Bank Strike : बँकेत सध्या जंगल राज, या संघटनेचा सरकारविरोधात एल्गार, या दिवशी पुन्हा बंदची दिली हाक

Bank Strike : जंगल राज, जंगल राजचा नारा देत , बँक संघटनांनी देशव्यापी संपाची हाक दिली आहे.

Bank Strike : बँकेत सध्या जंगल राज, या संघटनेचा सरकारविरोधात एल्गार, या दिवशी पुन्हा बंदची दिली हाक
बँक बंदची हाक Image Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Oct 26, 2022 | 5:41 PM

नवी दिल्ली : पुढील महिन्यात बँकेत काही महत्वाचे काम असेल तर ही बातमी तुमच्यासाठीच. कारण बँक संघटनांनी पुन्हा एकदा देशव्यापी बंदची (Bank Strike) हाकाटी पिटली आहे. नोव्हेंबर महिन्यात बँक संघटना (Bank Organization) सरकारच्या धोरणांविरोधात (Government Policy) एक दिवसाचा संप करणार आहे. त्यादिवशी बँकांचे कामकाज ठप्प होईल.

नोव्हेंबर महिन्यात अखिल भारतीय बँक कर्मचारी संघाने (AIBEA) एक दिवसाचा बँक संपाची हाक दिली आहे. 19 नोव्हेंबर रोजी बँक एक दिवसांसाठी बंद राहतील. याविषयीची माहिती भारतीय बँक कर्मचारी संघाच्या पदाधिकाऱ्याने दिली आहे.

बँकेची मालमत्ता आणि बँकर्सवर सध्या हल्ल्याचे प्रमाण वाढले आहे. या हल्ल्यांमागे सुसूत्रता समोर आली आहे. पण दोषींविरोधात अद्यापही ठोस कारवाई झाल्याचे आणि यामागे कोणाचा हात आहे हे सिद्ध झालेले नाही. त्याविरोधात बँक कर्मचारी एक दिवसांचा देशव्यापी संप करणार आहेत.

हे सुद्धा वाचा

या हल्ल्यांमागे काही जणांचे षडयंत्र आहे. बँकर्सवर हल्ल्यांचे प्रमाण चिंताजनक आहे. एवढेच नाही तर संघटनेतील काही पदाधिकाऱ्यांना बँकांनी जाणून बुजून कामावरुन कमी केले आहे. हा कर्मचाऱ्यांवर अन्याय आहे.

बँक ऑफ महाराष्ट्र (Bank Of Maharashatra), कॅनेरा बँक (Canara Bank), बँकऑफ इंडिया (Bank Of India), बँक ऑफ बडोदा (Bank Of Baroda) आणि आयडीबीआय बँक (IDBI Bank) यामध्ये आऊट सोर्सिंग वाढली आहे.

संघटनांचा आरोप आहे की काही बँकामध्ये तर अक्षरशः जंगल राज सुरु आहे. यामध्ये सेंट्रल बँक ऑफ इंडियाचा क्रमांक सर्वात अगोदर येतो. या बँकेत 3300 कर्मचाऱ्यांची बेकायदा बदली करण्यात आली आहे. इतर बँकामध्ये ही नियम धाब्यावर बसविण्यात आले आहे.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.