Inflation: सर्वसामान्यांना महागाईचा आणखी एक झटका; पुढील महिन्यात एसी, फ्रीजचे दर देखील वाढणार?

देशभरात महागाई वाढतच चालली आहे. पेट्रोल (Petrol), डिझेल, सीएनजी (cng), पीएनजी सोबतच घरगुती गॅस एलपीजी देखील गेल्या काही महिन्यांमध्ये मोठ्याप्रमाणात महाग झाला आहे. आता लवकरच एसी, फ्रीज आणि वॉशिंग मशिनचे दर वाढण्याची शक्यता आहे.

Inflation: सर्वसामान्यांना महागाईचा आणखी एक झटका; पुढील महिन्यात एसी, फ्रीजचे दर देखील वाढणार?
Follow us
| Updated on: Apr 19, 2022 | 5:30 AM

मुंबई : देशभरात महागाई वाढतच चालली आहे. पेट्रोल (Petrol), डिझेल, सीएनजी (cng), पीएनजी सोबतच घरगुती गॅस एलपीजी देखील गेल्या काही महिन्यांमध्ये मोठ्याप्रमाणात महाग झाला आहे. हा केवळ इंधन दरवाढीचाच भडका नाही, तर दुसरीकडे अन्न, धान्य आणि दैनंदिन लागणाऱ्या वस्तू आणि भाजीपाला देखील महाग झाला आहे. आता या महागाईचा तुम्हाला आणखी एक झटका बसू शकतो. पुढील महिन्यात एसी, फ्रिज आणि वॉशिंग मशीन या वस्तू महाग होऊ शकतात. फ्रीज वॉशिंग मशीन सारख्या वस्तूंवरील जीएसटी वाढवण्याचा विचार सरकारकडून सुरू आहे. याचा निर्णय पुढील महिन्या होणाऱ्या जीएसटी (GST) परिषदेच्या बैठकीमध्ये घेतला जाऊ शकतो. सध्या वॉशिंग मशीन, एसी, फ्रीज यासारख्या व्हाईट गुड्सवर 18 टक्के जीएसटी आकारण्यात येतो. मात्र आता त्यावर 28 टक्के जीएसटी आकारण्यात येण्याची शक्यता आहे. जीएसटी वाढवल्यास संबंधित वस्तू देखील महाग होणार आहेत. त्यामुळे जर तुमचा एसी, फ्रीज खरेदी करण्याचा प्लॅन असेल तर याच महिन्यात खरेदी केल्यास तुम्ही फायद्यात राहाल.

पुढील महिन्यात बैठक

‘सीएनबीसी’ने दिलेल्या वृत्तानुसार ग्रुप ऑफ मिनिस्टर्सच्या रिपोर्टनुसार जीएसटी परिषदेची बैठक मे महिन्याच्या दुसऱ्या पंधरवाड्यात होण्याची शक्यता आहे. या बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे. याच बैठकीत जीएसटीच्या स्लॅबमध्ये बदल करण्याच्या प्रस्तावावर देखील चर्चा होणार आहे. प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यास जीएसटी स्लॅबच्या रचनेत मोठा फेरबदल पहायाला मिळू शकतो. याच बैठकीमध्ये एसी, फ्रिज आणि वॉशिंग मशीन सारख्या वस्तूंवरील जीएसटी वाढून तो 28 टक्क्यांपर्यंत जाऊ शकतो. तसे झाल्यास या वस्तू आणखी महाग होणार आहेत.

देशात महागाईचा भडका

देशात महागाईचा भडका उडाला आहे. दैनंदिन गरजेच्या वस्तूंच्या दरात देखील मोठी वाढ झाली आहे. पेट्रोल, डिझेलचे दर गगनाला भिडले आहेत. सीएनजी, पीएनजीचे दर देखील वाढत आहेत. आता जीएसटी वाढवल्यास महागाई आणखी वाढू शकते. महागाईचा परिणाम म्हणजे एप्रिल महिन्यात पेट्रोल, डिझेल सारख्या इंधनाच्या तसेच एफएमसीजी वस्तूंच्या मागणीत घट झाली आहे.

संबंधित बातम्या

LIC IPO: मोठी बातमी! 1550-1700 रुपयांदरम्यान असेल IPOची किंमत? सरकार वाढवू शकते IPOचा आकार

Today’s gold-silver prices : सोन्या-चांदीच्या दरात तेजी, सोन्याचे दर 54 हजारांवर

Inflation: महागाईनं खिसा फाडला! किरकोळ पाठोपाठ होलसेल बाजारातही महागाईचा उच्चांकी दर

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.