खाजगीकरणाविरोधात बँकांचा दोन दिवस संप, मार्च महिन्यात संपाची घोषणा
खाजगीकरणाविरोधात बँकांचा दोन दिवस संप, मार्च महिन्यात संपाची घोषणा(bank hold strike against privatisation)
नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी अर्थसंकल्पलीय भाषणात विनिवेश कार्यक्रमाअंतर्गत सार्वजनिक क्षेत्रातील दोन बँकांचे खाजगीकरण करण्याची घोषणा केली. बँकांच्या या प्रस्तावित खाजगीकरणाविरोधात बँकांच्या 9 संघटना मिळून असलेली संघटना युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स (UFBU) ने दोन दिवसाचा संप घोषित केला आहे. पुढील महिन्यात 15 मार्च व 16 मार्च रोजी दोन दिवसीय संप असणार आहे.(bank hold strike against privatisation)
बँक संघटनांच्या बैठकीत निर्णय
सरकारने याआधीच 2019 मध्ये आयडीबीआय बँकेतील आपला बहुतांश हिस्सा भारतीय जीवन बीमा निगम (LIC)ला विकून बँकेचे खाजगीकरण केले आहे. शिवाय गेल्या चार वर्षात सार्वजनिक क्षेत्रातील 14 बँकांचे विलिनीकरण केले. ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज एसोसिएशन (एआयबीईए) चे महासचिव सी.एच. वेंकटचलम यांनी सांगितले की, युएफबीयूच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत सरकारच्या खाजगीकरण निर्णयाचा विरोध करण्याचा निर्णय घेण्यात आला. बैठकीत केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पातील सुधारणांबाबत करण्यात आलेल्या विविध घोषणांवर चर्चा करण्यात आली. यात आयडीबीआय बँक आणि सार्वजनिक क्षेत्रातील दोन बँकांचे खाजगीकरण, बॅड बँकांची स्थापना, एलआयसी (LIC)मध्ये विनिवेश, विमा कंपनीचे खाजगीकरण, विमा क्षेत्रात 74 टक्के प्रत्यक्ष परदेशी गुंतवणूक(FDI)ला मंजुरी आणि सार्वजनिक उपक्रमातील हिस्स्याची विक्री आदि बाबींवर चर्चा झाल्याचे वेंकटचलम यांनी नमूद केले. एआयबीओसीचे महासचिव सौम्य दत्तांनी सांगितले की, विचार-परामर्श केल्यानंतर सरकारच्या निर्णयाविरोधात 15 मार्च आणि 16 मार्च रोजी दोन दिवसीय संप करण्याचा निर्णय घेतला आहे.
युएफबीयूमध्ये या संघटनांचा आहे समावेश
युएफबीयूच्या सदस्यांमध्ये ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशन (AIBEA), ऑल इंडिया बँक ऑफिसर्स कॉन्फेडरेशन (AIBOC), नॅशनल कॉन्फेडरेशन ऑफ बँक एम्प्लॉईज (NCBE), ऑल इंडिया बँक ऑफिसर्स असोसिएशन (AIBOA) आणि बँक एम्प्लॉईज कॉन्फेडरेशन ऑफ इंडिया (BEFI) या संघटना सहभागी आहेत. याव्यतिरिक्त इंडियन नॅशनल बँक एम्प्लॉईज फेडरेशन (INBEF), इंडियन नॅशनल बँक ऑफिसर्स काँग्रेस (INBOC), नँशनल ऑर्गनाईझेशन ऑफ बँक वर्कर्स (NOBW) आणि नॅशनल आर्गनाईझेशन ऑफ बँक ऑफिसर्स (NOBO) यांचाही समावेश आहे.(bank hold strike against privatisation)
पंतप्रधान देशाची परंपरा विसरले, अहिंसक आंदोलनामुळेच देश स्वतंत्र – राजू शेट्टी https://t.co/l6DMwKioue @rajushetti @PMOIndia @narendramodi @PawarSpeaks #andolanjivi #NarendraModi #rajushetty #FarmersProtest
— TV9 Marathi (@TV9Marathi) February 9, 2021
इतर बातम्या
लॉकडाऊन काळात टाईमपास म्हणून प्रयोग केला, आता घरीबसल्या बक्कळ कमाई!
क्रिप्टोकरन्सी बिल अंतिम टप्प्यात, लवकरच केंद्रीय मंत्रिमंडळाकडे पाठवलं जाणार