AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

PNB ग्राहकांनो सावधान! बँकेकडून अलर्ट जारी, अन्यथा मोठा तोटा

देशभरातील बँका आपल्या ग्राहकांना कोणत्याही प्रकारच्या बँकिंग फसवणुकीबद्दल सतर्क करीत आहेत. एसबीआयनंतर आता पंजाब नॅशनल बँकेने आपल्या कोट्यवधी ग्राहकांना बँकिंग घोटाळ्याबाबत अलर्ट जारी केलाय.

PNB ग्राहकांनो सावधान! बँकेकडून अलर्ट जारी, अन्यथा मोठा तोटा
punjab national bank
Follow us
| Updated on: Jul 30, 2021 | 7:57 AM

नवी दिल्ली : पंजाब नॅशनल बँके (PNB-Punjab National Bank) ने आपल्या ग्राहकांना फसवणुकीपासून सावध राहायला सांगून बँकिंग घोटाळ्यांबाबत अलर्ट जारी केलाय. देशभरातील बँका आपल्या ग्राहकांना कोणत्याही प्रकारच्या बँकिंग फसवणुकीबद्दल सतर्क करीत आहेत. एसबीआयनंतर आता पंजाब नॅशनल बँकेने आपल्या कोट्यवधी ग्राहकांना बँकिंग घोटाळ्याबाबत अलर्ट जारी केलाय.

ट्विटर हँडलवर अनेक प्रकारच्या फसवणुकींचा उल्लेख

पंजाब नॅशनल बँकेने आपल्या ट्विटर हँडलवर अनेक प्रकारच्या फसवणुकींचा उल्लेख केलाय. यासह सावधगिरी बाळगण्याचे एक ट्विटही केलेय. बँकेने आपल्या ग्राहकांना सोशल मीडियावर बनावट प्रोफाईलपासून सावध राहण्यास सांगितले. हँडलची पडताळणी केल्याशिवाय कोणतेही बाहेरचे सॉफ्टवेअर डाऊनलोड करू नका किंवा आपली वैयक्तिक माहिती कोणाबरोबरही शेअर करू नका.

बँकेने बनावट कॉलपासून ग्राहकांना केले सतर्क

यापूर्वीही बँकेने बनावट कॉलपासून ग्राहकांना सतर्क केले होते. खरे तर काही लोक बँक कर्मचारी असल्याचे भासवून बनावट कॉल करून ग्राहकांची फसवणूक करीत आहेत. फोनवरून बँक खात्याविषयी भीती दाखवून त्यांच्या खात्यातून पैसे गायब झाल्याची माहिती मिळते. अशा परिस्थितीत पीएनबीने बँकेच्या ग्राहकांना कोणत्याही जाळ्यात अडकू नये, असा इशारा दिला आहे.

बँक फसवणूक कशी टाळायची?

1 ओटीपी, पिन, सीव्हीव्ही, यूपीआय पिन कोणासोबतही शेअर करू नका 2 बँक खात्यातून दुसऱ्या कोणी पैसे काढल्यानंतर लगेच बँकेला सूचना द्या 3 फोनवर बँकिंग माहिती कधीही सेव्ह करू नका 4 एटीएम कार्ड किंवा डेबिट कार्डची माहिती शेअर करू नका 5 बँक कधीही कोणतीही माहिती विचारत नाही 6 ऑनलाईन रकमेबाबत सावधगिरी बाळगा 7 चाचणीशिवाय कोणतेही सॉफ्टवेअर मोबाईलमध्ये इन्स्टॉल करू नका 8 अज्ञात लिंक तपासून घ्या 9 स्पाअवेअरपासून सावध राहा

संबंधित बातम्या

दिग्गज आयटी कंपनी 1 लाख लोकांना नोकर्‍या देणार, उत्पन्नात थेट 41.8 टक्के वाढ

आता मोदी सरकार तुमच्या घराचाही विमा उतरवणार, नुकसानीची भरपाई देणार

Beware of PNB customers! Alert issued by the bank, otherwise huge loss

'पहलगाम'वरून मविआतील मतभेद उघड, पवार अन् राऊतांचं वेगळं मत
'पहलगाम'वरून मविआतील मतभेद उघड, पवार अन् राऊतांचं वेगळं मत.
‘सिंधू’ करार स्थगितीचा प्लॅन ठरला... पाकिस्तानवर 'वॉटर स्ट्राईक'
‘सिंधू’ करार स्थगितीचा प्लॅन ठरला... पाकिस्तानवर 'वॉटर स्ट्राईक'.
'ही आमची चूक...', पाकच्या रक्षा मंत्री ख्वाजा आसिफ यांची मोठी कबुली
'ही आमची चूक...', पाकच्या रक्षा मंत्री ख्वाजा आसिफ यांची मोठी कबुली.
पहलगाम हल्ल्यानंतर काहीतरी मोठं घडणार? शाहांकडून बैठकांचा सपाटा अन्...
पहलगाम हल्ल्यानंतर काहीतरी मोठं घडणार? शाहांकडून बैठकांचा सपाटा अन्....
'काश्मीर जन्नत', हल्ल्यानंतर पहलगाम पर्यटकांनी फुललं, सध्या माहौल कसा?
'काश्मीर जन्नत', हल्ल्यानंतर पहलगाम पर्यटकांनी फुललं, सध्या माहौल कसा?.
'शरद पवारांनी मृत्यू झालेल्यांच्या नातेवाईकांकडून घटना ऐकावी, मग...'
'शरद पवारांनी मृत्यू झालेल्यांच्या नातेवाईकांकडून घटना ऐकावी, मग...'.
पहलगामच्या हल्ल्यात आदिलचा मृत्यू, शिंदेंनी घेतला झटक्यात मोठा निर्णय!
पहलगामच्या हल्ल्यात आदिलचा मृत्यू, शिंदेंनी घेतला झटक्यात मोठा निर्णय!.
सिंधु पाणी करारावर आज महत्वाची बैठक
सिंधु पाणी करारावर आज महत्वाची बैठक.
काश्मीरमध्ये अडकलेले महाराष्ट्रातील पर्यटक म्हणताय, 'I Love Kashmir'
काश्मीरमध्ये अडकलेले महाराष्ट्रातील पर्यटक म्हणताय, 'I Love Kashmir'.
पाकिस्तानचे धाबे दणाणले; आंतरराष्ट्रीय सीमेवर देखील सुरक्षा वाढवली
पाकिस्तानचे धाबे दणाणले; आंतरराष्ट्रीय सीमेवर देखील सुरक्षा वाढवली.