लॉकडाऊनकाळातील बुकिंग, विमान कंपन्यांकडून प्रवाशांना कोट्यावधी रुपये रिफंड केल्याचा दावा, काय सत्य?

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर विमान वाहतूक कंपन्यांनी 3200 कोटी रुपये रक्कम प्रवाशांना परत दिली आहे. (Aviation companies refund 3200 crore rupees)

लॉकडाऊनकाळातील बुकिंग, विमान कंपन्यांकडून प्रवाशांना कोट्यावधी रुपये रिफंड केल्याचा दावा, काय सत्य?
Follow us
| Updated on: Dec 12, 2020 | 11:51 AM

नवी दिल्ली : कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी भारतात 24 मार्चपासून लॉकडाऊन करण्यात आले. यानंतर देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक बंद करण्यात आली होती. लॉकडाऊन काळातील रद्द झालेल्या तिकिटांची 75 टक्के रक्कम प्रवाशांना परत केल्याचा दावा विमान वाहतूक कंपन्यांनी केला आहे. नागरी उड्डयन मंत्रालयाने प्रवाशांना 74.3 टक्के रक्कम परत केल्याचे जाहीर केले आहे. विमान वाहतूक कंपन्यांनी 3200 कोटी रुपये रक्कम प्रवाशांना परत दिली आहे.  (Aviation companies refund 3200 crore rupees)

सर्वोच्च न्यायालयाने 1 ऑक्टोबरला विमान वाहतूक कंपन्यांना प्रवाशांची तिकीटाची रक्कम परत करण्याचे आदेश दिले होते. या आदेशानुसार 25 मार्च ते 24 मे दरम्यानच्या कालावधीतील तिकीटांची रक्कम परत करण्यास सागितले होते.

प्रवाशांचे 3 हजार 200 कोटी परत

केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्रालयानं याबाबत ट्विट करुन माहिती दिली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार 55 लाख 23 हजार 940 तिकिटांपैकी 74.3 टक्के प्रवाशांचे 3 हजार 200 कोटी रुपये परत करण्यात आले आहेत. उर्वरित प्रवाशांना रक्कम परत करण्याचे काम सुरु आहे, असंही मंत्रालयाकडून सांगण्यात आले. लॉकडाऊनमुळे भारतात 25 मार्चपासून आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत विमान वाहतुकीवर बंदी घालण्यात आली होती. 25 मार्चला बंद करण्यात आलेली विमान वाहतूक काही नियमांसह 25 मेपासून सुरु करण्यात आली. (Aviation companies refund 3200 crore rupees)

नागरी उड्डयन मंत्रालयाने 27 जूनपासून प्रवासी क्षमता 45 टक्क्यांपर्यंत वाढवली होती. यानंतर 2 सप्टेंबरला प्रवासी क्षमता 60 टक्केपर्यंत वाढवण्यात आली होती. मंत्रालयाने 11 नोव्हेंबरला विमान कंपन्यांना 70 टक्के प्रवासी क्षमतेसह उड्डाण करण्यास परवानगी दिली आहे. यापूर्वी विमान कंपन्यांची विमानं 60 टक्के प्रवासी क्षमतेने उड्डाण करत होती. केंद्रीय मंत्री हरदीपसिंग पुरी म्हणाले की, 25 मे रोजी 30,000 प्रवाशांसह देशांतर्गत उड्डाणे सुरू करण्यात आली होती. 8 नोव्हेंबर 2020 रोजी देशांतर्गत हवाई प्रवाशांची संख्या 2.06 लाखांवर पोहोचली. नागरी उड्डयन मंत्रालयाने वाढती मागणी लक्षात घेता सरकारने ही मर्यादा वाढवून 70 टक्के केली आहे.

संबंधित बातम्या :

कोरोना प्रकरणांमध्ये कमालीची घट, एअरलाइन्सला 70% प्रवासी क्षमतेसह विमान उड्डाणाची परवानगी

राज ठाकरेंची सूचना, सरकारकडून अंमलबजावणी, देशांतर्गत विमान उड्डाणं बंद

(Aviation companies refund 3200 crore rupees)

सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.