SBI ग्राहकांसाठी मोठी बातमी; सिम कार्डची त्वरित बँकेत पडताळणी करा, तरच या सुविधेचा मिळणार लाभ
योनो आणि योनो लाईट अॅपवर सिम बंधनकारक करण्याची प्रणाली केवळ त्या मोबाईलवर काम करेल, ज्यांचे सिम कार्ड बँकेने पडताळणी केले आहे. म्हणजेच, YONO आणि YONO लाईट सुरक्षित करण्यासाठी ग्राहकांना सिम कार्ड नोंदणी करणे आवश्यक आहे.
नवी दिल्लीः देशातील सर्वात मोठी सरकारी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया SBI ने आपल्या ग्राहकांना मोठी सुविधा दिलीय. ही सुविधा पैसे आणि ग्राहकांच्या पैशाच्या सुरक्षिततेबद्दल आहे. SBI ने ग्राहकांच्या खात्यांसाठी YONO आणि YONO Lite अॅप, सिम बायंडिंगमध्ये सुरक्षेची एक नवीन प्रणाली सुरू केलीय. एसबीआयच्या या दोन अॅप्सच्या नवीन आवृत्तीमुळे ग्राहकांना अनेक प्रकारची डिजिटल फसवणूक टाळण्याचा मार्ग मिळेल. योनो आणि योनो लाईट अॅपवर सिम बंधनकारक करण्याची प्रणाली केवळ त्या मोबाईलवर काम करेल, ज्यांचे सिम कार्ड बँकेने पडताळणी केले आहे. म्हणजेच, YONO आणि YONO लाईट सुरक्षित करण्यासाठी ग्राहकांना सिम कार्ड नोंदणी करणे आवश्यक आहे.
?त्या मोबाईल धारकांना बँकेकडे नोंदणीची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करावी लागणार
ज्या ग्राहकांना YONO आणि YONA Lite ची नवीन अपडेट घ्यायचे आहे, त्या मोबाईल धारकांना बँकेकडे नोंदणीची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. या नवीन सिस्टीममध्ये ग्राहकाला बँकेकडे आधीच नोंदणीकृत असलेल्या मोबाईल क्रमांकाच्या सिमची पडताळणी करावी लागेल. ग्राहकांनी ठरवायचे आहे की त्यांनी त्याच मोबाईल फोनचे सिम रजिस्टर करावे जे त्यांच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकाशी जोडलेले आहे. सिम कार्डची पडताळणी केल्यानंतर YONO आणि YONO लाईट अॅपवर सायबर फसवणूक टाळण्यासाठी अनेक उपाय उपलब्ध होतील. ग्राहकांची बँकिंग पूर्वीपेक्षा अधिक सुरक्षित होईल. सायबर फसवणुकीच्या वाढत्या घटना पाहता स्टेट बँकेने ही नवीन प्रणाली सुरू केली आहे.
? काय आहे संपूर्ण प्रक्रिया?
सिम बायंडिंगचे वैशिष्ट्य योनो आणि योनो लाईट अॅपमध्येच लाँच केले गेलेय, यासाठी ग्राहकांना आधी योनो आणि योनो लाईट अॅप अपडेट करावे लागेल. यासह दोन्ही अॅप्सचे नवे अपडेट्स उपलब्ध होईल. या अॅप्समध्ये पूर्वीपेक्षा अधिक सुरक्षा उपाय देण्यात आलेत. अॅप अपडेट केल्यानंतर ग्राहकाला एकवेळ नोंदणी प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. या प्रक्रियेद्वारे बँक नोंदणीकृत मोबाईल क्रमांकाच्या सिमची पडताळणी करेल. हा तोच नंबर असावा जो बँकेत आधीच एंटर केला आहे. ग्राहकाला त्याचा फोनही रजिस्टर करावा लागेल ज्यामध्ये नोंदणीकृत मोबाईल नंबर वापरायचा आहे.
? मोबाईल नंबर कसा नोंदवायचा?
?अँड्रॉईड वापरकर्ते प्ले स्टोअरवरून एसबीआय योनो लाईट अॅप डाऊनलोड आणि उघडा. SBI मध्ये नोंदणी करण्यासाठी SIM1 किंवा SIM2 निवडा. सिंगल सिम असल्यास सिम सिलेक्शन करण्याची गरज नाही ? तुमच्या मोबाईल क्रमांकावर एक मेसेज येईल, जो मोबाईल डिव्हाइसवरून एसएमएस पाठवण्यास सांगेल. मोबाईल नंबर पडताळण्यासाठी हे आवश्यक आहे ? आता Proceed या बटणावर क्लिक करा. तुम्हाला मोबाईल नंबरवरून पूर्वनिर्धारित क्रमांकावर एक युनिक कोड पाठवला जाईल ? आता तुम्हाला नोंदणी स्क्रीनवर पुनर्निर्देशित केले जाईल. येथे तुम्हाला युजरनेम आणि पासवर्ड टाकावा लागेल. शेवटी रजिस्टर बटणावर क्लिक करा ? नोंदणीसाठी अटी आणि शर्थी प्रविष्ट करा आणि शेवटी ओकेवर क्लिक करा ? यानंतर नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर एक कोड प्राप्त होईल. हा कोड पुढील 30 मिनिटांसाठी वैध असेल ? आता ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आपल्याला आधीच सापडलेला कोड प्रविष्ट करावा लागेल ? ही प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर वापरकर्ता YONO लाईट अॅपवर लॉगिन करू शकतो.
संबंधित बातम्या
चालू आर्थिक वर्षात सरकार करातून मोठी कमाई करणार, महसूल सचिवांचे संकेत
देशातील 5.82 कोटी लोकांना सरकारी योजनांचा लाभ मिळणार नाही, हे मोठे कारण समोर
Big news for SBI customers; Get the benefit of this facility only if you verify the SIM card in the bank immediately