बड्या ब्रोकरेज हाऊसचा HDFC बँकेचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला, कारण काय?

या बँकेचे बाजारमूल्य सध्या 832168.27 कोटी रुपये आहे. HDFC बँकेची प्रमुख उत्पादने/महसूल विभागातील अग्रिम आणि बिलांवर व्याज आणि सवलत, गुंतवणुकीतून मिळणारे उत्पन्न, RBI आणि इतर आंतर-बँक फंडांमधील शिल्लकवरील व्याज आणि 31 मार्च 2020 रोजी संपलेल्या आणि आगामी वर्षाच्या व्याजाचा समावेश आहे.

बड्या ब्रोकरेज हाऊसचा HDFC बँकेचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला, कारण काय?
HDFC Bank
Follow us
| Updated on: Dec 01, 2021 | 8:12 PM

नवी दिल्ली : ICICI Direct ने HDFC Bank Ltd च्या शेअरला ग्रीन सिग्नल दिलाय. आयसीआयसीआय डायरेक्टच्या अंदाजानुसार हा शेअर पुढील 3 महिन्यांच्या गुंतवणुकीत 1650 रुपयांचे लक्ष्य गाठू शकतो. सध्या एचडीएफसी बँकेचा शेअर 1500 रुपयांच्या आसपास व्यवहार करत आहे. त्यांनी त्यांच्या शिफारसीमध्ये या शेअरसाठी 1425 रुपयांचा स्टॉपलॉसदेखील दिला.

बँकेचे बाजारमूल्य सध्या 832168.27 कोटी रुपये

HDFC बँक लिमिटेडची स्थापना 1994 मध्ये झाली. या बँकेचे बाजारमूल्य सध्या 832168.27 कोटी रुपये आहे. HDFC बँकेची प्रमुख उत्पादने/महसूल विभागातील अग्रिम आणि बिलांवर व्याज आणि सवलत, गुंतवणुकीतून मिळणारे उत्पन्न, RBI आणि इतर आंतर-बँक फंडांमधील शिल्लकवरील व्याज आणि 31 मार्च 2020 रोजी संपलेल्या आणि आगामी वर्षाच्या व्याजाचा समावेश आहे.

ICICI Direct ने खरेदी सल्ला का दिला?

बँकिंग क्षेत्राचा हा शेअर गेल्या काही आठवड्यांपासून अत्यंत संथ गतीने सुरू आहे. जिथे निफ्टी सर्वोच्च पातळीवरून 9% घसरला, तिथे HDFC बँक 15 टक्क्यांपर्यंत घसरली. निफ्टीचा हा हेवीवेट स्टॉक सध्या कमी कामगिरी करत आहे. आयसीआयसीआय डायरेक्टचा विश्वास आहे की, हा शेअर लवकरच रिकव्हरी मोडमध्ये प्रवेश करू शकतो. बँकिंग क्षेत्रातील बहुतेक हेवीवेट शेअरमध्ये नोव्हेंबरच्या फ्युचर्स सीरिजमध्ये भरपूर ओपन इंटरेस्ट (OI) दिसले. HDFC बँकेचे नेहमीच चांगले ओपन इंटरेस्ट (OI) असले तरी यावेळी सर्वाधिक ओपन इंटरेस्ट 2 मध्ये दिसत आहे.

शेअरमधील अलीकडील शॉर्ट पोझिशन्स अजूनही शाबूत

आयसीआयसीआय डायरेक्टचा विश्वास आहे की, शेअरमधील अलीकडील शॉर्ट पोझिशन्स अजूनही शाबूत आहेत. शॉर्ट कव्हरिंगमुळे शेअर वाढू शकतो, असंही ब्रोकरेज हाऊसला वाटते. 30 सप्टेंबर 2021 पर्यंत प्रवर्तकांकडे कंपनीत 25.83 टक्के हिस्सा होता, तर FII कडे 42.96 टक्के, DII कडे 17.81 टक्के हिस्सा होता.

संबंधित बातम्या

Share Market Update: सेन्सेक्समध्ये 620 अंकांची उसळी, निफ्टी 17100 च्या वर बंद

ICICI बँकेने FD वरील व्याजदर बदलले, पटापट तपासा नवे दर

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.