अंबानी ते अदानी आणि टाटा, उद्योग जगतात कोणाला मिळाले राम मंदिर सोहळ्याचे आवतण, पाहा संपूर्ण यादी

अयोध्येत येत्या 22 जानेवारी रोजी राम मंदिराची प्रतिष्ठापना होत आहे. या ऐतिहासिक सोहळ्याला सर्व स्तरातील महनीय व्यक्तींना आमंत्रण दिले आहे. त्यात राजकीय, सामाजिक, मनोरंजन क्षेत्रासह उद्योगजगतातील अनेक बड्या उद्योजकांना देखील निमंत्रण देण्यात आले आहे.

अंबानी ते अदानी आणि टाटा, उद्योग जगतात कोणाला मिळाले राम मंदिर सोहळ्याचे आवतण, पाहा संपूर्ण यादी
AMBANI ADANI Image Credit source: TV9MARATHI
Follow us
| Updated on: Jan 20, 2024 | 8:28 PM

नवी दिल्ली | 20 जानेवारी 2024 : अयोध्येतील राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठापनेची तयारी जोरदार सुरु आहे. या सोहळ्याचे निमंत्रण वाटण्याचे काम अनेक दिवसांपासून सुरु आहे. या सोहळ्यानिमित्त संपूर्ण राममय वातावरण झाले आहे. या सोहळ्याला उपस्थित रहाण्यासाठी बॉलिवूडसह अनेक क्षेत्रातील नामीगिरामी हस्तीमध्ये उत्सुकता आहे. आता या सोहळ्याला उद्योग जगातील कोणती उद्योजक घराणी उपस्थित रहाणार आहेत. कोणाला या सोहळ्याचे आमंत्रण आले आहे याची उत्सुकता लागली आहे. या पवित्र सोहळ्याला उपस्थित रहाण्यासाठी उद्योजक मुकेश अंबानी यांच्यापासून ते गौतम अदानी यांना राज्य अतिथी म्हणून निमंत्रण देण्यात आले आहे. एकूण 500 हून अधिक राज्य अतिथींची यादी तयार केली आहे. भारतीय उद्योग जगतासह मनोरंजन, खेळ, संगीत आणि अन्य क्षेत्रातील दिग्गजांना या सोहळ्यासाठी निमंत्रण मिळाले आहे.

अयोध्येत राम मंदिराचा लोकार्पण सोहळ्याची तयारी मोठ्या जोशात सुरु आहे. हा ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी अनेकांमध्ये चढाओढ लागली आहे. उद्योजकांना देखील या ऐतिहासिक प्रसंगी उपस्थित रहाण्याची उत्सुकता लागली आहे. या सोहळ्याला आमंत्रित केलेल्या उद्योजकांच्या यादीत अब्जाधीश मुकेश अंबानी, त्यांची पत्नी नीता अंबानी, मुले आकाश आणि अनंत, सून श्लोका तसेच भावी सून राधिका मर्चंट यांचा समावेश आहे. टाटा समूहाचे मानद चेअरमन रतन टाटा, टाटा सन्सचे अध्यक्ष एन.चंद्रशेखरन आणि त्यांची पत्नी ललिता यांना देखील आमंत्रित केले आहे. अदानी ग्रुपचे गौतम अदानी, खाण उद्योजक अनिल अग्रवाल यांचे देखील या यादीत नाव आहे.

