Micron Semiconductor : रोजगारच रोजगार! अमेरिकेन मायक्रॉन कंपनी ठरणार वरदान, या राज्यात सेमीकंडक्टर प्लँट उभारणार
Micron Semiconductor : अमेरिकन चिप कंपनी मायक्रॉन भारतासाठी वरदान ठरणार आहे. कोरोनानंतर जगभरात सेमीकंडक्टरचा मोठा तुटवडा जाणवत आहे. सेमीकंडक्टर हब होण्यासाठी भारताने कंबर कसली आहे. येत्या काळात सेमीकंडक्टर, ऑटो, टेक्नॉलॉजी, आयटी आणि फार्मा या सेक्टरमध्ये मोठी उलाढाल आणि रोजगार संधी मिळण्याची दाट शक्यता आहे.
नवी दिल्ली : अमेरिकन चिप कंपनी मायक्रॉन (Micron) भारतासाठी वरदान ठरणार आहे. कोरोनानंतर जगभरात सेमीकंडक्टरचा मोठा तुटवडा जाणवत आहे. सेमीकंडक्टर हब होण्यासाठी भारताने कंबर कसली आहे. वेदांताने पहिला सेमीकंडक्टर प्लँट (Semiconductor Plant) गुजरातमध्ये सुरु करण्याचा मनसुबा जाहीर केलेल आहे. तैवानच्या कंपनीसोबत हा प्रकल्प उभारण्यात येत आहे. दरम्यान आता अमेरिकन मायक्रॉन कंपनीने पण भारतात प्रकल्प उभारणीचा निश्चय बोलून दाखवला. ही कंपनी लवकरच या राज्यात प्रकल्प उभारणार आहे. त्यामुळे हजारो हातांना थेट रोजागर तर मिळलेच. पण त्यासोबतच अनेक व्हेंडर्स स्वतःच्या पायावर उभे राहतील आणि पुन्हा रोजगार निर्माण होतील. येत्या काळात सेमीकंडक्टर, ऑटो, टेक्नॉलॉजी, आयटी आणि फार्मा या सेक्टरमध्ये मोठी उलाढाल आणि रोजगार संधी मिळण्याची दाट शक्यता आहे.
अमेरिकन दौऱ्याचा फायदा भारताला सेमीकंडक्टर हब तयार करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) सातत्याने प्रयत्न करत आहेत. अमेरिकेतील सेमीकंडक्टर कंपनी मायक्रॉन गुजरात राज्यामध्ये नवीन प्रकल्प सुरु करत आहे. हा देशातील आणि गुजरातमधील दुसरा मोठा सेमीकंडक्टर प्रकल्प ठरेल. मायक्रॉन कंपनी याअंतर्गत देशात 2.7 अब्ज डॉलरची गुंतवणूक करेल. मोदी सध्या अमेरिकन दौऱ्यावर आहेत. दरम्यान मायक्रॉनच्या सेमीकंडक्टर टेस्टिंग आणि पॅकेजिंग युनिटला मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे.
सीईओने घेतली मोदींची भेट रिपोर्टनुसार, या करारामुळे अमेरिकन सेमीकंडक्टर कंपनीला 1.34 अब्ज डॉलरच्या उत्पादन जोडणी सवलतीचा (PLI) मोठा लाभ भारत सरकार देणार आहे. सवलतीमुळे या प्रकल्पाला कॅबिनेटच्या मंजुरीची प्रतिक्षा होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. मायक्रॉन कंपनीचे सीईओ संजय मेहरोत्रा यांनी त्यांची भेट घेतली. त्यानंतर लागलीच ही मंजुरी देण्यात आली. पंतप्रधानांनी या कंपनीला भारतात येण्याचे आमंत्रण पण दिले.
इतक्या डॉलर्सची गुंतवणूक मंत्रिमंडळाने तातडीने मंजुरी दिल्याने कंपनीने आभार मानले. तसेच गुजरात राज्यात सेमीकंडक्टर प्रकल्प सुरु करण्याचा आराखडा सांगितला. दोन टप्प्यात हा प्रकल्प उभारण्यात येईल. त्यासाठी मायक्रॉन कंपनी पहिल्या टप्प्यात 82.5 कोटी डॉलरची गुंतवणूक करणार आहे. तर उर्वरीत रक्कम केंद्र आणि राज्य सरकार देणार आहे.
यंदाच मुहूर्त स्थानिक पातळीवर इकोसिस्टम उभारण्यासाठी तातडीने पाऊलं टाकण्यात येतील. भारताच्या भूमिकेमुळे आम्हाला हुरुप आला आहे. प्रकल्प उभारणीचे स्थान, ठिकाण निश्चित आहे. लवकरच याठिकाणी प्रकल्प उभारणीचे काम हाती घेण्यात येणार आहे. यंदाच हा प्रकल्प सुरु करण्याचा मुहूर्त आहे. पहिल्या टप्प्यात 5 हजार जणांना नोकऱ्या उपलब्ध होतील. तर दुसऱ्या टप्प्यात 15,000 जणांच्या हाताला रोजगार मिळेल.