Anil Ambani : अंबानी कुटुंबावर आले मोठे संकट, अजून एक कंपनी विक्रीच्या तयारीत, NCLT ने दिली मंजूरी

Anil Ambani : अंबानी कुटुंबियांना आणखी एक मोठा झटका बसला आहे.

Anil Ambani : अंबानी कुटुंबावर आले मोठे संकट, अजून एक कंपनी विक्रीच्या तयारीत, NCLT ने दिली मंजूरी
विक्रीचा सपाटाImage Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Dec 25, 2022 | 7:23 PM

नवी दिल्ली : अंबानी कुटुंबियांना (Ambani Family) आणखी एक मोठा झटका बसला आहे. उद्योजक अनिल अंबानी (Anil Ambani) यांची आणखी एक कंपनी विक्री होत आहे. कर्जात डुबलेली रिलायन्स नेव्हल डिफेंस अँड इंजिनिअरिंग (Reliance Naval Defense and Engineering) या कंपनीच्या विक्रीला मंजूरी मिळाली आहे. NCLT ने या कंपनीच्या विक्रीला मंजूरी दिली आहे. या प्रक्रियेमुळे अनिल अंबानी यांच्या पाठीमागील शुक्लकाष्ट कमी होत नसल्याचे चित्र आहे. त्यांच्या उद्योगावरील संकट वाढल्याचे दिसून येते.

राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरणाच्या (NCLT) अहमदाबाद विशेष पीठाने याविषयीचा निकाल दिला. स्वान एनर्जीच्या (Swan Energy) नेतृत्वाखालील ही प्रक्रिया पूर्ण होईल. या कंपनीच्या नेतृत्वाखाली पुढील प्रक्रिया पार पडणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

रिलायन्स नेव्हल डिफेन्स अँड इंजिनीअरिंगसाठी हेझेल मर्कंटाइलच्या (Hazel Mercantile) कन्सोर्टियम योजनेला मान्यता देण्यात आली आहे. या वर्षाच्या सुरुवातीलाच इरादा पत्र (LOI) देण्यात आले आहे. अर्थात सर्वाधिक बोली लावल्यामुळे ही प्रक्रिया पूर्ण होत आहे.

हे सुद्धा वाचा

कर्जात आकंठ बुडालेल्या या कंपनीसाठी हेजल मर्केंटाइलने 2700 कोटी रुपयांची बोली लावली होती. ही सर्वाधिक बोली होती. ही प्रक्रिया लांबली होती. त्यानंतर आता हेजल मर्केंटाइलच्या ताब्यात कंपनी देण्यास मंजूरी देण्यात आली आहे. रिलायन्स जिओ (Reliance Jio) चा ताबा रिलायन्स इंफ्राटेलने ( Reliance Infratel) घेण्यासल NCLT ने नुकतीच परवानगी दिली आहे.

अनिल अंबानी यांच्या या कंपनीच्या विक्रीला मान्यता मिळाल्याची वार्ता बाजारात पोहचली. शुक्रवारी या कंपनीच्या शेअरने उसळी घेतली. कंपनीच्या शेअरने अप्पर सर्किट लावले. त्यामुळे गुंतवणूकदारांचा मोठा फायदा झाला. व्यापारी सत्राच्या शेवटच्या दिवशी कंपनीचा शेअर जवळपास 4 टक्क्यांहून अधिक वाढीने बंद झाला.

NCLT ने रिलायन्स इंफ्राटेकचे टॉवर आणि फायबर संपत्तीचा ताबा घेण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर रिलायन्स जिओला एसबीआयच्या एस्क्रोच्या खात्यात जवळपास 3720 कोटी रुपये जमा करण्याचा आदेश देण्यात आला होता. रिलायन्स इंफ्राटेलकडे देशभरात जवळपास 78 लाख रूट किलोमीटर फायबर प्रॉपर्टी आणि 43540 मोबाईल टॉवर आहेत.

ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...