Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Airtel-Axis Bank चे क्रेडिट कार्ड, फायद्याचे भंडार

Airtel-Axis Bank ने मिळून क्रेडिट कार्ड बाजारात दाखल केले आहे. यामध्ये प्री-अप्रुड कर्ज, बाई नाऊ पे लेटर, कॅशबॅक, विशेष सवलत, डिजिटल व्हाऊचर यासह अनेक ऑफर्सचा भडिमार आहे.

Airtel-Axis Bank चे क्रेडिट कार्ड, फायद्याचे भंडार
क्रेडिट कार्ड
Follow us
| Updated on: Mar 08, 2022 | 10:10 AM

भारती एअरटेल(Bharti Airtel) आणि अॅक्सिक बँकेने (Axis Bank) वित्त सेवा देण्यासाठी हात मिळवणी केली आहे. दुरसंचार कंपनी एअरटेलने अॅक्सिस बँकेसोबत को-ब्रांडेट क्रेडिट कार्ड (Co-branded Credit Card) बाजारात दाखल केले आहे. या भागेदारीत एअरटेलने ग्राहकांना प्री-अप्रुड कर्ज,बाई नाऊ पे लेटर, कॅशबॅक, विशेष सवलत, डिजिटल व्हाऊचर यासह अनेक ऑफर्सचा (Offers) भडिमार केला आहे. या क्रेडिट कार्डमुळे अक्सिस बँकेला निमशहरी भागात त्यांचा विस्तार करण्यास मदत मिळणार आहे. एअरटेलच्या 34 कोटी ग्राहकांना अक्सिस बँकेच्या क्रेडिट आणि विभिन्न डिजिटल ऑफरचा फायदा घेता येणार आहे. भारती एअरटेलचे मुख्य कार्यकारी अधिकारी (भारत आणि दक्षिण आशिया) गोपाल विठ्ठल यांनी सांगितले की, ग्राहकांना आंतरराष्ट्रीय स्तरावरील डिजिटल सेवा देण्यासाठी आणि त्यांचा वित्तीय पोर्टपोलिओ तयार करण्यासाठी एअरटेल प्रयत्नरत आहे.

ग्राहकांना मिळतील हे फायदे

एअरटेल अक्सिस बँक क्रेडिट कार्ड चे अनेक फायदे आहेत. एअरटेल ग्राहकांना कॅशबॅक, विशेष सवलत, डिजिटल व्हाऊचर आणि इतर अनेक अनुषांगिक लाभ मिळतील. क्रेडिट कार्ड वापरकर्त्यांना एअरटेल मोबाईल/डीटीएच रिचार्ज वर 25 टक्के कॅशबॅक, एअरटेल ब्लॅक आणि एअरटेल एक्सट्रीम फाईबरचे बिल अदा करता येईल. एअरटेल धन्यवाद अॅपमार्फत वीज/गॅस/पाणीपट्टी भरता येईल. त्यावर 10 टक्के कॅशबॅक मिळेल. बिग बास्केट, स्विगी, झोमॅटो यावरील खरेदीवर 10 टक्के कॅशबॅक मिळेल. तर अन्य सर्व खर्चांवर 1 टक्के कॅशबॅक आणि कार्ड अॅक्टिवेशन वर 500 रुपयांचे अॅमेझॉन ई-वाऊचर 30 दिवसांच्या आत मिळेल.

एअरटेल थॅक्स अॅपवर एअरटेल ग्राहकांना क्रेडिट कार्ड विशेष स्वरुपात उपलब्ध होईल. याव्यतिरिक्त, अॅक्सिस बँक डिजिटल क्षमता वाढीसाठी एअरटेल डिजिटल सेवा, जसे की सी-पास प्लॅटफॉर्म-एअरटेल आयक्यू, मॅसेजिंग, व्हिडिओ, स्ट्रिमिंग, कॉल मास्किंग आणि व्हर्चुअल कॉन्टेक्ट सेंटर सोल्युशन्सचा वापर करेल आणि त्याआधारे विस्तार करेल. अक्सिक बँक एअरटेलच्या विभिन्न सायबर सिक्योरिटी सर्व्हिसेसचा वापर करेल. क्लाऊड आणि डेटा सेंटर सेवांचा ही वापर करण्यात येणार आहे.

