Akasa Air | अडचणीत आलेल्या आकासा एअरला दिलासा, सरकारने घेतला हा निर्णय
राकेश झुनझुनवाला यांच्या आकासा एअरचे 43 पायलट सोडून गेल्याने कंपनी अडचणीत आली असतानाच आता या कंपनीसाठी सरकारने नवीन निर्णय घेतला आहे.
नवी दिल्ली | 21 सप्टेंबर 2023 : आकासा एअर या दिवंगत शेअर गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांच्या एअर कंपनीच्या 43 पायलटनी अचानक राजीनामा दिल्याने ती अडचणीत आली आहे. मात्र सरकारने आकासा एअरला आता आंतरराष्ट्रीय उड्डाणांची परवानगी दिली आहे. नागरी विमान मंत्रालयाने हा निर्णय घेतला आहे. आता आकासा एअर कंपनी दक्षिण आशिया, दक्षिण-पूर्व आशिया आणि पश्चिम आशिया देशातील विमान उड्डाणे सुरु करण्याची योजना आखत आहे.
आकासा एअर कंपनीचे 43 पायलट नोकरी सोडून एअर इंडीयामध्ये जॉइंट झाले आहेत. त्यामुळे कंपनीच्या अनेक उड्डाणांना रद्द करावे लागले आहे. त्यामुळे पायलटची टंचाईचा सामना करावा लागणाऱ्या एअर आकासा अडचणींचा सामना करावा लागत आहे. आकासा एअरचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी विनय दुबे यांनी म्हटले आहे की नागरी विमानन मंत्रालयाने आंतरराष्ट्रीय उड्डाणांना परवानगी दिल्याचे म्हटले आहे. विनय दुबे यांनी म्हटले आहे की आम्हाला आंतरराष्ट्रीय उड्डाणांना परवानगी दिली आहे. त्यामुळे यावर्षअखेर आम्ही आमची आंतरराष्ट्रीय उड्डाणे सुरु करणार आहोत. लवकरच आम्ही आमच्या आंतरराष्ट्रीय उड्डाणांची माहीती देणार आहोत असेही त्यांनी म्हटले आहे.
अचानक पायलट सोडून गेल्याने अडचण
साल 2022 मध्ये सेवेत आलेल्या आकासा एअर अचानक मोठ्या संख्येने पायलटनी राजीनामा दिल्याने अडचणीत सापडली आहे. पायलटनी नोटीस अवधी पूर्ण न करता काम सोडून दिल्याने आकासा कंपनीने दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. पायलटनी अचानक राजीनामा दिल्याने कंपनीने सप्टेंबरमध्ये मोठ्या संख्येने विमाने रद्द केल्याचे न्यायालयात म्हटले आहे.
कंपनीच्या ताफ्यात बोईंग 737 मॅक्स विमाने
अकासा एअरच्या सीईओने म्हटले आहे की एअरलाईन भारतातून दक्षिण आशिया, दक्षिण-पूर्व आशिया आणि पश्चिम आशियासाठी उड्डाणे करण्याची तयारी करणार आहे. आकासा एअरलाईनच्या ताफ्यात बोईंग 737 मॅक्स विमाने आहेत, हीच विमाने आंतरराष्ट्रीय उड्डाणे घेऊ शकतील. वाढती मागणी पाहून साल 2023 च्या अखेरपर्यंत कंपनी शंभरहून अधिक विमानांची ऑर्डर देण्याची तयारी सुरु केली आहे.