Share Market | मोठी अपडेट! शेअर विका, झटपट पैसा खात्यात, कधी होणार सुरुवात

Share Market Settlement | SEBI ने स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूकदार आणि ट्रेडर्ससाठी मोठा बदलल केला आहे. भारतीय बाजाराने तंत्रज्ञानाची कास धरली आहे. सेबी शेअर बाजारात अजून एक अनोखा प्रयोग राबवणार आहे. त्यामुळे सौदे आता झटपट पूर्ण होतील. सेटलमेंटसाठी आता एक तासाची पण वाट पाहावी लागणार नाही. काय आहे सेबीचा प्रयोग

Share Market | मोठी अपडेट! शेअर विका, झटपट पैसा खात्यात, कधी होणार सुरुवात
Follow us
| Updated on: Dec 23, 2023 | 2:15 PM

नवी दिल्ली | 23 डिसेंबर 2023 : भारतीय शेअर बाजाराच्या (Share Market) घौडदौडीची सध्या जगभर चर्चा सुरु आहे. इतकेच नाही तर काही हटके प्रयोगाची पण जगाने दखल घेतली आहे. प्रगत देशापेक्षा भारतीय बाजाराने मोठी आघाडी घेतली आहे. गुंतवणूकदार आणि ब्रोकर्ससाठी अनेक सुविधा सुरु केल्या आहेत. भारताने या वर्षाच्या सुरुवातीला शेअर बाजारातील व्यवहार अवघ्या एका दिवसावर (T+1 Settlement) आणण्याची करामत साधली. यावर्षी सुरूवातीला हा प्रयोग झाला होता. आता तर SEBI ने अजून एक पाऊल पुढे टाकले आहे. स्टॉक मार्केटमध्ये आता झटपट सेटलमेंट होणार आहे.

काय होती व्यवस्था

गेल्या वर्षी शेअर बाजारात सौदा पूर्ण झाल्यावर त्याचे अपडेट तीन दिवसांत खात्यात दिसत होते. म्हणजे पैसे तिसऱ्या दिवशी खात्यात जमा होत होते. जगभरात जवळपास इतक्याच दिवसांतच सौदे पूर्ण होतात. भारताने काही दिवसांनी हा कालावधी कमी केला आहे. भारताने या वर्षाच्या सुरुवातीला शेअर बाजारातील व्यवहार अवघ्या एका दिवसावर (T+1 Settlement) आणला. आता तर त्यापुढेचं पाऊल टाकण्यात सेबीला यश आले आहे.

हे सुद्धा वाचा

झटपट पैसा खात्यात

सेबीने दोन टप्प्यात सेटलमेंट (T+0) ऐवजी झटपट सेटलमेंटचा (Instant Settlement) प्रस्ताव दिला आहे. सेबीने याविषयी लोकांच्या हरकती आणि अभिप्राय पण मागवला आहे. हा प्रस्ताव सध्याच्या T+1 पेक्षा वेगळा असेल. या नियमाचा गुंतवणूकदारांना सर्वाधिक फायदा होईल. कारण त्यांना शेअर विक्रीची रक्कम अवघ्या काही वेळातच खात्यात जमा होईल.

गुंतवणूकदारांकडे तीन पर्याय

  1. मार्केट नियंत्रक सेबीने याविषयीची माहिती दिली आहे. त्यानुसार, T+0 लागू केल्यास सेटलमेंट करताना लिक्विडीटीची अडचण येणार नाही. गुंतवणूकदाराकडे T+1 ऐवजी T+0 आणि झटपट सेटलमेंटचा पर्याय असेल. T+0 दुपारी 1:30 वाजेपर्यंत व्यापारासाठी मदत करेल. यामध्ये शेअरचा पैसा संध्याकाळी 4:30 वाजेपर्यंत त्यांच्या खात्यात जमा होईल.
  2. दुसऱ्या टप्प्यात गुंतवणूकदारांना 3:30 वाजेपर्यंतच्या सर्व व्यवहारासाठी पर्यायी झटपट सेटलमेंटचा पर्याय मिळेल. ट्रेडर्स, गुंतवणूकदार अशा पर्यायाद्वारे सहज ट्रेडिंग करतील. त्यामुळे खात्यात रक्कम जमा होण्यासाठी त्यांना जास्त वेळ वाट पाहावी लागणार नाही.
  3. सेबीचे म्युच्युअल फंडावर बारकाईने नजर ठेवत आहे. त्यासाठी जवळपास 80 एल्गोरिदमचा वापर करण्यात येत आहे. फंड हाऊसने गडबडी केल्यास त्यासंबंधीचा अहवाल लागलीच तयार करण्यात येत आहे. आता AI ची मदत घेण्यात येत आहे. त्यामुळे चुकीच्या पद्धतीने व्यवहार होत असेल तर ते समोर येणार आहे.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.