Petrol Diesel Price : LPG झाला स्वस्त, आता पेट्रोल-डिझेलची ही गुड न्यूज!

Petrol Diesel Price : एलपीजी सिलेंडरवर नागरिकांना मोठा दिलासा देण्यात आला आहे. निवडणुकीपूर्वी केंद्र सरकारने ही खेळी खेळली आहे. मोदी सरकारने उज्ज्वला योजनेतील सिलेंडवर सबसिडी वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. आता पेट्रोल-डिझेलच्या किंमतीबाबत ही मोठी अपडेट समोर आली आहे.

Petrol Diesel Price : LPG झाला स्वस्त, आता पेट्रोल-डिझेलची ही गुड न्यूज!
Follow us
| Updated on: Oct 08, 2023 | 5:46 PM

नवी दिल्ली | 8 ऑक्टोबर 2023 : एलपीजी सिलेंडरबाबत (LPG Cylinder) गेल्या महिन्यात मोठा दिलासा देण्यात आला. केंद्र सरकारने घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमती कमी केल्या. तर उज्ज्वला योजनेतील गॅस सिलेंडरवर सबसिडी वाढविण्याचा निर्णय घेतला. यावर पूर्वी 200 रुपये सबसिडी होती. ती वाढून 300 रुपये करण्यात आली आहे. घरगुती गॅस सिलेंडर जवळपास 200 रुपयांनी स्वस्त झाले आहे. आता पेट्रोल-डिझेलबाबत (Petrol Diesel Price) मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे. गेल्या दीड वर्षांपेक्षा अधिक काळ पेट्रोल-डिझेलचे दाम वाढविण्यात आलेली नाही. मध्यंतरी कच्चे तेल 100 बॅरल प्रति डॉलरपर्यत उसळले होते. पण देशात इंधनाचे दर स्थिर होते. आता इंधनाबाबत केंद्र सरकार गुड न्यूज देण्याच्या तयारीत आहे. काय आहे ही आनंदवार्ता?

आता 300 रुपयांची सबसिडी

केंद्र सरकारने या 29 ऑगस्ट रोजी मोठी घोषणा केली होती. त्यावेळी घरगुती गॅस सिलेंडरचे दर 200 रुपयांनी कमी करण्यात आले. तर उज्ज्वला योजनेतील लाभार्थ्यांना 200 रुपयांची सबसिडी देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यामुळे उज्ज्वला योजनेतील ग्राहकांसाठी गॅस सिलेंडरचे दर तब्बल 400 रुपयांनी स्वस्त झाले होते. या महिन्यात केंद्र सरकारने पुन्हा सुखद धक्का दिला. उज्ज्वला योजनेतील ग्राहकांसाठी 200 ऐवजी 300 रुपये सबसिडी देण्याचा निर्णय घेतला.

हे सुद्धा वाचा

18 महिन्यांपासून किंमती स्थिर

सार्वजनिक क्षेत्रातील तीन तेल वितरण कंपन्या इंडियन ऑईल कॉर्पोरेशन, भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड आणि हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड या तीन कंपन्या भारतात पेट्रोल-डिझेलचे वितरण करतात. या कंपन्यांनी गेल्या 18 महिन्यांपासून इंधनाच्या किंमतीत कोणतीही वाढ केलेली नाही. या कंपन्यांचे देशातील जवळपास 90 टक्के बाजारावर नियंत्रण आहे.

गेल्या वर्षीपासून दरवाढ नाही

मोदी सरकारच्या काळात पेट्रोल-डिझेलच्या किंमतींनी 100 रुपयांचा टप्पा ओलांडला होता. जनतेतून मोठी प्रतिक्रिया आल्या. त्याचे परिणाम काही राज्यांच्या निवडणुकात दिसून आले. त्यानंतर बॅकफुटवर येत 22 मे 2022 रोजीपासून शुल्कात कपात करण्यात आली आणि किंमती स्थिर ठेवण्यात आल्या. कंपन्यांच्या दाव्यानुसार आर्थिक वर्ष 2022-23 च्या पहिल्या सहा महिन्यांपासून कंपन्यांना तोटा सहन करावा लागत आहे.

काय आहे दावा

मुडीज या रेटींग एजन्सीने हा दावा केला आहे. त्यानुसार जागतिक बाजारात कच्चे तेल महागात खरेदी केल्या जात आहे. तरी पण देशातील तीन ही इंधन कंपन्या पेट्रोल-डिझेलची दरवाढ करणार नाही. या वर्षाच्या अखेरीस पाच राज्यातील विधानसभा निवडणूका आणि 2024 मधील लोकसभा निवडणुकीमुळे हा निर्णय होण्याची दाट शक्यता आहे. पेट्रोल-डिझेल स्वस्त होण्याची शक्यता कमी असली तरी दरवाढीची अजिबात शक्यता नाही.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.