Rakesh Jhunjhunwla : काय सांगता, एका दिवसात 1000 कोटी कमावले, बिग बुलच्या या दोन शेअरने केली कमाल

Rakesh Jhunjhunwla : शेअर बाजारात बिग बुल म्हणून ओळखले जाणारे राकेश झुनझुनवाला यांनी एकाच दिवशी 1061 कोटी कमावण्याचा इतिहास रचला आहे.

Rakesh Jhunjhunwla : काय सांगता, एका दिवसात 1000 कोटी कमावले, बिग बुलच्या या दोन शेअरने केली कमाल
एकाच दिवशी रचला इतिहासImage Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Jul 08, 2022 | 2:13 PM

शेअर बाजारातून कमाई करुन अरबो-खरबोची संपत्ती जमा करणा-या धुरंधरांमध्ये राकेश झुनझुनवाला (Rakesh Jhunjhunwla) यांचे नाव पहिल्या रांगेत येते. त्यांच्या शेअर बाजारातील (Share Market) टिप्समुळे अनेक जण लखोपती झाले आहेत. त्यामुळेच त्यांना भारतीय शेअर बाजारात बिग बुल (Big Bull) म्हणतात. त्यांना दिलेली ही उपाधी त्यांनी पुन्हा एकदा योग्य असल्याचे दाखवून दिले. त्यांनी राखून ठेवलेल्या सर्वच शेअरमध्ये उलाढाल पहायला मिळाली. गुरुवारी त्यांच्या दोन शेअर्सने (Two Stocks) तर कमाल केली. या शेअर्समध्ये त्यांनी रक्कम लावलेली आहे, त्या शेअर्सनी झुनझुनवाला यांना थोड्याथोडक्या नव्हे तर तब्बल एकाच दिवशी (in a single day) 1061 कोटी कमावून दिले. यामुळे झुनझुनवाला यांच्या संपत्तीत एकाच दिवशी 1061 कोटी रुपयांची भर पडली. झुनझुनवाला यांना उगीच भारताचा वारेन बफेट म्हणत नाही, हे त्यांनी या एक दिवसीय खेळीतून पुन्हा सिद्ध केले.

या दोन स्टॉक्सने केले मालामाल

राकेश झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलियोत सर्वात जास्त मूल्य असलेले दोन स्टॉक आहेत. टायटन (Titan) आणि स्टार हेल्थ अँड एलाईड इन्शुरन्स (Star Health and Allied Insurance) या दोन स्टॉक्समध्ये त्यांनी ज्यादा रक्कम गुंतवलेली आहे. कालच्या शेअर बाजारातील व्यापारी सत्रात या दोन्ही शेअरने कमाल केली. त्यांच्यामध्ये कमालीची तेजी पहायला मिळाली. टाटा समुहाची (Tata Group) कंपनी टायटनच्या शेअरमध्ये जवळपास 80 टक्क्यांची तेजी पहायला मिळाली. तर स्टार हेल्थच्या शेअरमध्ये 16 टक्क्यांची तेजी दिसून आली. या शेअर्सने एकाच दिवशी झुनझुनवाला यांच्या संपत्तीत एक हजार कोटींची भर घातली.

हे सुद्धा वाचा

टाईटनमध्ये किती शेअर्स?

बीएसई निर्देशांकावर (BSE Sensex) गुरुवारी टायटनचा शेअर 114.60 रुपयांनी वाढून 2,128 रुपयांवर बंद झाला. व्यापारी सत्रात हा शेअर एकावेळी तर 2,170.95 रुपयांवर पोहचला होता. त्यामुळे त्याची इंट्रा डे ची एका दिवसातील उलाढाल 7.8 टक्क्यांवर पोहचली. गेल्या एका वर्षात टायटनचा शेअर हा 23टक्क्यांनी मजबूत झाला आहे. या कंपनीच्या शेअर होल्डिंग पॅटर्नमध्ये राकेश झुनझुनवाला आणि त्यांच्या पत्नीची 5.05 टक्क्यांची हिस्सेदारी आहे. याचा सरळ अर्थ असा की, झुनझुनवाला कुटुंबियांकडे टायटन समुहाचे 4,48,50,970 शेअर आहेत.

स्टार हेल्थमध्ये किती कमाई?

गुरुवारी स्टार हेल्थचा शेअर बीएसईवर 54.25 रुपयांनी वाढला आणि 530.20 रुपयांवर बंद झाला. सध्या याचा मार्केट कॅप जवळपास 30,544.83 कोटी रुपये आहे. या कंपनीचे राकेश झुनझुनवाला यांच्याकडे 8,28,82,958 शेअर आहेत तर त्यांच्या पत्नीकडे 1,78,70,977 इतके शेअर आहेत.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.