भारताच्या या शहराने बीजिंगचा हिसकावला श्रीमंतीचा मान, आता न्यूयॉर्क-लंडनच आहेत पुढे

Richest City : हुरुनच्या श्रीमंतांच्या यादीनुसार, 119 अब्जाधीश न्यूयॉर्क शहरात राहतात. दुसऱ्या क्रमांकावर लंडन हे शहर आहे. 97 अब्जाधीश या शहराचे रहिवाशी आहेत. तर तिसऱ्या क्रमांकावर चीनच्या बीजिंगला मागे टाकत भारतातील या शहराने स्थान पक्कं केले आहे.

भारताच्या या शहराने बीजिंगचा हिसकावला श्रीमंतीचा मान, आता न्यूयॉर्क-लंडनच आहेत पुढे
हे आहे आशियातील अब्जाधीशांचे शहर
Follow us
| Updated on: Mar 27, 2024 | 9:27 AM

शांघाईमधील हुरुन रिसर्च इन्स्टिट्यूटने जगातील सर्वाधीक अब्जाधीश राहत असलेल्या शहरांची यादी जाहीर केली आहे. या यादीत (Harun Global Rich List 2024) पहिल्या क्रमांकावर अमेरिकेतील न्यूयॉर्क या शहराचा पहिला क्रमांक लागतो. येथे 119 अब्जाधीश राहतात. दुसऱ्या क्रमांकावर ब्रिटिशांची राजधानी असलेल्या लंडनचा क्रमांक लागतो. या शहरात 97 अब्जाधीश वास्तव्याला आहेत. तर तिसऱ्या क्रमांकावर उलटफेर झाला आहे. चीनमधील बीजिंग या शहराकडून तिसरा क्रमांक भारतातील मुंबईने खेचून आणला आहे. आतापर्यंत तिसऱ्या क्रमांकावर बीजिंगचा डौल कायम होता. मुंबईने 92 अब्जाधीशांसह बीजिंगकडून मुकूट हिसकावला. आता लवकरच लंडनही मागे पडणार असल्याचा तज्ज्ञांचा दावा आहे. मग बीजिंगमध्ये किती अब्जाधीश आहेत?

मुंबईने बीजिंगला टाकले मागे

शांघाई 87 अब्जाधीशांसह या यादीत 5 व्या क्रमांकावर आहे. तर सहाव्या क्रमांकावर शेन्जेन हे शहर आहे. येथे 84 अब्जाधीश आहेत. 7 व्या स्थानावर हाँगकाँग शहर आहे. येथे 65 अब्जाधीशांचे वास्तव्य आहे. मुंबईने पहिल्यांदाच या यादीत आघाडी घेतली आहे. अब्जाधीशांच्या शहराचा मान पटकावला आहे. बीजिंगमध्ये अब्जाधीशांची संख्या 91 इतकी आहे. तर चीनमध्ये एकूण 814 अब्जाधीश आहेत. तर मुंबईत 92 अब्जाधीश आहेत. भारतात या घडीला 271 अब्जाधीश आहेत.

हे सुद्धा वाचा

ही आहेत कारणं

  • बीजिंग या यादीत मागे हटण्याची ही काही कारणं समोर आली आहेत.
  • मुंबईत यंदा 26 नवीन अब्जाधीशांची भर पडली आहे.
  • तर दुसरीकडे चीनमधील बीजिंगमधून 18 अब्जाधीशांनी काढता पाय घेतला आहे.
  • मुंबईतील एकूण अब्जाधीशांची संपत्ती 445 अब्ज डॉलर इतकी आहे.
  • गेल्यावर्षीपेक्षा अब्जाधीशांच्या संपत्तीत 47 टक्क्यांहून अधिकची वाढ झाली आहे.
  • तर बीजिंगच्या सर्व अब्जाधीशांच्या संपत्तीचे एकूण गणित 265 अब्ज डॉलर इतके आहे.
  • बीजिंगच्या अब्जाधीशांच्या संपत्तीत 28 टक्क्यांची घट झाली आहे.

अंबानी-अदानी हे दिग्गज मुंबईत

  1. रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी 115 अब्ज डॉलरसह पहिल्या क्रमांकावर आहेत. ते जगातील टॉप-10 मधील अब्जाधीश आहेत. तर आशियातील सर्वाधिक श्रीमंत उद्योगपती आहेत.
  2. अदानी समूहाचे चेअरमन गौतम अदानी 86 अब्ज डॉलरसह जगातील 15 व्या क्रमांकाचे अब्जाधीश
  3. HCL चे शिव नादर ग्लोबल रँकिंमध्ये 34 व्या क्रमांकवर आहेत.
  4. सीरमचे सायरस एस. पुनावाला श्रीमंतांच्या यादीत 55 व्या क्रमांकावर आहेत.
  5. दिलीप सांघवी 61, कुमार मंगलम बिर्ला 100 व्या, तर राधाकिसन दमानी हे पण यादीत
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार.
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार.
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?.
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे.
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर...
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर....
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल.
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.