आंतरराष्ट्रीय स्तरावर एअरटेलची गुंतवणूक

टेलिकॉम कंपनी ‘SEA-ME-WE-6’ समुद्रात केबलद्वारे हायस्पीड ग्लोबल नेटवर्कची क्षमता वाढवण्यासाठी प्रयत्न करत आहे. त्यासाठी मोठी गुंतवणूक करण्यात आली आहे. भारतात डिजिटल सेवांचा वापर वाढला आहे. या सेवांची क्षमता वाढवण्यासाठी एअरटेलने ‘SEA-ME-WE-6 सोबत सामंजस्य करार केला आहे. यासाठी एअरटेलने मोठी गुंतवणूक केली आहे. त्याआधारे कंपनी सक्षम डिजिटल सेवा देण्याचा प्रयत्न करणार आहे.

संबंधित बातम्या :  Share Market | 4 दिवसांत 6% पेक्षा जास्त पडझड! गुंतवणूकदारांचे तब्ब 11.28 लाख कोटी बुडाले

ॲक्सिस बँकेच्या ग्राहकांसाठी मोठी बातमी, बँकेने एफडीचे व्याजदर बदलले, पाहा नवे दर

"औरंगजेब इथं गाडलाय...", राज ठाकरेंच्या वक्तव्यानंतर मनसेकडून बॅनरबाजी
चंद्राबाबू नायडूंचा वक्फ बोर्डाला पाठिंबा, पण घातली ही मोठी अट
चंद्राबाबू नायडूंचा वक्फ बोर्डाला पाठिंबा, पण घातली ही मोठी अट.
राज्यात अवकाळी पावसाचा कहर, 'या' जिल्ह्यांना IMD कडून अलर्ट?
राज्यात अवकाळी पावसाचा कहर, 'या' जिल्ह्यांना IMD कडून अलर्ट?.
पंकजा मुंडे यांच्या फाईली धनुभाऊंनीच नेल्या अंजली दमानियांच्या दारी?
पंकजा मुंडे यांच्या फाईली धनुभाऊंनीच नेल्या अंजली दमानियांच्या दारी?.
'त्यांना सांगायचं दादांना...', अजित पवार एसपी कॉवत यांच्यावर संतापले
'त्यांना सांगायचं दादांना...', अजित पवार एसपी कॉवत यांच्यावर संतापले.
कळंबच्या त्या महिलेच्या हत्येनंतर 'तो' दोन दिवस मृतदेहासोबत झोपला अन्
कळंबच्या त्या महिलेच्या हत्येनंतर 'तो' दोन दिवस मृतदेहासोबत झोपला अन्.
आधे इधर, आधे उधर... बीडमध्ये वाल्मिक कराडवर मेहरनजर?
आधे इधर, आधे उधर... बीडमध्ये वाल्मिक कराडवर मेहरनजर?.
टोळक्यासोबत डान्स, अन् गर्दीवर पैशांची उधळण; कुख्यात टिपूचा व्हिडिओ
टोळक्यासोबत डान्स, अन् गर्दीवर पैशांची उधळण; कुख्यात टिपूचा व्हिडिओ.
राज्यात अवकाळी पावसाची हजेरी, शेती पिकांचं नुकसान
राज्यात अवकाळी पावसाची हजेरी, शेती पिकांचं नुकसान.
कांदा निर्यात शुल्क रद्द, पण अंमलबजावणी कधी?
कांदा निर्यात शुल्क रद्द, पण अंमलबजावणी कधी?.