Home Loan | EMI चुकल्यास ग्राहकांकडून मोठी वसुली, एका दिवसाच्या दिरंगाईला किती शुल्क?

प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात त्याचं स्वप्न असतेच, ते म्हणजे स्वत:चं घर असणे (Missed EMI). मग ती व्यक्ती श्रीमंत असो, गरिब घरातील, असो की मध्यमवर्गीय.

Home Loan | EMI चुकल्यास ग्राहकांकडून मोठी वसुली, एका दिवसाच्या दिरंगाईला किती शुल्क?
Bank
Follow us
| Updated on: May 21, 2021 | 12:49 PM

मुंबई : प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात त्याचं एक स्वप्न असतेच, ते म्हणजे स्वत:चं घर असणे (Missed EMI). मग ती व्यक्ती श्रीमंत असो, गरिब घरातील असो की मध्यमवर्गीय. मध्यमवर्गीय लोकांसाठी घर हे फक्त एक स्वप्न नाही तर त्यांच्या आयुष्यभराची जमवलेली संपत्ती असते. त्यामुळे त्यांच्यासाठी स्वत:चं घर असणे खूप मोठी गोष्ट असते. आपल्यातील बरेच जण आपल्या घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी बँकांकडून गृह कर्ज घेतात. परंतु तुम्हाला माहिती आहे काय की होम लोन बँका शुल्काच्या नावाखाली मोठा पैसा कमावतात (Banks Charged Big Amount On Missed EMI Big Banks Charged 750 Rupees)?

खासकरुन खासगी बँकांमध्ये त्याचे शुल्क 750 रुपयांपर्यंत आहे. म्हणजेच, जर तुमचा ईएमआय चेक किंवा ईसीएस एक दिवसासाठी देखील बाऊन्स झाला, तर शुल्काच्या नावाखाली तुमच्या खात्यातून एक मोठी रक्कम वजा केली जाते.

देशातील जवळपास सर्व सरकारी आणि खासगी बँका घर खरेदीदारांना गृह कर्जाची सुविधा देतात. ज्यावर कर्ज घेताना प्रक्रिया शुल्काच्या नावाखाली मोठं शुल्क आकारले जाते. हे प्रक्रिया शुल्क वेगवेगळ्या बँकेत वेगवेगळे असते. परंतु कर्जाच्या कालावधीत, आपण ईएमआय चुकवल्यास आपल्याकडून बाऊन्स शुल्क आकारले जाते.

मोठ्या बँकां किती शुल्क आकारतात?

कर्जाच हप्ता चुकल्यास मोठमोठ्या ते लहान बँका ग्राहकांकडून वेगवेगळे शुल्क आकारतात. एसबीआय अर्थात देशातील सर्वात मोठी सार्वजनिक बँक एकदा ईसीएस बाऊन्स झाल्यावर शुल्क म्हणून 295 रुपये आकारते. पण, जर त्यानंतरही तुमचा हप्ता बाऊन्स होत राहिला तर तुम्हाला 500 रुपये अधिक जीएसटी द्यावा लागतो.

दुसरीकडे, जर आपण देशातील सर्वात मोठी खासगी बँक आयसीआयसीआयकडून कर्ज घेतले असेल तर आपल्याला ईसीएस बाऊन्ससाठी 500 रुपये अधिक जीएसटी द्यावा लागेल. चेक बाऊन्सच्या बाबतीत ही रक्कम 350 रुपयांवरुन 750 रुपयांपर्यंत जाते. देशातील सर्वात मोठी खासगी बँक एचडीएफसीमध्ये तुम्हाला ईसीएस बाऊन्ससाठी येथे 350 ते 750 रुपये द्यावे लागतात. तसेच, चेक बाऊन्स झाल्यावरही एकावेळी इतकेच शुल्क आकारले जाते.

खासगी बँका जास्त शुल्क आकारतात

भारतीय रिझर्व्ह बँकेच्या वेबसाईटवर तुम्हाला प्रत्येक बँकेच्या वेगवेगळ्या शुल्कांची यादी मिळेल. जर आपण ही यादी काळजीपूर्वक पाहिली तर तुम्हाला समजेल की देशातील खासगी बँका सार्वजनिक बँकांपेक्षा अधिक शुल्क आकारतात. जर एखादा ग्राहक याची तक्रार करत असेल, तर बँकेचे एकच उत्तर असते की, आम्ही यात काहीही करु शकत नाही. बँकेचे शुल्क आहे जे आपल्याला द्यावेच लागेल.

6000 च्या कर्जावर 700 रुपयांपेक्षा अधिक शुल्क आकारले जाते

दिल्लीत राहणाऱ्या ज्योतीने एचडीएफसी बँकेकडून गृह कर्ज घेतले आहे. ज्याचा हप्ता फक्त 6,233 रुपये इतका आहे. ज्योतीचे कर्ज एचडीएफसी बँकेचे आहे, तर तिच्या ईएमआयची रक्कम ही आयसीआयसीआय बँकेच्या खात्यातून कापली जाते. अशा परिस्थितीत त्यांना दुहेरी संकटाचा सामना करावा लागतो. ज्योतीने ‘टीव्ही 9’ला सांगितले की, जरी ईसीएस चुकून बाऊन्स झाला तर एचडीएफसी आणि आयसीआयसीआय दोन्ही बँका शुल्क आकारतात जे 700 रुपयांच्या वर असते. जीएसटीसह ही रक्कम 800 रुपयांपर्यंत जाते.

Banks Charged Big Amount On Missed EMI Big Banks Charged 750 Rupees

संबंधित बातम्या :

ज्येष्ठ नागरिकांना बँकाकडून मोठं गिफ्ट, व्याजचा फायदा वाढला, पाहा यादी

‘या’ बँकेने 4 नवी क्रेडिट कार्डे आणली बाजारात, आता किराणा ते बिल भरण्यापर्यंत मिळणार पॉइंट्स

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.