बंपर ऑफर! मारुतीची CNG कार अवघ्या 34 हजारात खरेदीची संधी

तुम्हाला एखादी कार खरेदी करायची असेल परंतु कमी बजेटमुळे तुम्हाला कार खरेदी करता येत नसेल तर काळजी करण्याची गरज नाही.

बंपर ऑफर! मारुतीची CNG कार अवघ्या 34 हजारात खरेदीची संधी
Maruti Suzuki 800 (PS- OLX)
Follow us
| Updated on: May 23, 2021 | 6:52 PM

मुंबई : तुम्हाला एखादी कार खरेदी करायची असेल परंतु कमी बजेटमुळे तुम्हाला कार खरेदी करता येत नसेल, अथवा त्यात अडचणी येत असतील, तर काळजी करण्याची गरज नाही. कारण आज आम्ही तुम्हाला एका शानदार ऑफरबद्दल माहिती देणार आहोत, ज्याद्वारे तुम्ही अगदी कमी किंमतीत कार खरेदी करु शकाल. (bumper offer buy Maruti Suzuki 800 in just rs 34000, know more about it)

कोरोना काळात आपल्याकडे स्वतःची वैयक्तिक कार असणे गरजेजे झाले आहे. जर आपण सेकंड हँड कार (Second Hand Car) विकत घेण्याचा विचार करत असाल परंतु बजेटमुळे चिंतेत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. कारण आज आम्ही तुम्हाला एका शानदार डीलबाबत माहिती देणार आहोत.

परवडणारी किंमत, मायलेज आणि फीचर्समुळे मारुती सुझुकी 800 (Maruti Suzuki 800) ही कंपनीच्या सर्वाधिक विक्री करणाऱ्या कारच्या यादीत समाविष्ट आहे. या कारची किंमत 2.05 लाखांपासून सुरू होते आणि 2.37 लाखांमध्ये ही कार खरेदी करता येते. परंतु आपण ही कार सेकंड हँड कार मार्केटमधून (Second Hand Car Market) खूपच कमी किंमतीत खरेदी करू शकता. ही कार ओएलएक्स (OLX) या वेबसाइटवर सूचीबद्ध आहे. एकंदरीत, ही एक शानदार डील आहे.

अवघ्या 34 हजारात खरेदी करा Maruti 800

ही सेकेंड ऑनरशिप कार असून राजस्थानच्या क्रमांकावर नोंदवलेली आहे. कारचे मेकिंग ईयर 2003 आहे आणि ती फक्त 34,000 रुपयांमध्ये सूचीबद्ध करण्यात आलेली आहे. अधिक माहिती मिळविण्यासाठी आपण विक्रेत्याशी संपर्क साधू शकता. वेबसाईटवर ही कार जोधपूरमध्ये उपलब्ध असल्याचं सांगण्यात आलं आहे.

कशी आहे कार?

वेबसाइटवर दिलेल्या तपशीलांनुसार ही कार केवळ 6,000 किमी चालली आहे. हे कारचं AC मॉडेल (मॅन्युअल ट्रांसमिशनसह) आहे. तसेच यामध्ये सीएनजी इंधन पर्याय आहे. म्हणजेच ही कार तुमचा पेट्रोल आणि डिझेलवरील खर्च कमी करेल. कारच्या फीचर्सनुसार, यात 796 cc इंजिन आहे आणि मायलेज 14.0 ते 16.1 दरम्यान आहे. या कारचं इंजिन 37 बीएचपी पॉवर जनरेट करतं.

सध्या विक्रेत्याने या कारची किंमत केवळ 34 हजार रुपये ठेवली आहे, परंतु आपण विक्रेत्याशी बोलू शकता आणि ही कार अजून कमी किंमतीत खरेदी करु शकता.

महत्त्वाची सूचना : जर आपण ही सेकंड हँड कार घेणार असाल तर सर्व बाजूंनी कार तपासून पाहा. कारचं डेंटिंग आणि पेंटिंग तपासा. कार मालकाचे कागदपत्र तपासा. त्याच वेळी, कार आणि कागदपत्रांची कसून चौकशी केल्यानंतरच ही कार खरेदी करा. तसेच बातमीत दिलेली माहिती ही ओएलएक्सवरुन घेतली आहे.

इतर बातम्या

शानदार ऑफर! अवघ्या 1.5 लाखात Maruti Suzuki WagonR खरेदीची संधी

महिंद्राचा दिलदारपणा, कोरोनाने मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांना पाच वर्षांचा पगार, मुलांच्या शिक्षणाचा खर्च उचलला

टाटाच्या ‘या’ इलेक्ट्रिक कारला देशात सर्वाधिक पसंती, विक्रीच्या बाबतीत अव्वल, सिंगल चार्जमध्ये 312KM रेंज

(bumper offer buy Maruti Suzuki 800 in just rs 34000, know more about it)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.