रोख व्यवहारात कधीही करु नका ‘या’ 5 चुका, अन्यथा भरावा लागू शकतो इन्कम टॅक्स

तुम्हालाही रोख रक्कमेत आर्थिक व्यवहार करण्याची सवय आहे का? तर मग तुम्हाला अधिक सावधगिरी बाळगावी लागेल. (Avoid These Five Mistake While Cash Transaction)

रोख व्यवहारात कधीही करु नका 'या' 5 चुका, अन्यथा भरावा लागू शकतो इन्कम टॅक्स
Income-tax
Follow us
| Updated on: May 24, 2021 | 9:31 AM

मुंबई : तुम्हालाही रोख रक्कमेत आर्थिक व्यवहार करण्याची सवय आहे का? तर मग तुम्हाला अधिक सावधगिरी बाळगावी लागेल. कारण तुमची थोडीशी चूक ही तुम्हाला इन्कम टॅक्स विभागाच्या नजरेत येऊ शकते. या पार्श्वभूमीवर बँक, म्युच्युअल फंड, घर खरेदी, दलाल इत्यादींनी सर्वसामान्यांना काही नियम कठोर केले आहेत. त्यामुळे काळा पैशात होणारी देवाण-घेवाण रोखता येऊ शकते. (Avoid These Five Mistake While Cash Transaction)

?निश्चित रक्कमेपेक्षा भरावा लागेल जास्त कर

जर तुम्ही फिक्स्ड डिपॉझिट (Fixed Deposit) मध्ये रोख रक्कम जमा करत असाल तर ही रक्कम 10 लाख रुपयांपेक्षा जास्त नसावी. जर रक्कम दिलेल्या मर्यादेपेक्षा जास्त असेल तर तुम्ही जमा केलेल्या रक्कमेवर तुम्हाला कर भरावा लागू शकतो.

?मालमत्ता खरेदी करताना सावध

मालमत्ता खरेदी करताना किंवा विक्री करताना कोणताही रोख व्यवहार हा 30 लाख रुपयांपेक्षा जास्त नसावी. जर ही रक्कम 30 लाख रुपयांहून अधिक असेल तर तुम्ही इन्कम टॅक्सच्या नजरेत येऊ शकता.

? बचत खात्यात रोख रक्कम ठेवण्याची मर्यादा 

एखाद्या व्यक्तीच्या बचत खात्यात रोख रक्कम ठेवण्याची मर्यादा 1 लाख रुपये इतकी आहे. जर बचत खातेधारकाने आपल्या बचत खात्यात एक लाखाहून अधिक रुपये जमा केले तर आयकर विभाग तुम्हाला नोटीस पाठवू शकतो. तसेच चालू खातेधारकांसाठी ही मर्यादा 50 लाख रुपये इतकी आहे. जर तुम्ही या मर्यादेचे उल्लंघन केल्यास तुम्हाला आयकर विभागाच्या नोटीसला उत्तर द्यावे लागू शकते.

?म्युच्युअल फंड, स्टॉकवरही मर्यादा

म्युच्युअल फंड, स्टॉक, बाँड किंवा डिबेंचरमध्ये गुंतवणूक करणार्‍या लोकांनाही व्यवहाराच्या वेळी काळजी घेणे गरजेचे आहे. जर तुम्ही यात गुंतवणूक करत असाल तर साधारण 10 लाखांपर्यत रोख रक्कमेत व्यवहार करावा. या मर्यादेचे पालन न केल्यास आयकर विभाग तुम्हाला इन्कम टॅक्स रिटर्न (ITR) पाठवून तुमची तपासणी करु शकतो.

?क्रेडिट कार्डचे बिल भरताना काळजी घ्या

क्रेडिट कार्डचे बिल रोख रक्कमेद्वारे भरताना 1 लाख रुपयांची मर्यादा ओलांडू नये. जर तुम्ही क्रेडिट कार्ड बिल रोख रक्कमेच्या मर्यादेपेक्षा जास्त पैसे भरल्यास आयकर विभाग तुमचे खाते तपासू शकते. (Avoid These Five Mistake While Cash Transaction)

संबंधित बातम्या : 

मोठी बातमी! कर्मचार्‍यांच्या मृत्यूनंतरही 60 वर्षे पूर्ण वेतन, घर आणि मुलांचे शिक्षण विनामूल्य, सर्व खर्च टाटा उचलणार

SIP मध्ये गुंतवणूक केल्यास 50 लाखांपर्यंत मिळणार विनामूल्य विमा, तुम्हाला फायदा काय?

PPF Account : मुलाच्या नावे केवळ 500 रुपयांमध्ये उघडा खाते, करात सूट अन् लाखोंचा फायदा

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.