AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

PF Amount Credit News : कर्मचा-यांच्या पीएफ खात्यात 40,000 होतील जमा, या महिन्याचा सांगावा

Alert To PF Holders : पीएफ खातेधारकांसाठी आनंदाची बातमी आहे. तुमच्या वेतनातून पीएफसाठी रक्कम कापण्यात येते. या खात्यातील रक्कमेवर सरकार लवकरच तुम्हाला व्याज (PF Interest) हस्तांतरीत करणार आहे.

PF Amount Credit News : कर्मचा-यांच्या पीएफ खात्यात 40,000 होतील जमा, या महिन्याचा सांगावा
EPFO लवकरच जमा करेल व्याजाची रक्कम
| Updated on: Jul 15, 2022 | 11:18 AM
Share

Provident Fund Interest News :देशातील पीएफ कर्मचा-यांसाठी (PF Employees) आनंदाची बातमी आहे. पीएफ खाते लवकरच त्यांना मान्सून गिफ्ट देईल. त्यांच्या खात्यात लवकरच व्याजाची रक्कम जमा होणार आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना        ( EPFO) 29 आणि 30 जुलै रोजी होणार्‍या बैठकीत केंद्रीय पेन्शन वितरण प्रणाली स्थापन करण्याच्या प्रस्तावावर विचार करेल आणि त्याला मंजुरी देण्याची शक्यता आहे. त्यामुळे देशातील 6 कोटींहून अधिक कर्मचा-यांना (PF Account Holder) बँक खात्यांमध्ये एकाच वेळी रक्कम जमा होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. सध्या, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) ची 138 हून अधिक प्रादेशिक कार्यालये लाभार्थ्यांना त्यांच्या क्षेत्रातील स्वतंत्रपणे पेन्शन वितरित करतात. त्यामुळे विविध क्षेत्रीय कार्यालयातील पेन्शनधारकांना वेगवेगळ्या वेळी किंवा एखाद्या दिवसात पेन्शन (Pension) मिळते. देशातील 138 पेक्षा जास्त प्रादेशिक कार्यालयांच्या (Divisional Offices) केंद्रीय डेटाबेसचा वापर करून लाभार्थ्यांच्या बँक खात्यांमध्ये लाभ जमा करण्यात येणार आहे. याविषयीचा निर्णय या महिन्याच्या अखेरीस होणार आहे.

30 जुलैपर्यंत व्याज होईल जमा

पीएफ कर्मचाऱ्यांच्या खात्यात 30 जुलैपर्यंत व्याज जमा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कर्मचा-यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. सरकारने 2020-21 या आर्थिक वर्षासाठी 8.1 टक्के व्याजाची रक्कम देण्याची घोषणा केली आहे, हा व्याजदर आतापर्यंतचा सर्वात निच्चांकी आकडा आहे. यापूर्वी 8.5 टक्के व्याज जाहीर करण्यात आले होते. पीएफ कपात करणारी संस्था ईपीएफओने(EPFO) अद्याप अधिकृतपणे व्याजाची घोषणा केलेली नाही, परंतु सर्व मीडिया रिपोर्ट्समध्ये हा दावा केला जात आहे.

खात्यात 40,000 रुपये व्याज येईल

केंद्र सरकारने जाहीर केलेल्या नवीन 8.1 टक्के व्याज दरानुसार, पीएफ कर्मचाऱ्यांच्या (PF employees) खात्यात रक्कम जमा होईल. याचा 6 कोटींहून अधिक कर्मचाऱ्यांना फायदा होणार आहे. जर तुमच्या खात्यात 5 लाख रुपये जमा असल्यास 40,000 हून अधिक तर 10 लाख रुपये असल्यास 81,000 रुपये व्याज मिळेल.

घरबसल्या तपासा रक्कम

पीएफ खात्यात सध्याच्या घडीला किती रक्कम आहे, हे तुम्ही घरबसल्या मोबाईलवरुन माहिती करुन घेऊ शकता. ईपीएफओकडे नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावरून 7738299899 वर EPFO ​​UAN LAN (भाषा) पाठवावा लागेल. तुम्हाला इंग्रजीमध्ये माहिती हवी असल्यास, तुम्ही  ENG टाइप करावे आणि मराठी MAR लिहावे. तुम्हाला हिंदीत माहिती मिळवण्यासाठी EPFOHO UAN HIN लिहून संदेश पाठवावा लागेल. यानंतर लगेचच तुम्हाला शिल्लक माहिती सहज मिळेल.

मिस्ड कॉलद्वारे PF शिल्लक समजणार

तुम्हाला तुमच्या पीएफ बॅलन्सबद्दल जाणून घ्यायचे असेल, तर तुम्ही मिस्ड कॉलद्वारेही पीएफ बॅलन्स जाणून घेऊ शकता. यासाठी तुम्हाला तुमच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावरून 011 22901406 वर मिस्ड कॉल करावा लागेल.

उमंग अॅपद्वारे पैसे तपासा

सर्वप्रथम तुमच्या स्मार्टफोनवर प्ले स्टोअरवरून उमंग अॅप डाउनलोड करा. त्यानंतर तुमचा फोन नंबर रजिस्टर करून अॅपमध्ये लॉग इन करा. त्यानंतर वरच्या डाव्या कोपऱ्यातील मेनूवर जा. येथे EPFO ​​पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर, व्ह्यू पासबुकमध्ये गेल्यानंतर, OTP द्वारे तुमचा UAN क्रमांक आणि शिल्लक तपासा.

दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? युगेंद्र पवारांनी एका वाक्यात म्हटलं..
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? युगेंद्र पवारांनी एका वाक्यात म्हटलं...
मुंबईत शिंदेंची सेना खरंच स्वबळावर लढणार की 84 जागांसाठी दबाव?
मुंबईत शिंदेंची सेना खरंच स्वबळावर लढणार की 84 जागांसाठी दबाव?.
माणिकराव कोकाटे यांना जामीन मंजूर पण आमदारकीचा निर्णय अध्यक्षांकडे!
माणिकराव कोकाटे यांना जामीन मंजूर पण आमदारकीचा निर्णय अध्यक्षांकडे!.
पुढचा राजीनामा शिंदे यांचा...उद्धव ठाकरे यांच्या सनसनाटी दाव्यानं खळबळ
पुढचा राजीनामा शिंदे यांचा...उद्धव ठाकरे यांच्या सनसनाटी दाव्यानं खळबळ.
निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंची युती रखडली, जागा वाटपामुळे तिढा कायम
निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंची युती रखडली, जागा वाटपामुळे तिढा कायम.
वाल्मिक कराडचा काऊंटडाऊन सुरू? आरोप निश्चितीसाठी कोर्टाकडून डेडलाईन
वाल्मिक कराडचा काऊंटडाऊन सुरू? आरोप निश्चितीसाठी कोर्टाकडून डेडलाईन.
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.