BBC Income Tax : आयकर विभागाच्या सर्वेत मिळाले तरी काय? काय आले बाहेर

BBC Income Tax : आयकर विभागाने व्हॅलेंटान डे रोजीच बीबीसीवर कारवाईचा बॉम्ब टाकला होता. त्यानंतर तीन दिवसांपासून पथक बीबीसीच्या कार्यालयात तळ ठोकून आहे. या सर्वेक्षणात पथकाच्या हाती नेमकं लागलं तरी काय?

BBC Income Tax : आयकर विभागाच्या सर्वेत मिळाले तरी काय? काय आले बाहेर
Follow us
| Updated on: Feb 18, 2023 | 4:38 PM

नवी दिल्ली : ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन म्हणजेच बीबीसीच्या (BBC) दिल्ली आणि मुंबईच्या कार्यालयांवर आयकर विभागाने (Income Tax Department) कारवाई केली. आयकर विभागाने व्हॅलेंटान डे रोजीच बीबीसीवर कारवाईचा बॉम्ब टाकला होता. त्यानंतर तीन दिवसांपासून पथक बीबीसीच्या कार्यालयात तळ ठोकून आहे. पथकाने कार्यालयातील कागदपत्रे आणि संगणकातील डेटाची तपासणी केली. तर केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळानेही (CBDC) या सर्वेक्षणावर पहिल्यांदा खुलासा केला. या अहवालात थेट बीबीसीचे नाव घेण्यात आले नाही. शुक्रवारी सीबीडीटीने याविषयीची अधिकृत माहिती दिली. त्यानुसार, या मीडिया समूहाच्या भारतातील विविध कार्यालयाचे उत्पन्नाचे आणि कमाईचे आकडे जुळत नसल्याचा दावा करण्यात आला आहे. या अहवालात थेट बीबीसीचे नाव घेण्यात आले नाही.

प्राप्तिकर विभागाची प्रशासकीय संस्था केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने त्यांच्या प्रसिद्धीपत्रकात मीडिया हाऊसचे थेट नाव घेतले नाबी. यामध्ये एक आंतरराष्ट्रीय मीडिया कंपनी असा उल्लेख करण्यात आला आहे. परदेशात पाठविलेल्या उत्पन्नावर कर जमा केला नसल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.

अर्थात अधिकाऱ्यांनी ही टिप्पणी, हा शेरा बीबीसीसंबंधित असल्याची अधिकृत माहिती दिलेली नाही. त्यामुळे हा शेरा कोणत्या मीडिया हाऊससंबंधी आहे, हे स्पष्ट झालेले नाही. जोपर्यंत कर विभाग सरळ सूचना देत नाही, तोपर्यंत याप्रकरणात कोणतेही वक्तव्य समोर येणार नसल्याचे समजते.

हे सुद्धा वाचा

बीबीसीच्चा दिल्ली आणि मुंबईत येथील कार्यालयात आयकर विभागाने 14 फेब्रुवारीपासून सर्वे ऑपरेशन सुरु केले आहे. ही कारवाई तब्बल 60 तास सुरु होती. गुरुवारी रात्री ही कारवाई संपली. लंडन येथील कार्यालयाकडे इशारा करत, सीबीडीटीने देशातील कार्यालयामार्फत विविध करासंबंधी अनियमिततेचा आरोप लावण्यात आला आहे.

या मीडिया हाऊसचे देशातील विविध भाषेत संचलन होते. त्यामाध्यमातून कमाई होते. पण या विविध संस्थांमधील उत्पन्नाचे आकडे आणि फायदा यांचे व्यवहार जुळत नसल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. कर भरण्यात या मीडिया हाऊसने विलंब केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.

या कारवाईत किंमत हस्तांतरणाचा विषय समोर आला. किंमत हस्तांतरण (Transfer Pricing) ही एक लेखा परिक्षणाची (Accounting) प्रक्रिया आहे. मुख्य कंपनीतील एका विभागाकडून दुसऱ्या विभागाच्या मुल्याचे प्रतिनिधित्व यातून अधोरेखित होते.

एका कंपनीतील एक विभाग दुसऱ्या विभागाकडून वस्तू अथवा सेवा यासंदर्भातील व्यवहार करणार असेल तर हा प्रक्रिया होते. या दोन विभागात कोणतीही रोखीतील खरेदी-विक्री होत नाही. लेखा विभाग त्याची केवळ नोंद करतो. त्याला प्राप्तिकर खात्याच्या भाषेत ट्रान्सफर प्राइसिंग असे म्हणतात.

पीटीआयनुसार, सर्वेक्षण टीम बीबीसीमधील आर्थिक व्यवहार, कंपनीची रचना आणि इतर सविस्तर माहितीचा शोध घेण्यात आला. ही टीम इलेक्ट्रॉनिक गॅझेट्सवरून डेटा कॉपी करुन पुरावे गोळा करण्याचे काम करण्यात आले.

33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ.
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?.
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ.
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?.
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी.
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर.
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर.