Israel Hamas War | इस्त्राईल-हमास युद्धाने पालटला नूर, शेअर बाजारात गुंतवणूकदार मालामाल

Israel Hamas War | इस्त्राईल-पॅलेस्टाईन वादाला मंगळवारी शेअर बाजार पुरुन उरला. अनेक कंपन्यांनी जोरदार आघाडी उघडली. सेन्सेक्समध्ये भारती एअरटेल, कोटक बँक, जेएसडब्ल्यू स्टील आणि टाटा मोटर्सने 2-3 टक्क्यांची उसळी घेतली. तर इंडसइंड बँक, टीसीएस आणि टायटन यांना फटका बसला. माझगाव डॉक शिपबिल्डर्स 5 टक्क्यांसह वधारुन बंद झाला.

Israel Hamas War | इस्त्राईल-हमास युद्धाने पालटला नूर, शेअर बाजारात गुंतवणूकदार मालामाल
Follow us
| Updated on: Oct 10, 2023 | 6:50 PM

नवी दिल्ली | 10 ऑक्टोबर 2023 : इस्त्राईल-हमास यांच्यात युद्ध (Israel Hamas War) संपण्याचे सध्यातरी कोणतेच चिन्ह नाहीत. हमासने आगळीक केल्याने आता इतर राष्ट्रांनी मध्यस्थी केल्याशिवाय हा तिढा सध्या संपणे अशक्य दिसते. आठवड्याच्या सुरुवातीला, सोमवारी भारतीय शेअर बाजारांनी तात्काळ प्रतिक्रिया नोंदवली होती. बाजार गडगडला होता. पण मंगळवारी बाजाराने जोरदार आघाडी उघडली. गुंतवणूकदारांनी भारतीय कंपन्यांच्या कामगिरीवर लक्ष ठेवले होते. पण शेअर बाजार या युद्धाला पुरुन उरला. बँकिंग, वित्तीय आणि आयटी शेअरमध्ये मोठी वाढ दिसली. या कारणामुळे शेअर बाजारात (Share Market) गुंतवणूकदारांनी 3.57 लाख कोटी रुपये छापले. कोणत्या सेक्टरने कशी उसळी घेतली, कोणते शेअर सूसाट धावले?

Sensex, Nifty मध्ये उसळी

मुंबई स्टॉक एक्सचेंजचा प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स 567 अंकांनी वधारला. तो 66,079 अंकावर बंद झाला. तर नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा प्रमुख निर्देशांक निफ्टीने 177 अंकांची आघाडी घेतली. तो 19,689 अंकावर बंद झाला. सेन्सेक्समध्ये भारती एअरटेल, कोटक बँक, जेएसडब्ल्यू स्टील आणि टाटा मोटर्सने 2-3 टक्क्यांची उसळी घेतली. तर इंडसइंड बँक, टीसीएस आणि टायटन शेअर उतरणीला लागले. तर माझगाव डॉक शिपबिल्डर्स 5 टक्क्यांसह वधारुन बंद झाला.

हे सुद्धा वाचा

PSU Bank शेअरमध्ये तेजी

सुझलॉन एनर्जीचे शेअर सलग दुसऱ्या दिवशी 5 टक्के लोअर सर्किटवर बंद झाला. प्रेस्टीज इस्टेट 8 टक्क्यांनी तर शोभा 6 टक्क्यांनी वधारला. त्यामुळे निफ्टी रिएल्टी इंडेक्स 4 टक्क्यांनी वधारला. युनियन बँक आणि इंडियन ओव्हरसीज बँकेने सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या शेअर्समध्ये आघाडी घेतली. या शेअरमध्ये 2.1 टक्क्यांची वाढ दिसून आली. निफ्टी स्मॉलकॅप 100 आणि निफ्टी मिडकॅपने 1.4 टक्क्यांची वृद्धी नोंदवली.

गुंतवणूकदार मालामाल

बीएसईवरील सर्व सूचीबद्ध कंपन्यांच्या मार्केट कॅपमध्ये मोठी वाढ दिसून आली. त्यामुळे गुंतवणूकदारांची मोठी कमाई झाली. आकड्यानुसार, बीएसईच्या मार्केट कॅपमध्ये 3.57 लाख कोटी रुपयांची वाढ झाली. त्यामुळे बीएसई मार्केट कॅप 319.75 लाख कोटी रुपयांचे झाले. तज्ज्ञांच्या मते, युद्धाचे ढग असले तरी शेअर बाजारात तेजी दिसून येईल. केवळ इस्त्राईल आणि मध्य-पूर्वेशी संबंधित कंपन्यांच्या शेअरमध्ये मोठा चढउतार होऊ शकतो.

Non Stop LIVE Update
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या...
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या....
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?.
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला.
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका.
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका.
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं..
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं...
डोंबिवलीत भाजपचं कार्यालय फोडल, कोणी केल्ला हल्ला? घटना CCTV मध्ये कैद
डोंबिवलीत भाजपचं कार्यालय फोडल, कोणी केल्ला हल्ला? घटना CCTV मध्ये कैद.
एकनाथ शिंदेंच्या आमदारानं पैसे वाटले? विधानसभेच्या तोंडावर अडचणी वाढल्
एकनाथ शिंदेंच्या आमदारानं पैसे वाटले? विधानसभेच्या तोंडावर अडचणी वाढल्.
पंकजा मुंडेंकडून भाऊ धनंजय मुंडेंना खास गिफ्ट, सभेतून काय केली घोषणा?
पंकजा मुंडेंकडून भाऊ धनंजय मुंडेंना खास गिफ्ट, सभेतून काय केली घोषणा?.
पवार कुटुंबातील कटुता भविष्यात दूर होणार? अजित पवारांचं मोठं वक्तव्य
पवार कुटुंबातील कटुता भविष्यात दूर होणार? अजित पवारांचं मोठं वक्तव्य.