Business | चालू आर्थिक वर्षात भारत बाँड ईटीएफचा तिसरा टप्पा येणार; जाणून घ्या काय आहे सरकारची योजना?
केंद्र सरकार भारत बाँड ईटीएफचा तिसरा टप्पा (Bharat Bond ETF) चालू वित्तीय वर्षात सुरू करण्याच्या तयारीत आहे. (Bharat Bond ETF installment)
नवी दिल्ली : केंद्र सरकार भारत बाँड ईटीएफचा तिसरा टप्पा (Bharat Bond ETF) चालू वित्तीय वर्षात सुरू करण्याच्या तयारीत आहे. या एक्सचेंज ट्रेडेड फंडाच्या माध्यमातून सार्वजनिक क्षेत्रातील कंपनीच्या बाँडमध्ये गुंतवणूक करता येते. मिळालेल्या माहितीनुसार, केंद्र सरकारचे सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांसाठी (CPSEs) 12000 कोटी रुपये उभे करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. भारत बाँड ईटीएफ हा त्याचाच एक भाग असून, त्याचा पुढील टप्पा आगामी काही महिन्यांत येणार आहे.
भारत बाँड ईटीएफ म्हणजे काय?
भारत बाँड ईटीएफ एक साधी निश्चित उत्पन्न योजना आहे. येथे गुंतवणूकदार आपल्या पैशांची गुंतवणूक पूर्ण आत्मविश्वासाने करू शकतो. त्याच्या परताव्याच्या स्वरूपात फायदाही चांगला मिळतो. पण यातून मिळणारे उत्पन्न हे करमुक्त नसेल.
भारत बाँड ईटीएफचा जुलै 2020मध्ये दुसरा टप्पा
भारत बाँड ईटीएफचा दुसरा टप्पा या 2020 मधील जुलै महिन्यात सुरू करण्यात आला होता. यावेळी भारत बाँडला तीन पटींनी परतावा मिळाला होता. दुसऱ्या टप्प्यात एकूण 11 हजार कोटी रुपये उभे करण्यात आले होते. तसेच डिसेंबर 2019 मध्ये पहिल्या टप्प्यात एकूण 12400 कोटी रुपये उभे केले गेले.
भारत बाँड ईटीएफने आपल्या दुसऱ्या टप्प्यात 5 आणि 12 वर्षांचा मॅच्युरिटीचा पर्याय दिला होता. भारत बाँड ईटीएफने पहिल्या टप्यात 3 आणि 10 वर्षांच्या मॅच्युरीटीचा पर्याय दिला होता. भारत बाँड ईटीएफमध्ये गुंतवणूकदारांना कमीत कमी 1000 रुपये गुंतवावे लागतील.
कोरोना विषाणू फुफ्फुसांना कसा पोखरतो? वैज्ञानिकांना महत्त्वपूर्ण माहिती मिळालीhttps://t.co/7Kz124dXyv #coronavirus #CoronaVaccine #Corona
— TV9 Marathi (@TV9Marathi) December 13, 2020
संबंधित बातम्या :
पैसे ट्रान्सफर करणं आणखी सोपं, ‘ही’ सुविधा 24 तास सुरु राहणार
चीनींची आता सोन्याची जमाखोरी, सोनं घसरणार की वाढणार?
नोकरदारांसाठी मोठी बातमी, EPFO कोट्यावधी कर्मचाऱ्यांच्या ‘या’ खात्यात पाठवणार पैसे