या व्यावसायिकांनाही आवतण

राम मंदिर लोकार्पण सोहळ्यासाठी हिंदूजा ग्रुपचे अशोक हिंदुजा, विप्रोचे अझीम प्रेमजी, बॉम्बे डाईंगचे नस्ली वाडीया, टोरेंट ग्रुपचे सुधीर मेहता, जीएमआर ग्रुपचे जीएमआर राव, आणि रियल इस्टेट व्यावसायिक निरंजन हिरानंदानी यांना देखील आमंत्रण मिळाले आहे. राम मंदिर सोहळ्याचे आमंत्रण मिळालेल्या अन्य व्यावसायिकात आदित्य बिर्ला ग्रुपचे अध्यक्ष कुमार मंगलम बिर्ला आणि त्यांची पत्नी नीरजा, पिरामल ग्रुपचे अजय पिरामल, महिंद्र एण्ड महिंद्र ग्रुपचे आनंद महिंद्र, डीसीएम श्रीरामचे अजय श्रीराम आणि टाटा कंसल्टेंसी सर्व्हीसेसचे ( टीसीएस) सीईओ कृतिवासन यांचा समावेश आहे.

एचडीएफसीचे माजी अध्यक्ष दीपक पारेख, डॉ. रेड्डीज फार्मास्युटिकल्सचे के.के. सतीश रेड्डी, झी एंटरटेन्मेंट एंटरप्राईझेसचे सीईओ पुनीत गोयंका, एल एण्ड टीचे चेअरमन एस.एन. सुब्रमण्यन आणि त्यांची पत्नी, इन्फोसिसचे संस्थापक एन.आर.नारायण मूर्ती जिंदाल स्टील एण्ड पॉवरचे प्रमुख नवीन जिंदाल आणि मेदांता ग्रुपचे नरेश त्रेहन यांना देखील आमंत्रण मिळाले आहे. या यादी कोटक महिंद्र बॅंकेचे संस्थापक उदय कोटक, इन्फोसिसचे सहसंस्थापक नंदन नीलेकणी, सीरम इंस्टीट्यूट ऑफ इंडियाचे अदार पुनावाला, गोदरेज समुहाचे आदि गोदरेज आदी अनेक दिग्गजांची नावे आमंत्रितांमध्ये असली तरी प्रत्यक्षात किती जण या सोहळ्याला उपस्थित राहतील हे स्पष्ट झालेले नाही.

संक्रांतीनिमित्ताने येवल्यात पैठणी खरेदीसाठी महिलांची झुंबड
संक्रांतीनिमित्ताने येवल्यात पैठणी खरेदीसाठी महिलांची झुंबड.
गृहमंत्री आहेत का झोपलेत ? भरसभेत फोटो दाखवत मनोज जरांगे संतापले
गृहमंत्री आहेत का झोपलेत ? भरसभेत फोटो दाखवत मनोज जरांगे संतापले.
संजय राऊत यांच्या भूमिकेचं स्वागत , निवडणुका या.. विकास ठाकरे
संजय राऊत यांच्या भूमिकेचं स्वागत , निवडणुका या.. विकास ठाकरे.
आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत... संतोष देशमुखांचे भाऊ
आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत... संतोष देशमुखांचे भाऊ.
हत्या प्रकरणातील आरोपींवर MCOCA ; ज्येष्ठ वकील माजिद मेमन म्हणाले..
हत्या प्रकरणातील आरोपींवर MCOCA ; ज्येष्ठ वकील माजिद मेमन म्हणाले...
Santosh Deshmukh Murder : विष्णू चाटेला 2 दिवसांची सीआयडी कोठडी
Santosh Deshmukh Murder : विष्णू चाटेला 2 दिवसांची सीआयडी कोठडी.
Santosh Deshmukh Murder : MCOCA लागल्यानं काय होणार ?
Santosh Deshmukh Murder : MCOCA लागल्यानं काय होणार ?.
संतोष देशमुख हत्याकांडात सात जणांवर MCOCA , वाल्मिक कराडचं काय ?
संतोष देशमुख हत्याकांडात सात जणांवर MCOCA , वाल्मिक कराडचं काय ?.
धामोरी गावात भुताची अफवा, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पण..
धामोरी गावात भुताची अफवा, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पण...
'बूंद से गयी वो हौद से नही आतीं' गुलाबराव पाटलांचा ठाकरेंवर घणाघात
'बूंद से गयी वो हौद से नही आतीं' गुलाबराव पाटलांचा ठाकरेंवर घणाघात.