केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी; 9500 रुपयांचा अतिरिक्त प्रवासी भत्ता मिळणार, जाणून घ्या

1 जुलै 2021 पासून याची अंमलबजावणी झालीय. महागाई भत्त्यातील (DA) वाढीचा थेट परिणाम वाहतुकीच्या भत्त्यावरही होणार असून, त्यातही वाढ झालीय. 

केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी; 9500 रुपयांचा अतिरिक्त प्रवासी भत्ता मिळणार, जाणून घ्या
7th Pay Commission
Follow us
| Updated on: Jul 18, 2021 | 3:55 PM

नवी दिल्ली: 7th Pay Commission News: अलीकडेच केंद्रीय कर्मचार्‍यांच्या मागणीचा विचार करता मोदी सरकारने गेल्या दीड वर्षांपासून महागाई भत्त्यावरील बंदी काढून 11 टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतलाय. पूर्वी महागाई भत्ता 17 टक्के होता, जो आता वाढून 28 टक्के झालाय. 1 जुलै 2021 पासून याची अंमलबजावणी झालीय. महागाई भत्त्यातील (DA) वाढीचा थेट परिणाम वाहतुकीच्या भत्त्यावरही होणार असून, त्यातही वाढ झालीय.

परिवहन भत्ते वेगवेगळ्या स्तरावर वेगवेगळ्या शहरांमध्ये बदलतात

केंद्रीय कर्मचार्‍यांचे परिवहन भत्ते वेगवेगळ्या स्तरावर वेगवेगळ्या शहरांमध्ये बदलत असतात. दिल्ली, अहमदाबाद, बंगळुरू, गाझियाबाद, बृहत्तर मुंबई, हैदराबाद, जयपूर, पाटणा अशी शहरे उच्च TPTA प्रकारात येतात. याखेरीज उर्वरित शहरेही येतात. टीपीटीए कर्मचार्‍यांच्या विविध स्तरांसाठी निश्चित केले गेले आहेत, ज्यावर महागाई भत्ता जोडून कर्मचार्‍यांना परिवहन भत्ता मोजला जातो.

Total Transport Allowance = TA + [(TA x DA%) / 100]

उदाहरणार्थ, उच्च TPTA शहरांमध्ये 1-2 स्तरासाठी टीपीटीए 1350 रुपये आहे, 3-8 स्तराच्या कर्मचार्‍यांसाठी 3600 रुपये आणि त्यावरील पातळी 9 साठी ते 7200 रुपये आहेत. सद्यस्थितीत डीएचा स्तर 17 टक्के होता, जो 1-2 लेव्हलसाठी 230 रुपये, 3-8 लेव्हलसाठी 612 रुपये आणि वरील लेव्हल 9 साठी 1224 रुपये होता. अशा प्रकारे एकूण परिवहन भत्ता 1580 रुपये, 4212 आणि 8424 रुपये करण्यात येत होता.

आता तुम्हाला किती प्रवासी भत्ता मिळेल?

जर महागाई भत्ता 28 टक्के झाला तर एकूण प्रवासी भत्ता 1728 रुपये, 4608 रुपये आणि 9216 रुपये होईल. अशा प्रकारे मासिक तत्त्वार 149 रुपये, 396 रुपये आणि प्रवासी भत्त्यामध्ये 792 रुपयांची वाढ झालीय. वार्षिक आधारावर या कर्मचार्‍यांना 1788 रुपये, 4752 रुपये आणि 9504 रुपये अधिक मिळतील. महागाई भत्ता 17 टक्के होता जो आता वाढून 28 टक्के झालाय.

इतर शहरांसाठी टीपीटीए काय?

त्याचप्रमाणे अन्य शहरांकरिता 1-2 स्तरासाठी टीपीटीए 900 रुपये, 3-8 पातळीसाठी ते 1800 रुपये आणि पातळी 9 आणि त्याहून अधिक 3600 रुपये आहेत. सध्या टीएवर 17 टक्के दराने डीए 153 रुपये, 306 आणि 612 रुपये आहे. अशा प्रकारे एकूण प्रवासी भत्ता 1053 रुपये, 2106 रुपये आणि 4212 रुपये होता.

इतर शहरांतील कर्मचाऱ्यांना प्रवासी भत्ता किती मिळणार?

महागाई भत्ता 28 टक्क्यांपर्यंत वाढल्यानंतर डीएवरील टीए 252 रुपये, 504 आणि 1008 रुपये झाला. एकूण प्रवासी भत्ता 1152 रुपये, 2304 आणि 4608 रुपये झालाय. पूर्वीच्या तुलनेत त्यात 99 रुपये, 198 रुपये आणि 396 रुपयांची वाढ झाली. वार्षिक आधारावर, स्तरावरील 1-2 स्तरावरील कर्मचार्‍यांना 1188 रुपये, 3-8 स्तरावरील कर्मचार्‍यांना 2376 रुपये आणि 9 आणि त्यापेक्षा अधिक स्तरावरील कर्मचार्‍यांना 4752 रुपये अधिक वेतन मिळेल.

संबंधित बातम्या

मोठी बातमी! जुन्या सोन्याच्या दागिन्यांच्या विक्रीच्या नफ्यावर ज्वेलर्सला द्यावे लागणार GST

7th Pay Commission : DA वाढल्यानंतर तुमच्या PF आणि HRA वर काय परिणाम होणार? जाणून घ्या

Big news for central employees; Get an additional transport allowance of Rs 9500, find out

सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.