Bank of Baroda ची खास योजना, फक्त 1 रुपयामध्ये मिळणार थेट 2 लाखांचा विमा

Tata Sky ची धमाकेदार ऑफर! रिचार्जवर मिळतोय थेट 2 महिन्याचा कॅशबॅक

(airlines send covid protocol e copy to flyers mandatory to follow covid 19 rules)

छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.