Aptech CEO : ग्रामीण तरुणांना करुन दिली संगणकाची ओळख, अपटेक सीईओ अनिल पंत यांचे निधन

Aptech CEO : संगणक शिक्षण देणारी कंपनी अपटेकचे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ डॉ. अनिल पंत यांचे निधन झाले. या संस्थेने ग्रामीण भागातील तरुणांना संगणकांच्या शिक्षणाचे स्वप्न दाखवले. ते पूर्ण करण्यासाठी संगणकाचे शिक्षण पण दिले. 

Aptech CEO : ग्रामीण तरुणांना करुन दिली संगणकाची ओळख, अपटेक सीईओ अनिल पंत यांचे निधन
Follow us
| Updated on: Aug 16, 2023 | 2:09 PM

नवी दिल्ली | 16 ऑगस्ट 2023 : देशातील छोट्या शहरातील आणि ग्रामीण भागातील तरुणांसाठी काही वर्षांपूर्वी संगणक पाहणे सुद्धा मोठी गोष्ट होती. संगणकाचे वारे भारतात वाहत होते. संगणक ही त्यावेळी मोठ्या शहरातील लोकांची जणू मक्तेदारी होती. अशावेळी अपटेक (Aptech Computer ) या संगणक शिक्षणाचे धडे देणाऱ्या संस्थेने ग्रामीण भारतातील तरुणांना मोठा मंच उपलब्ध करुन दिला. त्यांना संगणकाची तोंडओळखच झाली नाही तर काही जणांनी त्या जोरावर नोकरी ही मिळवली. अपटेक लर्निंगचे एमडी आणि सीईओ डॉ. अनिल पंत (Dr. Anil Pant) यांचे निधन झाले आहे. ते अनेक दिवसांपासून आजारी होते. ते 19 जूनपासून सुट्टीवर होते. यासंबंधीची माहिती शेअर बाजाराला (Share Market) देण्यात आली होती. एक अंतरिम सीईओच्या नियुक्तीविषयी पण बाजाराला माहिती देण्यात आली होती.

कंपनीने दिली माहिती

अनिल पंत यांचे निधन 15 ऑगस्ट रोजी झाल्याची माहिती कंपनीने दिली आहे. त्यांची कमी सतत जाणवत राहील, असे कंपनीने सांगितले. अशा स्थितीत कंपनी, कर्मचारी पंत कुटुंबियांच्या सोबत असल्याचे सांगण्यात आले. अनिल पंत दीर्घ काळासाठी सुट्टीवर जात असल्याची माहिती यापूर्वीच शेअर बाजाराला देण्यात आली आहे. एक अंतरिम सीईओच्या नियुक्तीवर विचार करण्यात येत असल्याचे बाजाराला कळविण्यात आले होते.

हे सुद्धा वाचा

मलेशियात झाले होते शिक्षण

अनिल पंत यांनी आयटी आणि कम्युनिकेशन स्पेसमध्ये जवळपास 15 वर्षे काम केले. त्यांनी टाटा कन्सल्टेन्सीमध्ये आणि सिफी टेक्नॉलॉजीमध्ये योगदान दिले. 2016 मध्ये ते अपटेक रुजू झाले. त्यानंतर कंपनीने मोठी घौडदौड केली. त्यांनी सेल्स, क्वालिटी, मार्केटिंग, डिलिव्हरी आणि प्रोडक्ट मॅनेजमेंट या विषयांत त्यांचा मोठा अभ्यास होता. पंत यांनी अभियांत्रिकीची पदवी मिळवली होती. त्यानंतर ते मलेशियातील लिंकन विद्यापीठातून त्यांनी माहिती तंत्रज्ञानात पीएचडी पण केली.

ग्रामीण भागात पोहचवले शिक्षण

अपटेक पूर्वीपासून छोट्या शहरात आणि ग्रामीण भागात कम्युटर एज्युकेशन पोहचवत होती. अनिल पंत कंपनीत आल्यानंतर ही प्रक्रिया अजून गतीमान झाली. कंपनीला अनेक पुरस्कार आणि प्रमाणपत्र मिळाली. कंम्युटर क्षेत्रात योगदान दिल्याबद्दल सन्मानपत्र पण मिळाले. ग्रामीण भागातील तरुणांना या प्लॅटफॉर्ममुळे संगणक शिक्षणासाठी मोठी मदत झाली.

19 जून रोजी आपत्कालीन बैठक

या 19 जून रोजी कंपनीने एक आपत्कालीन बैठक घेतली होती. कंपनीच्या व्यवस्थापनासाठी आणि रोजची कामे पार पाडण्यासाठी एक समिती गठित करण्यात आली आहे. कंपनी बोर्डातील काही सदस्य आणि व्यवस्थापनातील वरिष्ठांचा या समितीत सहभाग आहे. ही समिती अंतरिम सीईओची पण निवड करणार आहे.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.