Ambani-Tata : नवीन पिढीच्या हातात या समूहाची सूत्रं! अनन्या-आर्यमान यांच्या खाद्यांवर मोठी जबाबदारी

Ambani-Tata : अंबानी-टाटा, किर्लोस्कर यांच्यानंतर आता या समूहाची दुसरी पिढी मैदानात उतरली आहे.

Ambani-Tata : नवीन पिढीच्या हातात या समूहाची सूत्रं! अनन्या-आर्यमान यांच्या खाद्यांवर मोठी जबाबदारी
नवीन पिढी मैदानात
Follow us
| Updated on: Feb 02, 2023 | 7:03 PM

नवी दिल्ली : प्रत्येक व्यवसायात सध्याच्या पिढीची जागा पुढील पिढी घेते. हे चैतन्यदायी चेहरे व्यवसायाला (Business) नवे रुपडे देतात. त्याचा परीघ वाढवितात. व्यवसाय अधिक जोमाने आणि नेटाने वाढविण्यासाठी दमदार नेतृत्वाची आणि धावपळ करणाऱ्या पिढीची गरज असते. प्रत्येक व्यवसायात हा बदल होतो. नवीन पिढी सूत्रं हाती घेते. जुनी पिढी त्यांना मार्गदर्शन करते आणि व्यवसाय चौफेर वाढतो. त्यातून व्यवसायाला नवीन दिशा मिळते. त्या समूहाला नवीन मार्ग सापडतात. भारतीय उद्योजकांच्या विश्वात सध्या अनेक बदल होत आहे. अनेक घडामोडी घडत आहेत. टाटा समूहापासून ते अदानी, अंबानींपर्यंत (Tata to Ambani Group) नवीन पिढीच्या खाद्यांवर जबाबदारी सोपविण्यात आली आहे. हा खांदेपालट सहज, सुकर झाला आहे. परदेशात शिकून आलेल्या या पिढीने समूहात विविध पदावर अगोदर स्वतःला सिद्ध केले आणि नंतर मोठी जबाबदारी सांभाळायला ते सज्ज झाले. आता ही एका समूहात खांदेपालट झाली आहे.

रिलायन्सचे चेअरमन मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांनी तीनही मुलांच्या खांद्यावर व्यवसायाची जबाबदारी सोपवली आहे. आकाश अंबानी, ईशा अंबानी आणि अनंत अंबानी यांच्याकडे वेगवेगळ्या पदाची जबाबदारी सोपविण्यात आली.

तर टाटा समूहाने (Tata Group) नोएल टाटा यांची तीन मुलं, लिया, माया आणि नेविल टाटा यांचा टाटा मेडिकल सेंटर बोर्डावर समावेश केला आहे. सध्या अनेक उद्योग समूहात खांदेपालट सुरु आहे. नवीन पिढीला संधी देण्यात येत आहे. आता कुमार मंगलम बिर्ला (KM Birla) यांच्या नेतृत्वातील बिर्ला समूहात नवीन पिढीने प्रवेश केला आहे.

हे सुद्धा वाचा

बिर्ला समूहाचे चेअरमन कुमार मंगलम बिर्ला यांनी त्यांच्या उत्तराधिकाऱ्यांच्या खाद्यांवर जबाबदारी सोपवली आहे. वडील आदित्य विक्रम बिर्ला यांच्या मृत्यूनंतर कुमार मंगलम बिर्ला यांच्या खांद्यावर जबाबदारी आली होती. त्यावेळी ते अवघ्या 28 वर्षांचे होते.

1995 साली आदित्य विक्रम बिर्ला यांचे निधन झाले होते. कमी वयातच कुमार बिर्ला यांच्या खांद्यावर जबाबदारी येऊन ही त्यांनी ती लिलया पेलवली. बिर्ला समूहाचा मोठा विस्तार केला. आता नवीन पिढी उद्योग विश्वात आली आहे.

पीटीआईने दिलेल्या माहितीनुसार, 30 जानेवारी 2023 रोजी कुमार मंगलम बिर्ला यांनी समूहातील खांदेपालटाची माहिती दिली. या समूहाचा फॅशन आणि रिटेल बिझनेस, Aditya Birla Fashion And Retail Ltd ची जबाबदारी मुलगी अनन्याश्री बिर्ला (Ananyashree Birla) हिच्या खांद्यावर सोपविली. मुलगा आर्यमान विक्रम बिर्ला (Aryaman Birla) याला संचालक मंडळावर नियुक्त केले.

बिर्ला समूहाचा कारभार भारतातच नाही तर जगातील मोठ्या देशात पसरला आहे. गेल्या 28 वर्षांत या समूहाचे नेतृत्व कुमार मंगलम बिर्ला करत आहेत. या मोठ्या कालावधीत त्यांनी एकूण 40 कंपन्यांचे अधिग्रहण केले आहे. Forbes Billionaires Index नुसार, केएम बिर्ला यांची एकूण संपत्ती 14.9 अब्ज डॉलर आहे.

अनन्याश्री बिर्ला यांना व्यावसायाचे ज्ञान आहे. अवघ्या 17 व्या वर्षीच तिने स्वतःची मायक्रो फायनान्स कंपनी सुरु केली आहे. स्वतंत्र मायक्रोफिन प्रायव्हेट लिमिटेड असे या कंपनीचे नाव आहे. याशिवाय ती एक उत्तम गायिकाही आहे.

आर्यमान बिर्ला हे क्रिकेटपटू पण आहेत. अवघ्या 25 व्या वर्षी आर्यमानने 2017-18 मध्ये रणजी टीममध्ये चमकदार कामगिरी बजावली होती. मध्यप्रदेश संघाकडून आर्यमान खेळला होता. त्याच्या खाद्यांवर आता मोठी जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.