गौतम अदानी यांचा शनी वक्री; लाच आणि फसवणुक देण्याचा गंभीर आरोप, शेअरमध्ये मोठा भूकंप

Gautam Adani Big News Update : गौतम अदानी यांची संकटांची मालिका सुरूच आहे. आता त्यांच्या समूहावर अमेरिकेत गंभीर आरोप लावण्यात आले आहेत. न्यूयॉर्क येथील न्यायालयात अदानी यांच्यासह सात लोकांवर 21 अब्ज, 10 कोटी, 83 लाख, 25 हजारांची लाच देण्याचा आणि फसवणुकीचा ठपका ठेवण्यात आला आहे.

गौतम अदानी यांचा शनी वक्री; लाच आणि फसवणुक देण्याचा गंभीर आरोप, शेअरमध्ये मोठा भूकंप
गौतम अदानी अमेरिका
Follow us
| Updated on: Nov 21, 2024 | 10:45 AM

अदानी समूहाचे संचालक आणि देशातील दुसरे सर्वात श्रीमंत उद्योगपती गौतम अदानी यांच्या अडचणी कमी होण्याचे नाव घेत नाहीत. त्यांच्यावर अजून एक गंभीर आरोप झाला आहे. अमेरिकेमधील न्यूयॉर्क येथील न्यायालयात गौतम अदानी यांच्यासह सात लोकांवर 250 दशलक्ष डॉलर, भारतीय चलनात 21 अब्ज, 10 कोटी, 83 लाख, 25 हजारांची लाच देण्याचा आणि फसवणुकीचा ठपका ठेवण्यात आला आहे. सौरऊर्जा प्रकल्पाचे कंत्राट मिळवण्यासाठी स्थानिक अधिकाऱ्यांना आमिष आणि लालूच दाखवण्याच्या प्रकरणात अदानी समूह अडचणीत आला आहे.

अमेरिकेत अदानी समूहाची चौकशी

अमेरिकेतली न्यूयॉर्कमधील न्यायालयात धाव घेतलेल्या फिर्यादी पक्षानुसार, गौतम अदानी यांच्यासह इतर लोकांनी अमेरिकेत गुंतवणूकदारांकडून पैसा जमा करताना भुलथापा दिल्या. अदानी समूहाची कंपनी अदानी ग्रीन एनर्जीचे कार्यकारी संचालक सागर अदानी आणि व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ निवीत जैन यांच्यावर अमेरिकेन कायदा उल्लंघन केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. ब्लूमबर्गच्या वृत्तानुसार, अमेरिकेमधील MEC चे अधिकारी या आरोपांची चौकशी करत आहे. त्यात अदानी समूहाने हा प्रकल्प हस्तगत करण्यासाठी लाच तर दिली नाही ना, याची चौकशी करण्यात येत आहे.

हे सुद्धा वाचा

आरोपांची मालिका काय?

न्यूयॉर्कमधील इस्टर्न डिस्ट्रिक्ट्रने याविषयीचा निकाल दिला आहे. त्यानुसार, 2020 ते 2024 या काळात अमेरिकन एक्सचेंजवर सूचीबद्ध एका अक्षय ऊर्जा क्षेत्रातील भारतीय कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने कॅनडा येथील संस्थागत गुंतवणूकदाराशी भागीदारी केली आणि भारतीय सरकारी अधिकाऱ्यांना लाच देण्याचा प्रयत्न केला. भारत सरकारच्या संस्थांना सौरऊर्जा पुरवठा करार सुनिश्चित करण्यासाठी हे लाच कांड करण्यात आल्याचा ठपका या निकालात ठेवण्यात आला.

तर या भारतीय कंपनीच्या वरिष्ठांनी अमेरिकेतली गुंतवणूकदार आणि जागतिक वित्तीय संस्थांना कंपनीच्या ध्येय धोरणाविषयी चुकीची माहिती दिली. भारतीय अधिकाऱ्यांना लाच देऊन ग्रीन एनर्जी प्रकल्पासाठी ही कंपनी अब्जावधींचा निधी जमा करत असल्याबद्दल अदानी समूहाने गुंतवणूकदारांना अंधारात ठेवल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.

अदानींच्या शेअरला मोठी घरघर

अदानी समूहाचे संचालक आणि देशातील दुसरे सर्वात श्रीमंत उद्योगपती यांचे नाव अमेरिकेत थेट लाच प्रकरणात समोर आल्याने भारतीय शेअर बाजारात अदानी समूहाचे शेअर आपटले. अदानी समूहाचे शेअर सकाळच्या सत्रात 20 टक्क्यांनी घसरले. अदानी एनर्जी सोल्यूशन्सचा शेअर 20 टक्क्यांनी आपटला. या समूहाची फ्लॅगशिप कंपनी अदानी एंटरप्राईजेजचा शेअर 10 टक्क्यांच्या पिछाडीवर आहे. या दोन्ही शेअरमध्ये निच्चांकी घसरण नोंद झाली आहे. अदानी पोर्ट्समध्ये 10 टक्के, अंबुजा सिमेंटमध्ये 10 टक्के, अदानी पॉवरमध्ये 16 टक्क्यांची घसरण दिसत आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.