75 हजारांचा डिस्काऊंट आणि कॅशबॅक ऑफरसह Motorola चा ढासू स्मार्टफोन खरेदीची संधी

तुम्ही जर स्वत: साठी एक चांगला फोन विकत घेण्याचा विचार करीत असाल आणि तुमचं बजेट ठीक-ठाक असेल तर तुमच्यासाठी एक उत्तम संधी आहे

75 हजारांचा डिस्काऊंट आणि कॅशबॅक ऑफरसह Motorola चा ढासू स्मार्टफोन खरेदीची संधी
Motorola Razr
Follow us
| Updated on: May 17, 2021 | 6:03 PM

मुंबई : तुम्ही जर स्वत: साठी एक चांगला फोन विकत घेण्याचा विचार करीत असाल आणि तुमचं बजेट ठीक-ठाक असेल तर तुमच्यासाठी एक उत्तम संधी आहे, ज्यामध्ये तुम्ही 75,000 रुपयांच्या सवलतीत फोन खरेदी करता येईल. हा फोन तुम्हाला ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टवर (Flipkart) खरेदी करता येईल. या फोनचे नाव MOTOROLA Razr असे आहे, ज्यामध्ये 6 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज पर्याय आहे. (Buy Motorola Razr smartphone with 75000 Rs Discount, know more about offer on Flipkart)

MOTOROLA Razr वर तुम्हाला आणखी बरेच डिस्काऊंट आणि कॅशबॅकचा लाभ घेता येईल. तुम्ही हा फोन फ्लिपकार्ट अ‍ॅक्सिस बँक क्रेडिट कार्डद्वारे विकत घेतला तर त्यावर तुम्हाला 5 टक्के अनलिमिटेड कॅशबॅक मिळेल. याशिवाय बँक ऑफ बडोदा मास्टरकार्ड डेबिट कार्ड वरुन पेमेंट केलंत तर 10 टक्के कॅशबॅक मिळेल.

शानदार एक्सचेंज ऑफर

या कॅशबॅक ऑफरशिवाय तुम्ही फ्लिपकार्ट अ‍ॅक्सिस बँक क्रेडिट कार्डद्वारे (Flipkart Axis Bank Credit Card) नो कॉस्ट ईएमआय ऑफरवर हा फोन खरेदी करू शकता. या व्यतिरिक्त तुम्हाला एक्सचेंज ऑफरचा लाभही मिळेल ज्यामध्ये तुम्हाला 14,600 रुपयांपर्यंत सवलत मिळेल. फोन खरेदी केल्यावर तुम्हाला मोबाइल फोनवर 1 वर्षाची ब्रँड वॉरंटी आणि अ‍ॅक्सेसरीजवर 6 महिन्यांची वॉरंटी मिळेल.

MOTOROLA Razr चे फीचर्स

मोटोरोलाने (Motorola) गेल्या वर्षी त्यांचा फोल्डेबल स्मार्टफोन मोटो रेझर (Moto Razr) लॉन्च केला होता. सुरवातीला, कंपनीने या फोनची किंमत खूपच जास्त ठेवली होती, त्यामुळे बरेच लोक हा फोन आवडलेला असूनही केवळ किंमतीमुळे खरेदी करु शकले नाहीत. कंपनीने हा स्मार्टफोन 1,49,999 रुपये इतक्या किंमतीत लाँच केला होता. परंतु आता हा स्मार्टफोन तुम्ही Flipkart च्या Flagship Fest Sale अंतर्गत 75 हजार रुपयांच्या डिस्काऊंटसह खरेदी करता येईल.

मोटोरोलाच्या या फोल्डेबल स्मार्टफोनमध्ये तुम्हाला 21: 9 च्या अ‍ॅस्पेक्ट रेशोसह 6.2 इंचाचा फ्लेक्सिबल ओएलईडी डिस्प्ले मिळेल. याशिवाय यात क्विक व्ह्यू एक्सटर्नल डिस्प्लेही देण्यात आला आहे. या दोन्ही डिस्प्लेमध्ये प्रोटेक्शनसाठी कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 3 देण्यात आला आहे. मोटो रेझरमध्ये स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 710 ऑक्टा-कोर प्रोसेसर आहे आणि ग्राफिक्ससाठी अॅड्रेनो 616 जीपीयू आहे देण्यात आला आहे. याच्या स्टोरेजबद्दल सांगायचे झाले तर यात 6 जीबी रॅम आणि 128 जीबी इंटर्नल स्टोरेज स्पेस देण्यात आली आहे. या फोनचं वजन 127 ग्रॅम इतकं आहे.

Bajaj Allianz ची ऑफर

या फोनच्या खरेदीवर तुम्हाला Bajaj Allianz द्वारा दिले जाणारे सुरक्षेसंबंधित सर्व लाभ घेता घेतला, तसेच डिजिटल सिक्युरिटीचा लाभ मिळेल, ज्यात 50 हजार रुपयांपर्यंतचे कव्हर उपलब्ध आहे. यासाठी तुम्हाला फक्त 183 रुपये द्यावे लागतील.

इतर बातम्या

नव्या फीचर्ससह Xiaomi ‘हा’ लोकप्रिय स्मार्टफोन रिलाँच करणार

सावधान! चुकूनही ‘हे’ CoWIN अ‍ॅप डाऊनलोड करु नका! अन्यथा डेटा हॅक होईल

(Buy Motorola Razr smartphone with 75000 Rs Discount, know more about offer on Flipkart)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.