मोठी बातमी! एटीएममधून 2000 रुपयांची नोट गायब; आर्थिक वर्षात छपाईच नाही, आता काय?

तत्कालीन अर्थ राज्यमंत्री अनुराग सिंह ठाकूर यांनी सांगितले होते की, 30 मार्च 2018 पर्यंत एकूण चलनात 2000 च्या 3362 दशलक्ष नोटा होत्या. खंडाच्या बाबतीत तो 3.27 टक्के होता. व्यापाराच्या दृष्टीने हे मूल्य 37.26 टक्के होते. 26 फेब्रुवारी 2021 ला 2000 च्या नोटांची संख्या 2499 दशलक्षवर आली, जी एकूण नोटांच्या 2.01 टक्के आणि मूल्याच्या 17.78 टक्के आहे.

मोठी बातमी! एटीएममधून 2000 रुपयांची नोट गायब; आर्थिक वर्षात छपाईच नाही, आता काय?
2000 Rupee Notes
Follow us
| Updated on: Dec 07, 2021 | 8:29 PM

नवी दिल्लीः भारतीय चलनातून 2000 रुपयांच्या नोटांची संख्या हळूहळू कमी होत आहे. यंदा नोव्हेंबर महिन्यात चलनात असलेल्या 2000 रुपयांच्या नोटांची संख्या 223.30 कोटींवर आली, अशी माहिती सरकारने दिलीय. चलनात असलेल्या एकूण नोटांच्या हे प्रमाण सुमारे 1.75 टक्के आहे. मार्च 2018 मध्ये चलनात दोन हजार रुपयांच्या नोटांची संख्या 336.3 कोटी होती.

आर्थिक वर्षात 2000 रुपयांची एकही नोट छापणार नाही

रिझर्व्ह बँकेने नुकताच एक अहवाल जारी केलाय. या अहवालानुसार RBI चालू आर्थिक वर्षात 2000 रुपयांची एकही नोट छापणार नाही. या अहवालानुसार 2020-21 या आर्थिक वर्षात कागदी चलनाची संख्या 223301 लाख इतकी होती. मागील आर्थिक वर्षात (2019-20) ही संख्या 223875 लाख इतकी होती. चलनात 500 आणि 2000 च्या नोटांचे मूल्य एकूण मूल्याच्या 85.70 टक्के आहे. 500 च्या नोटांची संख्या 31.10 टक्के आहे. मार्च 2021 मध्ये लोकसभेत आणखी एक माहिती देण्यात आली होती, ज्यामध्ये गेल्या दोन वर्षांपासून 2000 रुपयांची नवी नोट छापण्यात आली नसल्याचे सांगण्यात आले होते.

2000 च्या नोटांची संख्या सातत्याने कमी होतेय

तत्कालीन अर्थ राज्यमंत्री अनुराग सिंह ठाकूर यांनी सांगितले होते की, 30 मार्च 2018 पर्यंत एकूण चलनात 2000 च्या 3362 दशलक्ष नोटा होत्या. खंडाच्या बाबतीत तो 3.27 टक्के होता. व्यापाराच्या दृष्टीने हे मूल्य 37.26 टक्के होते. 26 फेब्रुवारी 2021 ला 2000 च्या नोटांची संख्या 2499 दशलक्षवर आली, जी एकूण नोटांच्या 2.01 टक्के आणि मूल्याच्या 17.78 टक्के आहे.

एप्रिल 2019 नंतर 2000 च्या नोटांची छपाई थांबली

भारतीय रिझर्व्ह बँकेने 2019 मध्ये एक निवेदन जारी केले होते, त्यानुसार 2000 च्या 3,542.991 दशलक्ष नोटा 2016-17 (एप्रिल 2016 ते मार्च 2017) या आर्थिक वर्षात छापण्यात आल्या होत्या. 2017-18 या आर्थिक वर्षात केवळ 111.507 दोन हजाराच्या नोटा छापण्यात आल्या. पुढील आर्थिक वर्ष 2018-19 मध्ये केवळ 46.690 दशलक्ष 2000 च्या नोटा छापण्यात आल्या. एप्रिल 2019 पासून 2000 ची एकही नोट छापण्यात आलेली नाही. सरकारने आधीच सांगितले आहे की, मार्च 2022 पर्यंत एकही नोट छापली जाणार नाही.

सर्वाधिक चलनात 500 ची नोट

साहजिकच जेव्हा आरबीआय 2000 च्या नोटा छापत नाहीये, तेव्हा त्याऐवजी आणखी काही नोटा छापल्या जाणार आहेत. मिंटच्या अहवालानुसार, 2000 नोटांच्या जागी आता 200 आणि 500 रुपयां​​च्या नोटा येत आहेत. मार्च 2017 मध्ये 500 च्या नोटांच्या संख्येचा वाटा एकूण नोटांच्या संख्येत 5.9 टक्के होता, जो मार्च 2019 मध्ये वाढून 19.80 टक्के झाला. मूल्याबद्दल बोलायचे झाल्यास मार्च 2019 मध्ये सर्व 500 नोटांचे मूल्य चलनात असलेल्या चलनाच्या 51 टक्के होते, जे मार्च 2017 मध्ये केवळ 22.5 टक्के होते.

संबंधित बातम्या

चांगला क्रेडिट स्कोअरही आता कर्जाची हमी ठरणार नाही, रेटिंग सुधारण्यासाठी ही महत्त्वाची पावले

Gold And Silver Prices Today: सोने आज पुन्हा महागले, नेमका भाव किती?

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.