ते नोकरी सोडणार होते, पत्नीने दिला सल्ला आणि त्यांचे नशीबच बदलले, आता दिवसाची कमाई 5 कोटी
सुंदर पिचाई यांचा जन्म 12 जुलै 1972 रोजी भारतातील चेन्नई येथे झाला असून त्यांचे शिक्षण भारतातच झाले आहे.
नवी दिल्ली | 18 ऑगस्ट 2023 : करीयरच्या टप्प्यावर अनेकदा हितचिंतकांचा सल्ला कधीकधी कामाला येतो. नंतर तो सल्ला अनेकांचे भाग्य उजळतो. जोडीदाराने दिलेला सल्ला देखील अनेकदा द्विधा मनस्थिती असताना कामाला येतो. असाच जगातील सर्वात मोठी आयटी कंपनीच्या प्रमुख स्थानी असलेल्या जगप्रसिद्ध व्यक्तीला त्यांच्या पत्नीला दिलेला सल्ला लाखमोलाचा ठरला आणि आज त्याचं जे स्थान आहे त्याचं क्रेडीट ते त्यांच्या पत्नीलाच देतात.
आपण गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांच्याबाबत बोलत आहोत. त्यांचे नाव आज जगभरात आदराने घेतले जाते. सुंदर पिचाई सर्वाधिक वेतन घेणाऱ्या टेक सीईओपैकी एक आहेत. सीएनबीसीच्यामते सुंदर पिचाई यांना साल 2022 मध्ये 226 दशलक्ष डॉलर वेतन देण्यात आले होते. ही रक्कम भारतीय रुपयांत 18,783,074,700 इतकी आहे. म्हणजेच दिवसाला त्यांना पाच कोटी पगार त्यांना मिळाला आहे.
सुंदर पिचाई यांच्या कमाईत शेअरपासून त्यांना मिळणाऱ्या रकमेचा मोठा वाटा आहे. पिचई यांच्या स्टॉक ऑप्शनची किंमत 1788 कोटी रुपये आहे. आयआयटी खरगपूरमधून केमिकल इंजिनिअरिंगचा अभ्यास करणाऱ्या सुंदर पिचई यांची 2019 मध्ये गुगलचे सीईओ म्हणून नियुक्ती झाली होती. परंतू फार कमी लोकांना माहीती आहे की त्यांच्या यशात त्यांच्या पत्नीचा मोठा वाटा आहे. त्यांची पत्नी अंजली यांचा सल्ला मानून पिचई आज या स्थानावर पोहचले आहेत.
पहीली भेट कुठे झाली
अंजली आणि सुंदर पिचाई यांची पहिली भेट आयआयटी खरगपूरमध्ये झाली. त्यानंतर त्यांचे प्रेम होऊन त्यांनी अंजली यांच्याशी विवाह तेसा. डीएनएच्या बातमीनूसार एक वेळ अशी आली की सुंदर पिचई यांनी गुगल सोडून मायक्रोसॉफ्टमध्ये नोकरी करण्याचा निर्णय घेतला. परंतू अंजली यांनी त्यांना गुगलमध्येच थांबण्याचा निर्णय घेतला. त्यानी हा सल्ला मानल्याने त्यांचे नशीबल पालटले.
अंजली काय करतात
अंजली पिचाई यांनी त्यांच्या लिंक्डइन अकाऊंटवर दिलेल्या माहितीनूसार त्या इंटुइट नावाच्या एका सॉफ्टवेअर कंपनीत बिझनेस ऑपरेशन मॅनेजर म्हणून त्या काम करीत आहेत. अंजली राजस्थानच्या कोटा येथील राहणाऱ्या आहेत. अंजली यांनी आयआयटी खरगपुरमधूनच केमिकल इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केले आहे. अंजली यांनी 1993 मध्ये इंजिनिअरिंग पूर्ण केले. कॉलेजात अंजली आणि सुंदर पिचाई यांचा साखरपुडा झाला. पिचाई नंतर अमेरिकेतील स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीत अभ्यास करायला गेले. अंजली हीने 1999 ते 2002 पर्यंत एक्सेंचरमध्ये काम केले.