Bank Holidays in April 2023 : एप्रिल फुल नाही, इतक्या दिवस बँकांना टाळे! कर्मचाऱ्यांची मज्जा, ग्राहकांना ताप

Bank Holidays in April 2023 : एप्रिल महिन्यात बँकांना बंपर सुट्यांचा हंगाम आहे. कर्मचाऱ्यांसाठी हे सुगीचे दिवस आहे. एकतर मार्च एंडची त्यांची चिंता मिटलेली असेल, पण ग्राहकांना आता पटकन बँकेची कामं उरकून घ्यावी लागतील.

Bank Holidays in April 2023 : एप्रिल फुल नाही, इतक्या दिवस बँकांना टाळे! कर्मचाऱ्यांची मज्जा, ग्राहकांना ताप
Follow us
| Updated on: Mar 23, 2023 | 7:01 PM

नवी दिल्ली : एप्रिल महिना आता अगदी जवळ आला आहे. मार्च एंडच्या चिंतेतून लवकरच कर्मचाऱ्यांना मुक्ती मिळेल. एप्रिल महिन्यात (April 2023) बँकांना बंपर सुट्यांचा (Bank Holidays) हंगाम आहे. कर्मचाऱ्यांसाठी हे सुगीचे दिवस आहे. एकतर मार्च एंडची त्यांची चिंता मिटलेली असेल, पण ग्राहकांना आता पटकन बँकेची कामं उरकून घ्यावी लागतील. बँकांमध्ये मार्च ते एप्रिल या काळात वर्किंग सायकल सुरु असते. एप्रिल महिन्यात सुट्यांचा सुकाळ असल्याने ग्राहकांना आता पटकन बँकेची कामं उरकून घ्यावी लागतील. तर कर्मचाऱ्यांना या सुट्यांचा फायदा मिळणार आहे. या सुट्यांच्या यादीवरुन तुम्हाला कोणत्या दिवशी बँकेत जायचे हे कळेल.

एप्रिल महिन्यात केव्हा बंद राहतील बँका

बँकिंग रेग्युलेटर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, देशातील बँकांसाठी सुट्यांची यादी जाहीर केली. या वर्षी एप्रिल महिन्यात बँकांना एकूण 15 दिवस सुट्या असतील. यामध्ये सण, जयंती आणि साप्ताहिक सुट्यांचा समावेश आहे. महिन्याची सुरुवातच सुटीपासून होत आहे. त्यामुळे बँकेतील काही कामे असतील तर ती पटकन उरकून घ्या. सुट्यांची यादी पाहूनच बँकेचा रस्ता धरा.

हे सुद्धा वाचा

एकाच वेळी नसते सुट्टी

पण संपूर्ण भारतात एकाच दिवशी सगळ्याच बँका बंद राहतील असे नाही. काही भागात सुट्टी असली तरी इतर राज्यात मात्र त्यादिवशी कामकाज सुरु राहिल. त्यामळे बँकेसंबंधी काही कामकाज असेल तर त्वरीत उरकून घ्या. RBI द्वारे बँकांना सुट्टी जाहीर करण्यात येते. पण सर्वच राज्यातील बँकांना एकाच दिवशी सुट्या नसतात. काही राज्यातच बँका बंद असतात. पण मोठ्या सणाला, राष्ट्रीय सणाला मात्र सर्वच बँकांना सुट्टी असते.

व्यवहार करता येणार

बँकेला सुट्टी असली की शटर डाऊन असते, अर्थात बँकिंगचे काम पूर्णपणे थांबत नाही. ऑनलाइन बँकिंग सेवा पूर्वीप्रमाणेच चालू राहील आणि आपण सुट्टीच्या दिवशी ही आपले काम हाताळू शकता. पण ग्राहकांना बॅंकेच्या शाखेत जाऊन त्यांचे पैसे जमा करता येणार नाहीत किंवा शाखेतून पैसे काढता येणार नाहीत. परंतु एटीएममध्ये अशा सेवा उपलब्ध राहतील. ऑनलाईन बँकिंग सेवा, एटीएम आणि मोबाइल बँकिंग सुरू राहील. काही शहरांमध्ये विशिष्ट दिवशी सर्व बँका एकाच वेळी बंद राहतील. तर क्रेडिट, डेबिट कार्ड आणि युपीआयचा वापर करुन ऑनलाईन पेमेंट करता येईल.

एप्रिलमध्ये सुट्याच सुट्या

  1. 1 एप्रिल- बँकांचं वार्षिक क्लोजिंग. देशात बँका बंद राहतील. शिलाँग, शिमला, चंदीगढमध्ये कामकाज सुरु
  2. 2 एप्रिल- रविवारची साप्ताहिक सुट्टी
  3. 4 एप्रिल- महावीर जयंतीची सुट्टी, बँका बंद
  4. 5 एप्रिल- बाबू जगजीवनराम जयंती, हैदराबादमध्ये बँका बंद
  5. 7 एप्रिल- गुडफ्रायडे, देशभरातील बँका बंद, अगरतळा, गुवाहाटी, जयपूर, जम्मू, शिमला आणि श्रीनगरमध्ये कामकाज
  6. 8 एप्रिल- महिन्यातील दुसरा शनिवार, कामकाज बंद
  7. 9 एप्रिल- रविवार, साप्ताहिक सुट्टी
  8. 14 एप्रिल- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आबेडकर जयंती, देशभरातील बँकांना सुट्टी, काही ठिकाणी कामकाज
  9. 15 एप्रिल- विशु, बोहाग बिहू, हिमाचल दिवस, बंगाली नववर्ष, बँका बंद
  10. 16 एप्रिल- रविवारची साप्ताहिक सुट्टी
  11. 18 एप्रिल- शब-ए-कद्र, जम्मू आणि श्रीनगरमधील बँका बंद
  12. 21 एप्रिल- ईद-उल-फितर, जम्मू, श्रीनगर, अगरतळा, कोच्ची, तिरुवअनंतपूरम बँकांना सुट्टी
  13. 22 एप्रिल- ईद आणि महिन्यातील चौथा शनिवार, बँका बंद
  14. 23 एप्रिल – रविवार, साप्ताहिक सुट्टी
  15. 30 एप्रिल- रविवार, साप्ताहिक सुट्टी

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.