हा शेअर खरेदी करायला कोणीच नाही तयार, 3 दिवसांत तर कोणी फिरकलं सुद्धा नाही, 2 रुपयांपर्यंत पडला भाव, लागले लोअर सर्किट
Share Market : शेअर बाजारात अनेक कंपन्या आहेत. बाजारातील चढउताराचा, विविध घडामोडींचा त्यावर परिणाम होत असतो. आता या समूहाच्या शेअरकडे गेल्या तीन दिवसांपासून कोणी ढुंकून सुद्धा पाहिले नाही. हा शेअर घसरत थेट 2 रुपयांवर आला. स्वस्त असला तरी खरेदीदारांनी त्याच्याकडे पाठ फिरवली आहे.
उद्योगपती अनिल अंबानी यांच्यावर डोंगर कोसळला आहे. गेल्या काही वर्षांपासून उद्योग तोट्यात आणि अंगाशी वाद असा त्यांचा नित्यक्रम सुरु आहे. त्यातच त्यांच्या समुहातील रिलायन्स होम फायनान्स लिमिटेड, रिलायन्स पॉवर आणि रिलायन्स कम्युनिकेशन्सचे शेअर सोमवारी आणि आज मंगळवारी एकदम घसरले. त्यांना लोअर सर्किट लागले. बाजार नियंत्रक संस्था SEBI ने पाच वर्षांच्या बंदीची कारवाई केल्यानंतर या समूहातील शेअर धडाधड खाली कोसळले.
लागले लोअर सर्किट
सोमवार आणि मंगळवारी रिलायन्स होम फायनान्स लिमिटेडच्या शेअर 5 टक्के घसरला, तो 4.03 रुपयांवर व्यापार करत आहे. रिलायन्स पॉवरचा शेअर 5 टक्के लोअर सर्किटसह 31.10 रुपयांवर व्यापार करत आहे. तर रिलायन्स कम्युनिकेशन्सच्या शेअरची ट्रेडिंग आज बंद आहे. यापूर्वी सोमवारी हे सर्व शेअर 5 टक्क्यांनी घसरुन 2.32 रुपयांवर बंद झाले होते. गेल्या शुक्रवारपासून अनिल अंबानी यांच्या कंपन्यांच्या शेअरला सातत्याने लोअर सर्किट लागलेले आहेत. अनिल अंबानी यांच्या रिलायन्स होम फायनान्स लिमिटेडने निधीची गडबड केल्याचा ठपका ठेवत त्यांच्यावर 5 वर्षांची बंदी घातली आहे.
शुक्रवारी केली कारवाई
सेबीने अंबानीवर 25 कोटी रुपयांचा दंड ठोठावला. अंबानी यांना कोणत्याही सूचीबद्ध कंपनी वा बाजार नियामकासोबतच्या नोंदणीकृत कंपनीत निदेशक अथवा इतर पद घेण्यावर पण 5 वर्षांसाठी बंदी घालण्यात आली आहे. याशिवाय 24 कंपन्यांवर 21 कोटी रुपये ते 25 कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. तर रिलायन्स होम फायनान्सला सहा महिन्यासाठी बाजारातून हद्दपार करण्यात आले आहे. तर त्यावर 6 लाख रुपयांचा दंड लावण्यात आला आहे. शुक्रवारी 222 पानांचा आदेश दिला. या आदेशाने सोमवार आणि मंगळवारी रिलायन्स होम फायनान्स लिमिटेडच्या शेअर 5 टक्के घसरला, तो 4.03 रुपयांवर व्यापार करत आहे. रिलायन्स पॉवरचा शेअर 5 टक्के लोअर सर्किटसह 31.10 रुपयांवर व्यापार करत आहे.