AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

akasa air starts ticket booking | बिग बुलच्या अकासाला स्वस्ताईचे पंख! अवघ्या 3282 रुपयांत मुंबई ते अहमदाबाद प्रवास, 7 ऑगस्टपासून विमानसेवेला सुरुवात

akasa air starts ticket booking | शेअर बाजारातील बिग बूल राकेश झुनझुनवाला यांची विमान कंपनी अकासा एअर येत्या 7 ऑगस्ट पासून उड्डाण करण्यास सज्ज होत आहे. 22 जुलैपासून या विमान सेवेसाठी तिकीट बुकिंग करता येणार आहे. सध्या ही विमान कंपनी मुंबई-अहमदाबाद आणि बेंगळुरु ते कोचीन या मार्गावर सेवा देणार आहे.

akasa air starts ticket booking | बिग बुलच्या अकासाला स्वस्ताईचे पंख! अवघ्या 3282 रुपयांत मुंबई ते अहमदाबाद प्रवास, 7 ऑगस्टपासून विमानसेवेला सुरुवात
आता स्वस्तात करा उड्डाणImage Credit source: सोशल मीडिया
| Updated on: Jul 22, 2022 | 6:42 PM
Share

akasa air Flight News | तुम्हाला अगदी स्वस्तात विमान प्रवासाठी संधी उपलब्ध झाली आहे. शेअर बाजारातील बिग बूल राकेश झुनझुनवाला (Rakesh Jhunjhunwla) यांची विमान कंपनी अकासा एअर (akasa air) येत्या 7 ऑगस्ट पासून उड्डाण करण्यास सज्ज होत आहे. 22 जुलैपासून या विमान सेवेसाठी तिकीट बुकिंग (ticket booking) करता येणार आहे. सध्या ही विमान कंपनी मुंबई-अहमदाबाद आणि बेंगळुरु ते कोचीन या मार्गावर सेवा देणार आहे. त्यासाठी ग्राहकांच्या खिश्यावर जादा बोजा पडणार नाही. या फ्लाईटसाठी (Flights) ग्राहकांना केवळ 3282 रुपये भरुन उड्डाण करता येणार आहे. त्यामुळे विमान सेवा क्षेत्रात जबरदस्त स्पर्धा रंगणार आहे. अकासाची थेट टक्कर स्पाईसजेट (SpiceJet), इंडिगो (Indigo), गो फर्स्ट (First Go) या सारख्या कंपन्यांशी होणार आहे. अकासा सर्वच प्रवास मार्गावर बोईंग 737 मॅक्स विमानाचा वापर करणार आहे. या एअरलाईनचे संस्थापक आणि सीईओ ( CEO) विनय दुबे यांनी तिकीट विक्री सुरु झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला.

अशी करा बुकिंग

फ्लाईट बुकिंग करण्यासाठी ग्राहक मोबाईल अॅप, मोबाईल वेब अथवा डेस्कटॉप वेबसाईट www.akasaair.com, तसेच ट्रॅव्हल एजंटच्या माध्यमातून त्यांना तिकीट बुकिंग करता येईल. या विमान कंपनीची ऑन बोर्ड मील सेवा ही सुरु आहे. जी कॅफे अकासा नावाने आहे. या ठिकाणी ग्राहकाला पास्ता, व्हिएतनामी राईस रोल, हॉट चॉकलेट आणि भारतीय कुजीन सारखं रुचकर, स्वादिष्ट अन्न मिळेल.

या मार्गावर उड्डाण

अकासा एअरलाईन मुंबई ते अहमदाबाद, अहमदाबाद ते मुंबई, बंगळुरु ते कोचीन या मार्गावर विमान सेवा सुरु करत आहे. मुंबईहून सकाळी उड्डाण करणाऱ्या या फ्लाईटचे तिकट 4,314 रुपये आहे. तर अहमदाबादहून या विमानाचं तिकीट 3,906 रुपये असेल. तर दुपारी मुंबईहून अहमदाबादसाठी उड्डाण घेणाऱ्या विमानाचं तिकिट 3,948 रुपये तर अहमदाबादहून मुंबईसाठीचे तिकिट 5,008 रुपये असेल.

2023 पासून आंतरराष्ट्रीय उड्डाण

2023 च्या उन्हाळ्यापासून अकासाची आंतरराष्ट्रीय विमान सेवा सुरु करण्यात येणार आहे. तोपर्यंत या विमान कंपनीच्या ताफ्यात 20 विमाने असतील. आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय नियमांनुसार ही विमान सेवा असेल. अकासा मध्यपूर्व, दक्षिण पूर्व आशिया, नेपाल, बांगलादेश आणि श्रीलंकेसाठी आंतरराष्ट्रीय उड्डाण करेल.

एअरलाईनचा कोड ‘QP’ आणि लोगो ‘राइजिंग A’

अकासा एअरलाईनचा कोड ‘QP’ आहे. जगातील प्रत्येक एअरलाईचा एक डिझाईन कोड असतो. इंडिगोचा कोड 6E, गो फर्स्ट चा G8 आणि एअर इंडियाचा AI हा कोड आहे. अकासा एअरलाईनाचा लोको राइजिंग A असा आहे.

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.