AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मारुतीला मोठा तोटा, दुसऱ्या तिमाहीत नफ्यात 66% घट

समीक्षाधीन कालावधीत सेमी कंडक्टरच्या कमतरतेमुळे उत्पादन प्रभावित झाल्याचे कंपनीने म्हटले आहे. याशिवाय वस्तूंच्या किमतीत वाढ झाल्याने मारुतीच्या नफ्यावरही परिणाम झाला. मारुती सुझुकी इंडियाने एका निवेदनात म्हटले आहे की, गेल्या आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत कंपनीने 1,420 कोटींचा एकत्रित निव्वळ नफा कमावला.

मारुतीला मोठा तोटा, दुसऱ्या तिमाहीत नफ्यात 66% घट
Maruti Suzuki
Follow us
| Updated on: Oct 27, 2021 | 9:02 PM

नवी दिल्ली : देशातील सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी मारुती सुझुकी इंडियाने (Maruti Suzuki India) बुधवारी चालू आर्थिक वर्षाच्या (2021-22) दुसऱ्या तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर केलेत. 30 सप्टेंबर 2021 रोजी संपलेल्या दुसऱ्या तिमाहीत तिचा एकत्रित निव्वळ नफा 66 टक्क्यांनी घसरून 487 कोटी रुपयांवर गेलाय.

चिपच्या कमतरतेमुळे मारुतीचे मोठे नुकसान

समीक्षाधीन कालावधीत सेमी कंडक्टरच्या कमतरतेमुळे उत्पादन प्रभावित झाल्याचे कंपनीने म्हटले आहे. याशिवाय वस्तूंच्या किमतीत वाढ झाल्याने मारुतीच्या नफ्यावरही परिणाम झाला. मारुती सुझुकी इंडियाने एका निवेदनात म्हटले आहे की, गेल्या आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत कंपनीने 1,420 कोटींचा एकत्रित निव्वळ नफा कमावला. समीक्षाधीन तिमाहीत ऑपरेशन्समधून एकत्रित उत्पन्न 20,551 कोटी रुपये होते, जे मागील वर्षी याच कालावधीत 18,756 कोटी होते. दुसऱ्या तिमाहीत एकूण वाहन विक्री तीन टक्क्यांनी घसरून 3,79,541 युनिट्सवर आली, जी गेल्या आर्थिक वर्षात याच कालावधीत 3,93,130 युनिट्स होती.

सोशल मीडिया हँडलद्वारे त्यांच्या बहुप्रतीक्षित कारचा टीझर रिलीज

मारुती सुझुकीने नेक्साच्या सोशल मीडिया हँडलद्वारे त्यांच्या बहुप्रतीक्षित कारचा टीझर रिलीज केला. हा टीझर आगामी जिम्नी एसयूव्हीचा आहे. टीझरमध्ये ऑफ-रोड/डेझर्ट ट्रेलवर कारच्या टायरच्या खुणा दाखवण्यात आल्या आहेत, ज्यामुळे आम्हाला विश्वास आहे की, ही कार आगामी जिम्नी एसयूव्हीच असू शकते. कंपनी त्यांच्या मानेसर, हरियाणा प्लांटमध्ये एसयूव्हीचे 3-डोर व्हर्जन तयार करत आहे. तिथून या गाड्या जागतिक बाजारात निर्यात केल्या जातात.

जिम्नीचे 5-डोर व्हर्जन लाँच होण्याची अपेक्षा

दरम्यान, भारतात आता जिम्नीचे 5-डोर व्हर्जन लाँच होण्याची अपेक्षा आहे, जी सध्या विकसित होत आहे. भारतात महिंद्राने आपली न्यू जनरेशन थार एसयूव्ही आधीच लॉन्च केली आहे. न्यू जनरेशन गुरखादेखील नुकतीच लॉन्च करण्यात आली आहे. मारुतीची आगामी जिमनी एसयूव्ही दोन्ही ऑफ-रोडर्सना थेट स्पर्धा देईल. मारुती सुझुकी जिम्नीची नवीन इंडिया-स्पेक 5-डोर LWB आवृत्ती 2022 मध्ये देशात विक्रीसाठी येण्याची शक्यता आहे.

संबंधित बातम्या

शानदार ऑफर! अवघ्या 27 हजारात घरी न्या होंडाची ढासू बाईक, सोबत 12 महिन्यांची वॉरंटी

हिरो मोटोकॉर्पची Xtreme 160R Stealth Edition बाजारात, जाणून घ्या नव्या बाईकमध्ये काय आहे खास?

532 भारतीय नागरिक मायदेशी परतले
532 भारतीय नागरिक मायदेशी परतले.
नवा व्हिडीओ, नवा प्रश्न... पहलगाममधील हल्ल्याचा आणखी एक व्हिडीओ समोर
नवा व्हिडीओ, नवा प्रश्न... पहलगाममधील हल्ल्याचा आणखी एक व्हिडीओ समोर.
पाकिस्तान हादरला... पेशावरमध्ये बॉम्बस्फोट, सात जणांचा मृत्यू
पाकिस्तान हादरला... पेशावरमध्ये बॉम्बस्फोट, सात जणांचा मृत्यू.
पाक क्रिकेटर आफ्रीदी ‘पहलगाम’वर बोलताना भुंकला, ओवैसी म्हणाले हा तर...
पाक क्रिकेटर आफ्रीदी ‘पहलगाम’वर बोलताना भुंकला, ओवैसी म्हणाले हा तर....
सॅल्यूट...बघा भारतीय सैन्याची ताकद, त्रिशक्ती कॉर्प्सकडून व्हिडीओ शेअर
सॅल्यूट...बघा भारतीय सैन्याची ताकद, त्रिशक्ती कॉर्प्सकडून व्हिडीओ शेअर.
कचाट्यात सापडणार तोच निसटले, ते दहशतवादी 4 वेळा वाचले; नेमकं काय घडलं?
कचाट्यात सापडणार तोच निसटले, ते दहशतवादी 4 वेळा वाचले; नेमकं काय घडलं?.
ट्रकनं कट मारला अन् एसटी थेट खड्ड्यात, चालकानं सांगितलं नेमकं काय घडलं
ट्रकनं कट मारला अन् एसटी थेट खड्ड्यात, चालकानं सांगितलं नेमकं काय घडलं.
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे केली मोठी मागणी
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे केली मोठी मागणी.
तहव्वुर राणाच्या रिमांडमध्ये 12 दिवसांची वाढ करण्याची मागणी
तहव्वुर राणाच्या रिमांडमध्ये 12 दिवसांची वाढ करण्याची मागणी.
भारताशी दगफटका...चीननंतर तुर्की पाकिस्तानच्या मदतीला, सढळ हस्ते....
भारताशी दगफटका...चीननंतर तुर्की पाकिस्तानच्या मदतीला, सढळ हस्ते.....